LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

29 October 2011

स्टीव्ह जॉब्स: 'मरावे पण किर्ती रुपी उरावे...'

नमस्कार मित्रांनो!
याच महीन्यात अ‍ॅपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांचे निधन झाले. स्टीव्ह जॉब्स या व्यक्तीबद्दल मला प्रचंड आदर आहे. त्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात केलेले योगदान प्रचंड मोठे आहे. जी व्यक्ती ग्रॅज्युएट देखिल नाही, कॉलेजचा चेहरापण कधी ज्या व्यक्तीने पाहिला नाही त्या व्यक्तीने सर्वसाधारण व्यक्तीचा तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला व आपण कल्पना ही करु शकत नाही असा क्रांतीकारक बदल संपुर्ण जगात घडवून आणला.
स्टीव्ह जॉब्स यांनी २००५ साली स्टॅनफॉर्ड विद्यापिठात अतिशय स्पुर्तीदायक असे भाषण केले होते. या भाषणातील "Stay Hungry, Stay foolish" हे वाक्य माझ्यासाठी नेहमीच दिशादर्शक ठरले... Thank You Steve Jobs...! तेच भाषण आपणास पाहण्यासाठी खाली उपलब्ध करुन देत आहे. त्याच प्रमाणे, लोकसत्ता या वृत्तपत्रात आलेल्या स्टीव्ह जॉब्स यांच्या भाषणाचा गिरीष कुबेर यांनी केलेला अनुवाद देखिल आपणास वाचण्यासाठी उपलब्ध करून देत आहे.
दिनांक ६ ऑक्टोबर २०११ रोजी स्टीव्ह जॉब्स मरण पावले. परंतु त्यांच्या योगदानाच्या रुपात ते नेहमीच आपल्या मनात जीवंत राहतील. We miss you Steve.....
कृपया Steve Jobs यांच्या भाषणाचा अनुवाद जास्तीत जास्त लोकांना वाचण्यास प्रवृत्त करा. धन्यवाद..!






अन्यथा.... : उद्याच्या ‘अॅपल’कारांसाठी..




गिरीश कुबेर, शनिवार, ३ सप्टेंबर २०११
girish.kuber@expressindia.com


मित्रानो, मला तुमच्यासमोर भाषणासाठी संधी मिळाली, याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे. इतक्या प्रतिष्ठित विद्यापीठातील बुद्धिमान मुलांसमोर बोलायला मिळणं, हा मला माझा मोठा सन्मान वाटतो. खरं सांगायचं विद्यापीठाशी माझा संबंध आला तो हा असा आणि इतकाच. कारण तुमच्यासारखं असं माझं शिक्षण कधीच झालं नाही. आता तुमच्यासमोर आलोच आहे, तर मला तीन प्रमुख गोष्टी तुमच्यासमोर उघड करायच्या आहेत.
पहिलं म्हणजे मी माझं महाविद्यालयीन शिक्षण कधीच पूर्ण करू शकलो नाही. सहा महिन्यांतच मला इथल्या वातावरणाचा कंटाळा आला. नंतर कसंबसं वर्ष काढलं मी महाविद्यालयात. पण मी इथं कधी रमलोच नाही. हे असं का झालं असावं? माझ्या दृष्टीनं याची कारणं माझ्या जन्मातच असावीत. माझी आई अविवाहित असतानाच तिला मी झालो. बाळंत झाली तेव्हा ती महाविद्यालयात शिकत होती. तेव्हा तिची परिस्थिती लक्षात घेता तिनं मला दत्तक द्यायचं ठरवलं. एक वकील आणि त्याची सुविद्य पत्नी मला दत्तक घेणार होते. पण ऐन वेळी ते म्हणाले त्यांना मुलगी हवीये. तेव्हा माझी आई चिडली. तिची अट होती की कोणा पदवीधरालाच मला दत्तक द्यायचं. पण हे असं घडलं. तेव्हा ऐन वेळी जो समोर आला, त्याला तिनं मला देऊन टाकलं. अट एकच. मला महाविद्यालयात शिकू द्यायचं. तेव्हा माझे आताचे जे आईवडील आहेत, ते मला लाभले.
गरीब होते ते. पण त्यांना मी शिकावं असं प्रामाणिकपणे वाटत होतं. माझ्या खऱ्या आईच्या इच्छेला मान देत त्यांनी मला शिकू द्यायचं ठरवलं. तेव्हा मी महाविद्यालय निवडलं ते अगदी महागडं होतं. अगदी स्टॅनफोर्डइतकं. माझं म्हणणं शिकायचं तर मग स्वस्त महाविद्यालयात कशाला जा. पण खरं सांगायचं तर त्यात काहीही अर्थ नव्हता. कारण मी जे काही शिकत होतो, त्यातलं काहीही मला आवडत नव्हतं. एकीकडे पोटाला चिमटा काढून माझी फी भरणारे माझे आईवडील आणि ओढूनताणून शिकणारा मी. १७ वर्षांचा होतो, तेव्हा हे जाणवलं. मग ठरवलं. हे फारच होतंय. आयुष्यात काय कराचंय ते दिसत नाहीये आणि तरीही आपण आईवडिलांचे घामाचे पैसे असे उधळतोय. हे बरोबर  नाही. त्याच क्षणी निर्णय घेतला. हे नावडतं शिकणं थांबवायचं. बाहेर पडलो महाविद्यालयातून. मोकळा श्वास घेतला. एव्हाना जाणवलं होतं, आपण जे काही करतोय ते फारच स्वप्निल आहे. मित्राच्या वसतिगृहावर राहायला गेलो. इतरांच्या रिकाम्या कोकच्या बाटल्या  वगैरे विकून जेवायला चार पैसे मिळाले तर मिळवायचो. आठवडय़ातून एकदा मात्र पलीकडच्या गावातल्या हरे कृष्ण मंदिरात जायचो. अर्थात तिथे काही भक्ती वगैरे होती म्हणून नाही. तर तिथे आरतीनंतर मोफत जेवण मिळायचं म्हणून. पण तिथे जायलाही पैसे नसायचे. तेव्हा चालत जायचो. म्हणजे जायचेयायचे १४ किमी अंतर मी चालायचो. या काळात मला प्रश्न पडायचा. मला नक्की काय आवडतंय. तेव्हा लक्षात आलं. आपलं सुलेखन कलेवर प्रेम आहे. मग ते शिकायला लागलो. अक्षरांचे आकार, त्यांचे तलम पोत मला फार आवडायचे. अक्षरांच्या नुसत्या मांडणीतूनसुद्धा काही सांगता येतं, असं मला वाटायचं. आपण त्यांना कसं सादर करतो, यावर बरंच काही अवलंबून असतं, हे मला जाणवलं. त्यामुळे मी त्या कलेचं शिक्षण घ्यायला लागलो. जे शिकतोय त्याचा काय उपयोग, नोकरी मिळणार आहे का त्यामुळे, वगैरे फालतू प्रश्नांनी मी मला विचलित होऊ देत नव्हतो. आवडतंय ना.. शिकायचं. इतकाच तो विचार.
पुढे १० वर्षांनी जेव्हा मी माझा पहिला संगणक तयार केला, तेव्हा या सुलेखन कलेचा उपयोग झाला. कारण इतरांच्या तुलनेत माझ्या संगणकाचा कळफलक जास्त चांगला आणि सुलेखनासाठी उपयुक्त असलेला होता. मी तेव्हा जे शिकलो, ते हे असं उपयोगी आलं. मग जाणवलं, बरंच झालं आपलं महाविद्यालय सुटलं ते. मी असा त्या वेळी बाहेर पडलो नसतो, तर हे काही जमलंच नसतं.
दुसरी गोष्ट माझ्या उद्योगाची. मी आणि वॉझ यांनी माझ्या वडिलांच्या गॅरेजमध्ये पहिला संगणक तयार केला. बरीच खटपट करावी लागली. चांगलं फळ आलं त्याला. तेव्हा आम्ही नाव दिलं आमच्या संगणकाचं अ‍ॅपल. हे जमलं तेव्हा मी जेमतेम २० वर्षांचा होतो. मग आम्ही दोघांनी कंपनीच काढली. पुढच्या १० वर्षांत आम्हा दोघांच्या कंपनीत चार हजारजण नोकरीत होते आणि अ‍ॅपलचा आकार २०० कोटी डॉलर्सचा झाला होता. आमचा पहिला मोठा संगणक जन्माला आला होता. मॅकिंतोश. मी तेव्हा तिशीत होतो. तिथे दुसरा धक्का बसला.
मला माझ्या भागीदारानं कंपनीतून काढूनच टाकलं. मला प्रश्न पडला. मीच जी कंपनी जन्माला घातली, तिथून मलाच कसं काय हे लोक बाहेर काढतात. पण तसं झालं होतं खरं. तेव्हा मी ठरवलं, या प्रश्नाच्या उत्तरात रक्त आटवायचं नाही. नवं करूया काहीतरी. खरं तर समोर अंधार होता. पण म्हटलं हरकत नाही. जमेलच आपल्याला काही ना काही. तशी खात्री होती. कारण माझं माझ्यावर प्रेम होतं. शांत बसलो. स्वत:लाच विचारलं. झालं ते झालं. आपल्याला आता काय करायला आवडेल. माझं पहिलं प्रेम होतं ते अर्थातच अ‍ॅपल. दुसरं काय? तर तेही अ‍ॅपलच. मग दुसरी संगणक कंपनी काढायची मी ठरवलं. तिला नाव दिलं नेक्स्ट. पाठोपाठ दुसरा उद्योग सुरू केला पिक्सर नावानं. जगातली पहिली अ‍ॅनिमेशन फिल्म मी केली. तिचं नाव टॉय स्टोरी. आजही तिची लोकप्रियता कमी झालेली नाही. याच काळात माझ्या कंपनीचा विस्तार इतका झाला की अ‍ॅपलला पुन्हा मोह झाला या कंपन्या घेण्याचा. कारण मी विकसित केलेलं तंत्रज्ञानच तसं होतं. शेवटी अ‍ॅपलनं या कंपन्या विकत घेतल्या. मी आपोआपच पुन्हा अ‍ॅपलमध्ये आलो. अ‍ॅपलचा सध्याचा जो काही विस्तार सुरू आहे तो मी नेक्स्ट आणि पिक्सरमध्ये जे काही केलं, त्याच्या जोरावर. इथंच मला माझी जीवनसाथी मिळाली. लॉरीन आणि माझा संसार उत्तम सुरू आहे.
मागे वळून बघितल्यावर आता मला वाटतं, अ‍ॅपलनी मला हाकललं नसतं तर नेक्स्ट आणि पिक्सर जन्माला आल्या असत्या का? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मला लॉरीन मिळाली असती का?
माझी तिसरी गोष्ट मरणाविषयीची आहे.
सतराव्या वर्षी मी कुठेतरी वाचलं होतं, ‘‘आपण प्रत्येक उगवणारा दिवस हा आपला जणू शेवटचाच दिवस आहे असं जगायला लागलो तर एखादा दिवस असा उजाडतो की त्या सगळय़ा जगण्याचा अर्थ कळतो.’’ हे वाक्य माझ्या डोक्यात सतत गुंजत असतं. मरणाचं भान सतत असलं मनात तर आपण वेळ वाया घालवत नाही. यशापयश, मानापमान वगैरे सर्व भौतिक भावना मरणात संपून जातात. आपण काहीतरी गमावणार आहोत ही भावना मृत्यूच्या जाणिवेने आपल्याला नग्न करत असते. याचं भान आलं की एकच प्रश्न त्यावर पुरून उरतो. आपण जो काही वेळ आपल्याला मिळाला.. त्याचं काय केलं? तो सत्कारणी लावला का? हा प्रश्न माझ्या डोक्यातून कधी जात नाही.
गेल्या वर्षी कर्करोग झाल्याचं निदान झालं. ते कळल्यावर डॉक्टरांनाच वाईट वाटलं. कारण हा अगदी दुर्मीळ असा कर्करोग आहे. स्वादुपिंडाचा. डॉक्टर म्हणाले, तयारीला लागा.. शेवटच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करून घ्या.. जेमतेम तीन महिने तुम्हाला मिळतील.
मी घरी गेलो. दोन दिवसांनी माझी बायोप्सी करायची होती. त्यासाठी मला डॉक्टरांनी भूल दिली. घशातून एंडोस्कोप पोटात सोडला अणि माझ्या स्वादुपिंडाच्या काही पेशी घेऊन तो बाहेर आला. मी बेशुद्धच होतो. पण लॉरीन ते सगळं पडद्यावर बघत होती. ती म्हणाली, एंडोस्कोप बाहेर आल्यावर डॉक्टरच रडायला लागले. कारण त्यांना लक्षात आलं, परिस्थिती काही इतकी वाईट नाही. शस्त्रक्रिया केली तर मी वाचू शकेन. तशी ती शस्त्रक्रिया झाली आणि मी वाचलोदेखील.
मृत्यूच्या या स्पर्शानं मला बरंच काही शिकवलं. मरणाइतकं काहीही शाश्वत नाही. आपल्याला वेळ कमी असतो आणि तरीही त्यातला मोठा वाटा आपण वायाच घालवतो. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, मला सांगायचंय ते इतकंच की.. इतरांची मतं, त्यांचे जगण्याचे निष्कर्ष, मार्गदर्शन या गोंडस नावाने त्यांच्याकडून लादली जाणारी मतं.. याचा कसलाही विचार करू नका.. इतरांच्या मतांचं ओझं कधीही वागवू नका.. जे काही जगायचंय ते स्वत:च आयुष्य जगा. तुम्हाला आयुष्यात काय आवडतं ते तुमच्या मनाला माहीत असतं.. त्याचं तेवढं लक्ष देऊन ऐका. बाकीचं सगळंच दुय्यम असतं. धन्यवाद.
(अ‍ॅपलचा जन्मदाता स्टीव्ह जॉब्स नुकताच कंपनीतून पायउतार झाला. त्याआधी स्टॅनफोर्ड विद्यापीठानं त्याला विद्यार्थ्यांसमोर भाषणासाठी बोलावलं होतं. तेथील भाषणाचा हा स्वैर अनुवाद.. उद्याच्या अ‍ॅपलकारांसाठी)

07 October 2011

अतुल राजोळी यांची लाइव मुलाखत झी २४ तास वर

नमस्कार मित्रांनो,
दिनांक ५ ऑक्टोबर २०११ रोजी बॉर्न टू विनचे संचालक अतुल राजोळी यांची लाइव मुलाखत झी २४ तास या वाहीनीवर 'हितगुज' या कार्यक्रमामध्ये आयोजित करण्यात आली होती. मुलाखतीचा विषय होता 'लघुउद्योजकीय व्यवस्थापन व विकास'
या मुलाखतीमध्ये अतुल राजोळी यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये लघुउद्योजकांना अनुसरुन व्यवसाय व विकास यांवर आधारीत प्रश्नांना उत्तरे दिली.

आपणास जर ही मुलाखत पहाण्याची संधी मिळाली नसेल, अथवा आपणास ही मुलाखत पुन्हा पाहण्याची इच्छा असेल, तर संपुर्ण मुलाखत आपण या ब्लॉगमध्ये खाली पाहू शकता. तीन भागांमध्ये ती इथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

फक्त क्लिक करा व पहा...

भाग १



भाग २



भाग ३



21 September 2011

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती - वॉरन बफे


१.त्यांनी वयाच्या अवघ्या अकराव्या (११) वर्षी शेअर बाजारात गुंतवणुक कर ण्यास सुरुवात केली. आणि तरी देखिल आपण खुप उशीरा सुरुवात केली याची त्यांना खंत आहे.
२. वृत्तपत्रे विकुन मिळवलेल्या कमाईतून त्यांनी एक छोटीशी शेत जमीन विकत घेतली. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी.
३. ते आजही मिड टाउन येथील त्यांच्या जुन्या ३ बेडरूमच्या घरात राहतात, जे त्यांनी ५० वर्षांपुर्वी त्यांच्या लग्नाच्या आधी घेतले होते. वॉरन बफे यांच्या मतेत्यांना मोठ्या घराची गरज नाही. आजही त्यांच्या घराला कुंपणाची भिंत नाही.
४. वॉरन बफे त्यांची कार स्वतःच चालवतात. त्यांना ड्रायव्हर अथवा सुरक्षारक्षकांची गरज नाही.
५. वॉरन बफे जगातील सर्वात मोठ्या विमान कंपनीचे मालक आहेत. पण ते कधीही स्वतंत्र विमानाने प्रवास करत नाहीत.
६. त्यांची कंपनी बर्कशायर हाथवेच्या (Berkshire Hathaway) मालकीच्या ६३ कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांच्या CEO's (कार्यकारी अधिकारी) ना ते फक्त वर्षाला एक पत्र लिहितात. सर्व CEO's ना त्यांनी दोन नियम सांगीतले आहेत. पहिला नियम, कधीही आपल्यागुंतवणुकदारांचे पैसे बुडणार नाहीत याची काळजी घ्या. दुसरा नियम, कधीही पहिला नियम विसरु नका.
७. त्यांना इतर उच्च वर्गीयांबरोबर वेळ व्यतीत करणे आवडत नाही. घरी आल्यावर स्वतःसाठी काही पॉपकॉर्न बनवुन चित्रपट बघणे हा त्यांचा आवडता छंद आहे.

८. बिल गेट्स या जगातील दुसर्‍या श्रीमंत माणसाची त्यांच्याशी पाच वर्षांपुर्वी भेट झाली. बिल गेट्सला तेव्हा वाटले की वॉरन बफें बरोबर बोलण्या सारखे काहीच नाही त्यामुळे त्यांनी मीटींग साठी केवळ अर्ध्या तासाचा वेळ दिला. मात्र प्रत्यक्षात हीभेट दहा तास चालली. आणि त्या भेटी नंतर बिल गेटस हे वॉरन बफे यांचे भक्तच झाले.
९. वॉरन बफे आजही मोबाइल फोन वापरत नाहीत. तरुणांसाठी वॉरन यांचा सल्ला - "क्रेडीट कार्ड पासुन दुर रहा. खरी गुंतवणुक स्वतःमध्ये करा."
-- पैशाने माणसाला घडवले नसुन माणसाने पैसा बनवला आहे.
-- जितकी साधे जीवनमान राखता येइल तितके साधे रहा.
-- ऐकावे जनाचे करावे मनाचे.
-- ब्रॅंड पाहुन खरेदी करु नका. आपल्याला जे आवडते तेच खरेदी करा.
-- अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करु नका. तेवढेच विकत घ्या ज्याची गरज आहे.
दरवर्षी मी काही धोरणे अवलंबतो, जी पुढे वर्षभर सर्व उलाढालीत माझ्यासाठी दिपस्तंभाचे काम करतात. आणि स्वत:च शिकून घेतलेल्या या धड्यांमुळे दरवर्षी माझे फ़क्त वयच वाढत नाही तर शहाणपणाही तेवढाच वाढतो।
१०. या वर्षी मी तुम्हा सर्वांना पुराणकाळापासून चालत आलेल्या (पण विस्म्रुतीत गेलेल्या) अशाच काही शहाण पणाच्या गोष्टी सांगणार आहे -

* अपार कष्ट करा : मेहनत कधिच वाया जात नाही, पण काम न करता केलेली बाप्ष्फळ बडबड 
मा
सा
ला लयास नेल्या खेरिज राहत नाही.

*
 
आळस झटकुन टाका :
वाळुवर झोपुन राहणारा खेकडा कोणत्याही लाटेबरोबर समुद्रात वाहुन जातो.
* ऊत्पन्न(मिळकत) : कधिही केवळ एका उत्पन्नाच्या साधनावर अवलंबून राहु नका. एका मर्गाने 
येणार्‍या 
०० रुपयांपेक्षा १०० मर्गांनी येणारा १-१ रुपया नेहमीच चांगला.

* खर्च - आवश्यकते पेक्षा जास्त खरेदी केली तर लवकरच आवश्यक असणारया गोष्टी विकाव्याची वेळ येईल.
*बचत - खर्च करुन उरलेले उत्पन्नाची बचत करण्यापेक्षा, आधी बचत करुन नंतर उरलेले पैसे खर्च करा.
* कर्ज - कर्ज घेणारा हा कर्ज देणरयाचा गुलाम हॊउन जातो.
* जमाखर्च - जमाखर्च मांडणे आणि त्याचा अभ्यास करणे अतिशय मह्त्वाचे आहे. जरबूटच फ़ाटला असेल तर पावसाळ्यात छ्त्रीचा काय उपयोग ?
* हिशोब तपासणे - लहान लहान खर्चांचा ताळेबंद ठेवा, एक छोट्याशा भोकामुळे पुर्णजहाज बुडू शकते.
* आर्थिक धोका - बरयाच इन्वेस्ट्मेन्ट्स भरपुर फ़ायदा देणरया आणी आकर्षक असतातमात्र त्यात तेवढाच धोका लपलेला असतो. त्यामुळे अशा इन्वेस्ट्मेन्ट्सचा जराकाळजीपुर्वक विचार करुन करा. जर नदीची खोली पहायची असेल तर दोन्ही पाय पाण्यातटाकुन कसे चालेल?
* गुंतवणुक - सर्व अंडी एकाच पारड्यात टाकुन कसे चालेल बरे?


मला खात्री आहे की जे या सर्व सुचनांचे आधीपासून पालन करत आहेत, त्य सर्वांचीआर्थिक परिस्थिती उत्तम असेल. आणी मी हे देखिल खात्रीपुर्वक सांगु शकतो, कि जे यासर्व सुचनांचे पालन करायचे ठरवतिल तेही लवकरच आर्थिक सुखाचा आनंद घेतिल. चला आपण सर्वजण हुशार हॊउया आणि एक सुखी, समाधनी आणी शांत जीवन जगुया.
माणुस आर्थिक गरजेपोटी आयुष्यभर धडपडत असतो, त्याचं मुख्य कारण म्हणजे माणसाने शाळा व कॉलेजमध्ये बरीच वर्षे शिक्षण जरी घेतले असले तरी पैश्याबद्दल त्याला काहीच शिकवलं गेलेलं नसतं. परिणामस्वरुपी माणुस पैश्यासाठी काम करायला शिकतो परंतु स्वत:साठी पैश्याकडून काम करवून घ्यायला मात्र कधीच शिकत नाही. बॉर्न टू विन सादर करत आहे, THE FINANCIAL BLUEPRINT SEMINAR जो आपल्या उत्पन्नाचे योग्य नियोजन करुन आजच्या महागाईने ग्रासलेल्या युगात आपल्याला आर्थिकदृष्ट्या सबळ बनविण्यास मार्गदर्शन करेल.

योग्य आर्थिक नियोजनाच्या मदतीने सर्वसाधारण माणुस करोडपती बनु शकतो व योग्य आर्थिक नियोजनाच्या अभावी करोडपती माणुस कंगाळ होऊ शकतो! एकविसाव्या शतकात आपल्याला आज खरी गरज आहे ती आर्थिक साक्षरतेची. THE FINANCIAL BLUEPRINT SEMINAR आपल्याला अत्यंत सोप्या व सरळ पद्धतीने आर्थिकदॄष्ट्या साक्षर बनवेल.
या प्रभावशाली कार्यक्रमात आपणास खालिल गोष्टींचे स्पष्टीकरण होईल
- देशातील आर्थिक व्यवस्थेबाबतची वस्तुस्थिती
- कष्टाची कमाई गिळंकृत करणारे साप
- महागाईवर मात
- आर्थिक व्यवस्थापनाचा पिरॅमिड
- कोणतीही तडजोड न करता, सन्मानाने व समृध्दीने निवृत्त कसे व्हावे?
- योग्य आर्थिक नियोजन कसे करावे?
- सुयोग्य गुंतवणुकीचे पर्याय व परिणाम

वक्ते: श्री. अरुण सिंह
श्री. अरुण सिंह, हे वेल्थ क्रिएटर या आर्थिक सल्लागार संस्थेचे संचालक आहेत व या क्षेत्रामध्ये ते गेले दहा वर्षे कार्यरत आहेत. आर्थिक साक्षरतेबाबत समाजामध्ये जनजागृती व्हावी या एकमेव ध्यासापोटी निरनिराळ्या कार्यक्रमांव्दारे आजपर्यंत हजारो लोकांपर्यंत अरुण सिंह पोहोचु शकले आहेत. आर्थिक व्यवस्थापनाविषयीचे प्रचंड ज्ञान असलेल्या अरुण यांना या क्षेत्रात वेल्थ विझर्ड असे संबोधले जाते!
 
दिनांकः २ अक्टोबर २०११
वेळः ठिक संध्याकाळी ६ वाजता
स्थळ: टेक्सटाईल कमिटी हॉल, टाटा प्रेस जवळ, प्रभादेवी, दादर (प.)

गुंतवणूक: रुपये ५०० फक्त

अधिक माहितीसाठी संपर्कः  022-22939375/6/7/8, 7666426654, 9619465689

04 September 2011

"एक अविश्वसनिय गोष्ट....विश्वासाची!" - श्री. अशोक खाडे

बॉर्न२विन संस्थेच्या लक्ष्यसिध्दी सोहळ्यात २६ ऑगस्ट ११ला ‘दास ऑफशोअर इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड’चे एम.डी. (व्यवस्थापकीय संचालक) श्री. अशोक खाडे हे प्रमुख पाहुणे होते. सांगली जिल्ह्यातील, तासगाव तालूक्यातील पेड हे त्यांचे गाव. श्री. अशोक खाडे यांच्या सक्त सूचना आहेत या गावातील एकाही माणसाच्या आईचे लुगडे फाटलेले असू नये. असेल तर तेथिल एका कापडाच्या दुकानात त्यांचा अकाऊंट आहे, त्या दुकानातून त्या माणसाने नवे लुगडे आईसाठी घेऊन जावे, फक्त दुकानात नोंद करावी. त्यांची अशीच आणखी एक अनोखी गोष्ट. त्यांच्या बीएमडब्ल्यू गाडीतून जाताना दादरला चित्रा टॉकिजजवळ गाडी आली की ते तिथल्या झाडाला नमस्कार करतात. गावातील देवळाचा जीर्णोध्दार त्यांनी केला आहे, असे सांगितले तर वाटेल तर त्यात काय विशेष? पैसे आहेत, म्हणून केला असेल. पण अशा सगळ्या गोष्टींमागे आहेत, त्यांच्या बालपणीचे काही प्रसंग जे त्यांनी मनाच्या हळव्या कप्प्यात जपून ठेवलेले आहेत. त्यांच्या बालपणात डोकावून आपणही त्यांची कहाणी जाणून घेऊ या. बॉर्न२विनचे संचालक अतुल राजोळी यांनी त्यांच्या या कहाणीला नाव दिले होते, ‘एक अविश्वसनिय गोष्ट....विश्वासाची!’


अशोक खाडे यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. अंधार व दारिद्र्य कायम सोबतीला. अशोक लहानपणी एकदा दळणाचा डबा घेऊन येत असताना, त्यांच्या हातून तो डबा पडला, सगळे पीठ सांडले. घरी आल्यावर आई म्हणाली, तेवढेच पीठ आपल्याकडे होते. शेजारी काही देतील तर ठिक नाहीतर उपाशी झोपावे लागेल. शेजार्‍यांनी मक्याची कणसे दिली ती या सहा भांवडांनी मिळून खाल्ली. पण या प्रसंगानंतर अशोक यांनी ठरवले, आपण शिकायचे, घराला बरे दिवस आणायचे. ते खूप मन लावून शिकत गेले. हुशार होतेच आणि जिद्द निर्माण झाली. गावातील शाळा सातवीपर्यंतच होती. आठवीपासून पुढे ते बोर्डींगमध्ये राहून शिकले. वर्गात अनेक ब्राम्हण मुले पण हा दलित घरातील मुलगा संस्कृतमध्ये पहिला आला. अकरावीनंतर त्यांना मेडिकलला जायचे होते. पण आर्थिक परिस्थितीमुळे ते तर केवळ अशक्य होते. माझगाव डॉकमध्ये ते अप्रेंटीस म्हणून कामाला लागले. नोकरी करतानाच अंशकालीन अभ्यासक्रम पूर्ण करून मेकॅनिकल इंजिनिअरींगमधील पदविकाही मिळवली. अशोक खाडे म्हणतात एक लक्ष्य असाध्य असेल तर लढाईच हरलो म्हणून हार मानू नका, ‘नेचर तसे फीचर’ तत्वाचा स्वीकार करा व दुसरे लक्ष्य समोर ठेवा. पण समोर काही लक्ष्य हे हवेच.

लक्ष्यवेधच्या प्रशिक्षणार्थ्यांचा लक्ष्यसिध्दी पुरस्कार देउन गौरव करण्यात आला

माझगाव डॉकमध्ये सरकारी नोकरी बरी चालली होती, कामाचा तर अजिबात ताप नव्हता. पण बहिणींची-चुलत बहिणींची लग्ने याला हा पगार पुरा पडणारा नव्हता. काम कमी म्हणजे टवाळक्या करीत आयुष्य काढणे. अशोक यांनी ठरवले, धोका घ्यायचा, नोकरी सोडायची व स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा. अगदी काही जमले नाही तर कोचिंग क्लासेसमध्ये शिकवून पैसा मिळवता येईल हा स्वत:बद्दलचा विश्वास होता. १०,००० रुपयांच्या भांडवलावर त्यांनी व्यवसाय सुरू केला. कंपनीचे नाव हा त्यांच्या मते खूप महत्वाच मुद्दा. खाडे इंजिनिअरींग नाव ठेवले तर कोणी बिझनेस देईल की नाही अशी शंका. अशोक यांनी वाचनालयात जाऊन, ‘हाऊ टू नेम अ कंपनी’ यासारखी पुस्तके वाचली. तिन्ही भावांच्या नावातील आद्याक्षरे (दत्ता, अशोक व सुरेश) डी-ए-एस घेऊन मग त्यांनी दास ऑफशोअर इंजिनिअरींग ठेवले. त्यांचे मोठे बंधू हनुमानाचे दास तोही एक अर्थ या नावात आहे. ओएनजिसीची ऑफशोअरची छोटी छोटी कामे ते घेत गेले. १९९५ मध्ये त्यांचे धाडस व कष्ट यांना यशाने प्रतिसाद दिला. माझगाव डॉकचे काम एक कॉंट्रक्टर सोडून गेला, ते १ कोटी ९२ लाखांचे काम ‘दास’ला मिळाले. यानंतर कामाच्या बाबतीत त्यांना मागे वळून बघायची आवश्यकता उरली नाही. नंतर ६ कोटी, १२ कोटी, ५० कोटी असा व्यवसाय वाढत गेला तो आता १२५ कोटीवर गेला असून ५५० कोटींच्या ऑर्डर कंपनीकडे आहेत. ४,५०० लोक त्यांच्याकडे काम करतात. माझगाव डॉकचे चेअरमनच आता त्यांच्याकडे सल्लागार म्हणून काम करतात. काटेकोर नियोजन हे त्यांच्या यशाचे गमल. प्रत्येक दिवसाचे, नव्हे प्रत्येक श्वासाचे प्लानिंग हवे असे ते सांगतात. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, मोका व धोका दोन्ही एकाचवेळी येतात, असे दृष्टांत देत ते बोलतात व श्रोत्यांना आपलेसे करतात.

मुंबईतील- बांद्रा येथील पहिला स्कायवॉक त्यांनी केवळ ५ महिने २४ दिवसांत बांधला. विक्रोळी, घाटकोपर येथील स्कायवॉक त्यांच्या कंपनीने बांधले. सायनसारख्या अती गजबजलेल्या ठिकाणचा स्कायवॉक त्यांनी कोणतीही तक्रार न येऊ देता बांधला. त्यांना त्याबद्दल पुरस्कारही मिळाला. नुकतेच त्यांना उद्योगरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.
श्री. अशोक खाडे उपस्थित प्रेक्षकांना मार्गदर्शन करताना
उद्योजकांच्या यशोगाथा कधी कधी आपल्याला वाचायला मिळतात. त्यात अशोक खाडे यांचे वेगळेपण म्हणजे सुरवातीलाच नमूद केलेले आहे. त्यामागची भावना व कारणे जाणून घेऊ. ते लहान असताना आईचे गुडघ्यावर फाटलेले लुगडे बघून त्यांच्या मनाला यातना होत. पण करता तर काही येत नव्हते. म्हणून आज ते म्हणतात, माझ्याच काय, गावातील कोणाच्याच आईच्या अंगावर फाटके लुगडे असू नये. त्यांचे वडिल दादरला चित्रा टॉकीजजवळ बसून चांभारकाम करीत. सावलीसाठी वडिलांनी झाडही लावले होते. त्यामुळे अशोक खाडे तेथून जाताना झाडाला नमस्कार करतात. आणि ज्या देवळात दलित म्हणून त्यांना प्रवेश नाकारला जात होता, त्याचाच त्यांनी जीर्णोध्दार केला. हुशार पण गरीब मुलांना ते साहाय्य करतात. अशा १८ मुलांनी एमपीएससी परिक्षा पास केली व शासनात ही मुले राजपत्रित अधिकारी झाली.

शाळेत असताना त्यांच्या शाईच्या पेनचे निफ तुटले तर नवे घेण्यासाठी त्यांच्याकडे चार आणे नव्हते. ते त्यांच्या शिक्षकाने दिले व मग ते पेपर लिहू शकले. आज तेच अशोक खाडे १०,००० रुपयांचे सोन्याचे निफ असलेले मॉन्ट ब्लॉक पेन वापरतात. इतकचे नाही तर दुबईत त्यांनी तेथिल राजाच्या भागीदारीत व्यवसाय सुरू केला, त्या राजाला साडे चार लाखांचे मॉन्ट ब्लॉक पेन भेट दिले! खाडे आता आंतरराष्ट्रीय उद्योजक झाले आहेत. मध्यपूर्वेतून इतर देशातही आता ते विस्तार करतील आणि त्याचबरोबर आपल्या मुळ गावी त्यांनी शंभर एकर जमीन विकत घेतली आहे. गावाकडे त्यांचे लक्ष असते. त्याच्या भल्यासाठी ते काही काम करत असतातच. असा हा मुळांशी घट्ट बांधिलकी जपणारा भावूक उद्योजक!
बॉर्न२विन संस्था उद्योगक्षेत्रातील अशा कर्तृत्ववान व्यक्ती सातत्याने समाजासमोर आणत असते, त्यांना धन्यवाद.
-उदय कुलकर्णी:  ९८६९६७२६९६
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites