नमस्कार!
मित्रांनो २०१३ हे वर्ष संपायला आता काहीच दिवस उरले आहेत. २०१३ या वर्षाकडे वळून पाहिले तेव्हा जाणवले कि बॉर्न टू विन च्या परिवारात २०१३ हे वर्ष खूप मोठ्या, अविस्मरणीय आणि नव-नवीन घडामोडी घेऊन आलं. संपूर्ण टीम साठी हे वर्ष अत्यंत महत्वाचं आणि खूप काही शिकवून जाणारं ठरलं. खूप सारे आनंदाचे व अविस्मरणीय असे क्षण या २०१३ ने आम्हास तुमच्या समवेत अनुभवायला दिले. २०१३ मध्ये बॉर्न टू विन ने आपल्या अस्तित्वाची यशस्वी ५ वर्षे पूर्ण केली व आता ६ वे वर्ष पूर्ण करत आहोत.
बॉर्न टू विन च्या परिवारास २०१३ च्या सुरुवातीलाच एक अत्यंत आनंदाची बातमी मिळाली आणि ती म्हणजे बॉर्न टू विन चे संस्थापक आणि संचालक श्री. अतुल राजोळी यांना ५ जानेवारी २०१३ रोजी (MBC) Marathi Business Club तर्फे ‘उद्योग तारा’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आणि हा पुरस्कार विको चे अध्यक्ष श्री. गजानन पेंढारकर सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
बॉर्न टू विन च्या परिवारास २०१३ च्या सुरुवातीलाच एक अत्यंत आनंदाची बातमी मिळाली आणि ती म्हणजे बॉर्न टू विन चे संस्थापक आणि संचालक श्री. अतुल राजोळी यांना ५ जानेवारी २०१३ रोजी (MBC) Marathi Business Club तर्फे ‘उद्योग तारा’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आणि हा पुरस्कार विको चे अध्यक्ष श्री. गजानन पेंढारकर सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अतुल राजोळी यांना ‘उद्योग तारा’ पुरस्कार
'THE SUCCESS BLUEPRINT' कार्यशाळा
७ फेब्रुवारी २०१३ रोजी प्रथमच १४ वा लक्ष्यसिद्धी सोहळा यशवंत नाट्यमंदिर माटुंगा येथे दणक्यात व जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमाचे स्वरूप खूपच भव्य होते. त्याला कारणही खास होते…. हा लक्ष्यसिद्धी सोहळा म्हणजे बॉर्न टू विन च्या यशस्वी ५ वर्षांचे सेलीब्रेशन!!
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभले ते केसरी टूर्स चे संस्थापक, श्री. केसरी पाटील सर व त्यांनी न संपणारा प्रवास या विषयावर मार्गदर्शनपर भाषण केले.
या कार्यक्रमात आपल्याला नेहमीच सहाय्य करणाऱ्या आपल्या सगळ्या वेंडर्स व असोसिएटस यांना आपण फेलिसीटेट केले.
इथे आपण आपल्या 'ध्येय निश्चिती ते ध्येयपूर्ती' या त्रैमासिकाचे प्रकाशन देखील केले. त्याचसोबत 'माझा मोटिव्हेटर मित्र' या कॅलेंडर चे प्रकाशनही केले.
या कार्यक्रमाच्या दिवशी एक असा प्रसंग अचानक घडला कि जो पूर्णतः अनपेक्षित होता…. ते म्हणजे सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना फेलीसिटेट करण्याच्या दरम्यान अचानक जवळपास २५ मिनिटांसाठी लाईट गेली… पण आश्चर्य म्हणजे एकही प्रेक्षक जागेवरून हलला नाही व मोबाईलच्या लाईट्स मध्ये प्रशिक्षणार्थ्याच स्वागत केलं व जोश, जल्लोष हा तसाच होता… अशाप्रकारे हा कार्यक्रम रंगतदार झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभले ते केसरी टूर्स चे संस्थापक, श्री. केसरी पाटील सर व त्यांनी न संपणारा प्रवास या विषयावर मार्गदर्शनपर भाषण केले.
या कार्यक्रमात आपल्याला नेहमीच सहाय्य करणाऱ्या आपल्या सगळ्या वेंडर्स व असोसिएटस यांना आपण फेलिसीटेट केले.
इथे आपण आपल्या 'ध्येय निश्चिती ते ध्येयपूर्ती' या त्रैमासिकाचे प्रकाशन देखील केले. त्याचसोबत 'माझा मोटिव्हेटर मित्र' या कॅलेंडर चे प्रकाशनही केले.
या कार्यक्रमाच्या दिवशी एक असा प्रसंग अचानक घडला कि जो पूर्णतः अनपेक्षित होता…. ते म्हणजे सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना फेलीसिटेट करण्याच्या दरम्यान अचानक जवळपास २५ मिनिटांसाठी लाईट गेली… पण आश्चर्य म्हणजे एकही प्रेक्षक जागेवरून हलला नाही व मोबाईलच्या लाईट्स मध्ये प्रशिक्षणार्थ्याच स्वागत केलं व जोश, जल्लोष हा तसाच होता… अशाप्रकारे हा कार्यक्रम रंगतदार झाला.
१४ वा लक्ष्यसिद्धी सोहळा
१८ फेब्रुवारी २०१३ रोजी आपण प्रथमच चिपळूण येथे लक्ष्यवेधचा प्रास्ताविक सेमिनार घेतला. संपूर्ण चिपळूणकरांनी या कार्यक्रमास उचलून घेतल व २५ मार्च २०१३ ला आपली लक्ष्यवेधची मुंबई बाहेर चिपळूण येथे पहिली बॅच यशस्वीरित्या सुरु झाली.
चिपळूण येथे लक्ष्यवेधचा प्रास्ताविक सेमिनार
चिपळूण येथे 'स्वतःमधील उद्योजकाला जागे करा' कार्यक्रम
३० एप्रिल २०१३ रोजी पंधरावा लक्ष्यसिद्धी सोहळा विको चे अध्यक्ष, श्री. गजानन पेंढारकर सर यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडला…. सरांच्या दोन तासांच्या मार्गदर्शनपर भाषणाने उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. ‘उद्योगक्रमणा सहा दशकांची’ या विषयावर त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या सहा दशकांचा यशस्वी प्रवास सगळ्या प्रेक्षकांसमोर उलगडला. या दिवशी मराठी व्यापार परिषदेचे सर्वेसर्वा श्री. अनंत भालेकर सर यांनी देखील विशेष उपस्थिती दाखवली.
१५वा लक्ष्यसिद्धी सोहळा
मित्रांनो संपूर्ण बॉर्न टू विन च्या परिवाराचा लाडका विषय म्हणजे फ्युचर पाठशाला जोश २०१३ हा कार्यक्रम खूपच दिमाखात २६ में २०१३ रोजी भारतातील सर्वात मोठे सभागृह षण्मुखानंद येथे दुसऱ्यांदा २७०० लोकांच्या उपस्थितीत जोशात - जल्लोषात साजरा झाला. या वर्षी मुंबई व मुंबई बाहेर १८ सेन्टर्स च्या माध्यमातून २० बॅच झाल्या व याच्या माध्यमातून या वर्षी आपण ५४० नवीन फ्युचर स्टार्स घडविले. त्या दिवशी तब्बल ४०० पेक्षा जास्त फ्युचर स्टार्सनी स्टेज वर आयुष्याला नवीन दिशा देणारे सामाजिक विषयावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. उपस्थितीत सर्व प्रेक्षक ते पाहून खुपच भारावून गेले व सगळ्या फ्युचर स्टार्स च्या पाठीवर टाळ्यांनी कौतुकाची थाप दिली.
फ्युचर पाठशाला 'जोश २०१३'
तसेच या कार्यक्रमाचं अजून एक खास आकर्षण म्हणजे या कार्यक्रमामध्ये अतुल राजोळी यांच्या माझा मोटीव्हेटर मित्र या मराठी पुस्तकाच्या तिसर्या व My Motivator Mitra या इंग्रजी पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन श्री. मधुकर तळवलकर सर (Executive Chairman, Talwalkars Better Value Fitness Ltd. ) यांच्या हस्ते पार पडले. मराठी पुस्तकाप्रमाणेच इंग्रजीच्या आवृत्तीला देखील खूपच चांगला प्रतीसाद मिळाला आहे. खास म्हणजे श्री. मधुकर तळवलकर सर यांनी उपस्थित प्रेक्षकांना व विद्यार्थी मित्रांना खूपच सुंदर मार्गदर्शन केले. असा हा जोश २०१३ जल्लोषात साजरा झाला.
अतुल राजोळी यांच्या 'माझा मोटीव्हेटर मित्र' या पुस्तकाच्या प्रकाशन
१४ जून २०१३ रोजी बॉर्न टू विन चा व्यवसायीकांसाठीचा महत्वकांक्षी उपक्रम लक्ष्यवेध ADVANCE याच्या तिसर्या बॅचचा पदवीदान सोहळा श्री. वाय. एम. देवस्थळी सर (Chairman, L & T ) यांच्या हस्ते पार पडला. या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्यांची कामगिरी हि खरचं भारावून टाकणारी होती. प्रमुख पाहुण्यांचं उत्कृष्ट असं मार्गदर्शन उपस्थितांना व तिसर्या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्याना मिळाले.
लक्ष्यवेध ADVANCE याच्या तिसर्या बॅचचा पदवीदान सोहळा
मित्रांनो आनंदाची बाब म्हणजे ३ जुलै २०१३ रोजी खास लोकाग्रहास्तव आपण दुसऱ्यांदा 'सुसज्ज व्हा यशस्वी व्हा' हि सहा तासांची कार्यशाळा यशस्वीरित्या घेतली. पहिल्या कार्यशाळेप्रमाणेच या वेळी देखील प्रेक्षकांचा या कार्यशाळेला उदंड प्रतिसाद मिळाला.
'सुसज्ज व्हा यशस्वी व्हा'
चिपळूणकरांच्या प्रेमामुळे व पाठींब्यामुळे १५ जुलै २०१३ ला आपण चिपळूण येथे लक्ष्यवेधची दुसरी बॅच दिमाखात सुरु केली.
मित्रांनो बॉर्न टू विन च्या परिवारासाठी २०१३ मध्ये अत्यंत आनंदाची घडलेली घटना म्हणजे २८ जुलै २०१३ ला आपल्या सर्वांच्या शुभाशिर्वादामुळे आपण आपल्या नवीन ऑफीस मध्ये प्रवेश केला. संपूर्ण परिवारासाठी हे नवीन ऑफीस खूपच लाभदायी ठरले. या ऑफीस मध्ये आल्यापासून खूपच चांगल्या घडामोडी बॉर्न टू विन च्या परिवाराने अनुभवल्या. आनंदाची बाब म्हणजे नवीन ऑफीसचे उद्घाटन श्री. अनंत भालेकर सर यांच्या हस्ते झाले.
बॉर्न टू विन च्या नवीन ऑफीसचे उद्घाटन श्री. अनंत भालेकर सर यांच्या हस्ते
१३ ऑगस्ट २०१३ ला १६ वा लक्ष्यसिद्धी सोहळा बी. एन. वैद्य सभागृह येथे दणक्यात पार पडला. याचं खास आकर्षण म्हणजे सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून लाभलेले श्री. प्रदीप लोखंडे सर. (Founder, Rural Relation) त्यांची रुरल मार्केटिंगची, गोष्ट कोटींची या विषयावर श्री. अतुल राजोळी यांनी घेतलेली खास मुलखत. या मुलाखतीतून उपस्थित प्रेक्षकांना अभूतपूर्व असा अनुभव व शिकवण मिळाली.
१६ वा लक्ष्यसिद्धी सोहळा
बॉर्न टू विन च्या उपक्रमांना महाराष्ट्रीय उद्योजकांचा उदंड प्रतिसाद हा नेहमीच लाभत असतो आणि म्हणूनच आपण या वर्षी दुसऱ्यांदा १६ ऑगस्ट २०१३ रोजी उद्योजकांसाठी स्वतःमधील उद्योजकाला जागे करा हि कार्यशाळा घेतली.
'स्वतःमधील उद्योजकाला जागे करा'
मित्रांनो अतिशय आनंदाची बाब म्हणजे २७ ऑगस्ट २०१३ रोजी पहिल्यांदाच चिपळूण येथे THE SUCCESS BLUEPRINT हि कार्यशाळा घेतली. ६ तासांच्या या कार्यशाळेतून उपस्थितांना एक अभूतपुर्व अशी अनुभूती श्री. अतुल राजोळी यांनी दिली.
मित्रांनो २४ सप्टेंबर २०१३ ला चिपळूण नंतर मुंबई बाहेर कराड येथे आपण लक्ष्यवेधचा प्रास्ताविक सेमिनार घेतला. चिपळूण प्रमाणेच कराड येथील मंडळीनी लक्ष्यवेध ला भरभरून प्रेम दिलं.
कराड येथे आपण लक्ष्यवेधचा प्रास्ताविक सेमिनार
२४ ऑक्टोबर २०१३ रोजी आपण दुसर्यांदा लोकाग्रहस्तव विश्वास निर्मिती वेगवान प्रगती ही कार्यशाळा कर्नाटक संघ सभागृह माटुंगा येथे हाउसफुल प्रतिसादात घेतली. उपस्थित सर्व या कार्यक्रमामुळे खूप खुश होते व एका वेगळ्या विषयाला त्यांनी इतकं उचलून धरलं हि खरच खूप आनंदाची बाब होय.
विश्वास निर्मिती वेगवान प्रगती
२७ ऑक्टोबर २०१३ ला आपली एन. एल. पी. ची नववी बॅच यशस्वीरित्या पूर्ण झाली. या उपक्रमाच्या माध्यमातून आत्तापर्यंत आपण १७५ हून अधिक प्रक्टीशनर घडवलेत. तसेच या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्यांची कामगिरी देखील जबरदस्त होती.
एन. एल. पी. ची नववी बॅच
११ नोव्हेंबर २०१३ ला सतरावा लक्ष्यसिद्धी सोहळा एकदम दिमाखात कर्नाटक संघ सभागृह, माटुंगा येथे संपन्न झाला. या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्यांनी धमाकेदार कामगिरी केली व यशस्वीरित्या त्यांचे प्रोजेक्ट पूर्ण केले. या कार्यक्रमास सुप्रसिद्ध हेडहंटर श्री. गिरीश टिळक सर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. त्यांनी 'बिझनेस नेटवर्किग' या विषयावर उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
सतरावा लक्ष्यसिद्धी सोहळा
२०१३ मध्ये घडलेली अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे चिपळूण नंतर मुंबई बाहेर आपण १२ नोव्हेंबर २०१३ ला कराडची पहिली बॅच सुरु केली. मुंबई आणि चिपळूण प्रमाणेच कराड येथील प्रशिक्षणार्थ्यांनी लक्ष्यवेध या उपक्रमास उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
१९ डिसेंबर २०१३ रोजी लक्ष्यवेध ADVANCE च्या चौथ्या बॅचचा उद्योगस्फुर्ती सोहळा अगदी ग्रॅन्ड स्वरुपण दिमाखदार पद्धतीने बी. एन. वैद्य सभागृह, दादर पूर्व येथे साजरा झाला. या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्यांची कामगिरी हि खरोखरच थक्क करणारी होती. फक्त दीड वर्षाच्या कालावधीत त्यांनी त्यांच्या व्यवसायात उत्तुंग अशी झेप घेतली. तसेच तब्बल १२ उद्योजक प्रशिक्षणार्थ्यांनी त्या दिवशी ५०० हून अधिक उपस्थित प्रेक्षकांसमोर आपल्या व्यवसायाचे प्रेझेनटेशन सादर केले. आनंदाची बाब म्हणजे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून तीन जबरदस्त असे व्यक्तिमत्व लाभले. ते म्हणजे निर्माण ग्रुप चे श्री. राजेंद्र सावंत सर आणि श्री. अजित मराठे सर व मराठी व्यापार परिषदेचे श्री. अनंत भालेकर सर. हा उद्योगस्फुर्ती सोहळा म्हणजे याची देही याची डोळा स्वरुपात साजरा झाला. प्रमुख पाहुण्याच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाने हा कार्यक्रम परिपूर्ण झाला.
चौथा उद्योगस्फुर्ती सोहळा
२० डिसेंबर २०१३ ला BAM ( Businessman Association of Maharashtra ) यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास श्री. अतुल राजोळी ह्यांना प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रित केले होते. या कार्यक्रमात श्री. अतुल राजोळी यांनी माणसे जोडुया, जग जिंकूया या विषयावर उत्कृष्ट अस मार्गदर्शन केलं. उपस्थित उद्योजकांना व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने उपयुक्त असं मार्गदर्शन यातून मिळाले.
२२ डिसेंबर २०१३ ला ग्राफोलोजीची ७ वी बॅच यशस्वीरित्या पूर्ण झाली. या बॅचचे प्रशिक्षणार्थी खूपच उत्साही व खुश होते. एका वेगळ्या विषयाला इतक उचलून घेणे आणि प्रेम करणे याने समस्त बॉर्न टू विन चा परिवार नेहमीच भारावून जतो.
ग्राफोलोजीची ७ वी बॅच
एकूणच २०१३ हे वर्ष बॉर्न टू विन साठी आगळा वेगळा अविस्मरणीय व आनंद देणारे ठरले. पूर्वीपेक्षा या वर्षी जबाबदाऱ्या ह्या अजून वाढल्या आहेत. प्रशिक्षणार्थ्यांच्या अपेक्षादेखील वाढल्या आहेत. त्यांच प्रेम व पाठींबा हा आमच्यासोबत नेहमीच असतो आणि हेच आमचं मनोधैर्य नेहमीच वाढवत असते.
२०१३ या वर्षाने खूप काही दिले नव्या चांगल्या समजुती, नवी आशा, नवे बळ, नवीन स्वप्न व नवीन संध्या. आता नवीन महत्वाकांक्षा घेऊन बॉर्न टू विन २०१४ च स्वागत करत आहे.
२०१३ चे खूप धन्यवाद आणि सुस्वागतम २०१४!
मित्रांनो, २०१३ प्रमाणेच २०१४ ची सुरुवात देखील आपण एका धमाक्याने करीत आहोत. या वर्षाची सुरुवात देखील THE SUCCESS BLUEPRINT या कार्यशाळेने करत आहोत. तर तुमच्या या नववर्षाची सुरुवात तुम्ही ह्या धमाकेदार पद्धतीने करण्यासाठी या कार्यक्रमात सामिल व्हा.
धन्यवाद!
कृपया खालिल व्हिडिओ पहा...
No comments:
Post a Comment