LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

15 March 2016

ब्रॅंडींग बद्दलच्या ३ गैरसमजुती - अतुल राजोळी

नमस्कार! 'ब्रॅंड' हा शब्द जेव्हा एखादा लघुउद्योजक ऐकतो, तेव्हा ती संकल्पना त्याच्या व्यवसायाला लागु पडत नाही असचं त्याला वाटतं. बहूतांशपणे लघुउद्योजकांना 'ब्रॅंडीग' बद्दल आकर्षण वाटत नाही. आम्हाला ब्रॅंड वगैरे बनवण्याची गरज नाही अशी त्यांची समजुत असते. लघुउद्योजकांच्या 'ब्रॅंड' बद्दलच्या काही गैरसमजुती त्यांना त्यांच्या व्यवसायाचा ब्रॅंड बनवण्यापासुन रोखुन ठेवतात, त्या पुढील प्रमाणे आहेत.
गैरसमजुत क्रमांक १: ब्रॅंड निर्मिती प्रक्रिया फार खर्चिक असते. 
ब्रॅंड निर्माण करण्यासाठी भरपुर पैसा खर्च करावा लागतो असं मुळीच नाही. 'शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ' हे आपण लहान पणापासुन ऐकत आलो आहोत. तसेच 'ब्रॅंड'चे आहे. कोणत्या 'आयडीया' वापरुन आपण आपल्या ब्रॅंडचा प्रसार करता ते निर्णायक ठरते.

गैरसमजुत क्रमांक २ : लोगो, टॅग लाइन व वेबसाईट म्हणजे 'ब्रॅंड'.
लोगो आपल्या ब्रॅंडची 'ओळख' असते. आपल्या प्रॉडक्टची 'पोझिशन' टॅग लाइनमुळे निर्माण होते. वेबसाईटमुळे लोकांना आपल्या व्यवसायाची ओळख निर्माण होते परंतु याचा अर्थ ब्रॅंडींग नव्हे. 'ब्रॅंड' निर्माण करण्यासाठी आपल्या प्रॉडक्ट बद्दल एक विशिष्ट प्रतिमा निर्माण करावी लागते. त्यासाठी विविध माध्यमांचा वापर करुन, काही कॄतीयोजना आखाव्या लागतात.

गैरसमजुत क्रमांक ३ : फक्त मोठ्या कंपन्यांचाच ब्रॅंड बनु शकतो.

ब्रॅंड च्या बाबतीत मोठा किंवा छोटा विचार करणे मुळात अयोग्य आहे. ब्रॅंड निर्माण करणे हे व्यवसायाच्या दुरगामी व्यवसायिक ध्येयावर अवलंबून असते त्यामुळे व्यवसायाच्या बाजारपेठेच्या आकाराचा विचार करुन ब्रॅंड निर्मितीचा विचार केला पाहीजे. व्यवसाय क्षेत्र जेवढं पसरलेलं असेल तेवढ्या प्रमाणात व तेवढ्या भागात प्रॉडक्टच्या‍ प्रतिमेचा प्रचार होणं गरजेचं असतं.

लघु उद्योजक आपल्या व्यवसाय क्षेत्राचा विचार करुन बाजारपेठेत आपल्या प्रॉडक्ट व सर्विसचा ब्रँड निर्माण करु शकतात.

आपल्या व्यवसायाचा 'ब्रॅंड' बनवण्यासाठी वैयक्तिक व व्यावसायिक विकास प्रशिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य प्रशिक्षक अतुल राजोळी यांची एक दिवसीय कार्यशाळा... 'A-Tool For BRANDING'.


दिनांक: २६ मार्च २०१६
वेळ: सकाळी १० ते संध्याकाळी ६
स्थळ: बॉर्न टू विन ट्रेनिंग हॉल, ४२-४३, काकड इंडस्ट्री, एस. कीर रोड, माटुंगा (प.)
अधिक माहीतीसाठी संपर्क साधा... 7666426654

05 March 2016

बिझनेस करा धडाकेबाज!- महेश कोठारे

“आयुष्यात कितीही संकटं आली, तरी घाबरायचं नाही. फिनिक्स पक्ष्यासारखं राखेतून पुन्हापुन्हा झेप घेत राहायची. बिझनेस करायचा तर धडाकेबाज! ज्याने प्रतिस्पर्ध्याचा उडाला पाहिजे थरथराट!! अशा खुमासदार शैलीत प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेता महेश कोठारे यांनी नव उद्योजकांना प्रोत्साहित केले. प्रभादेवीतील टेक्सटाइल कमिटी हॉलमध्ये मी उद्योजक नेटवर्किंग फोरमने शनिवारी आयोजित केलेल्या डेट विथ द ग्रेट कार्यक्रमात महेश कोठारे (एम. डी. कोठारे व्हिजन प्रा.लि.) यशस्वी उद्योजक या भूमिकेतून मार्गदर्शन करत होते. मी मराठी LIVE या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते.
आपल्या कारकिर्दीतील चढ-उताराचा आलेख मांडताना कोठारे म्हणाले, “माझे आईवडील दोघेही कलाक्षेत्रातील असल्याने आपसूकच मी सिनेमाकडे वळलो. छोटा जवान , राजा और रंक मधून लहानपणीच अभिनयाला यशस्वी सुरुवात केली; परंतु मोठेपणी हिरो म्हणून माझे चित्रपट एकापाठोपाठ आपटत गेले. अशा काळात वकिलीचे शिक्षण झाले असल्याने मी काही काळ वकिलीही केली; पण अपयशाने हार मानायची नाही, असा माझा स्वभावच होता. दिग्दर्शन आधीपासूनच माझे पॅशन होतेच. त्यातून मी स्वत: चित्रपट बनवायचे ठरवले. तेही अशा बिकट परिस्थितीत, जेव्हा माझ्या खिशात दमडीही नव्हती. मित्राकडून २० हजार रुपये उसने घेऊन मी एका निर्मात्याकडून प्यार किये जा या चित्रपटाचे हक्क विकत घेतले. हा चित्रपट साकारल्यावर मराठी चित्रपटसृष्टीत एकच धूमधडाका उडाला. पुढची २० वर्षे दे दणादण , थरथराट , धडाकेबाज , झपाटलेला , पछाडलेला , खबरदार ते झपाटलेला २ असे एकामागोमाग एक सुपरहिट सिनेमे दिले. या चित्रपटांनी मला नाव, प्रसिद्धी, पैसा असे सर्वकाही दिले.”
पण यश कधीही सर्वकाळ तुमची साथसोबत करत नाही, हे समजावून सांगताना कोठारे म्हणाले, “मी हिंदीत मासूम नावाचा सिनेमा दिग्दर्शित केला. त्याला चांगले यश मिळाले. तेव्हा आपणच हिंदी सिनेमाची निर्मिती का करू नये? या विचाराने मी लो मैं आ गया चित्रपट बनवला. या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या; पण तो सणकून आपटला. या चित्रपटाच्या अपयशाने मी आर्थिकदृष्ट्या २० वर्षे मागे गेलो. कर्जाची परतफेड, घरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना तारेवरची कसरत करावी लागली. एकवेळ अशी आली होती की, कोल्हापूरवरून चित्रपटाच्या शूटिंगवरून मुंबईला परतताना माझ्याजवळ स्वत:चे घरही उरले नव्हते; पण अपयशाची भीती मी कधीही बाळगली नाही. 


कुटुंबाचाही माझ्यामागे भक्कम पाठिंबा होता.” पछाडलेला , खबरदार च्या यशानंतर हळूहळू गाडी रुळावर आली. त्यानंतर छोटा पडदा गाजवण्यासाठी मी जय मल्हार चा प्रोजेक्ट हाती घेतला. त्यालाही तुफान यश मिळाले. मात्र, हे यशही सहजासहजी मिळाले नाही. तब्बल एक वर्ष कुठलेही उत्पन्न नसताना या मालिकेच्या रिसर्चचे काम सुरू होते. दीड वर्षाने मालिकेचे प्रत्यक्ष शूटिंग सुरू झाले आणि मिळकतही. त्याअगोदर शुभमंगल सावधान मालिकेचे कॉस्च्युम डिझायनिंग, सेट दर्जेदार करण्याच्या नादात नुकसान सोसले. त्याचे काम माझी पत्नी नीलिमा आणि नीता खांडके या कुटुंबातील सदस्यांनीच केल्याने मी तरून निघालो.
मी नेहमीच योग्य माणसे निवडण्यावर भर दिला, त्यांना कामात मोकळीक दिली. कामाच्या दर्जाला प्रथम प्राधान्य दिले. नफा-तोट्याचा विचार केला नाही. फक्त ओळखल्या प्रेक्षकांच्या गरजा. व्हिज्युअल इफेक्ट्स, डिजिटल साउंड, नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करून कल्पकतेने सिनेनिर्मिती केली. बिझनेस कुठलाही असो, तो करताना तुमच्यात पॅशन असली पाहिजे. तुम्हाला समोरच्याच्या गरजा ओळखता आल्या पाहिजेत, त्या दर्जेदारपणे पूर्ण करता आल्या पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचे अपयशात खंबीर उभे राहता आले पाहिजे, असा मोलाचा सल्लाही त्यांनी उद्योजकांना दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी उद्योजक चे विनय वाघ यांनी केले. तर फोरमचे संस्थापक स्वप्निल दलाल यांनी गेल्या तीन वर्षांत सदस्यांनी नऊ कोटी रुपयांहून जास्त रुपयांचे बिझनेस शेअर केल्याची माहिती दिली.

10 February 2016

दि सिक्रेट्स ऑफ व्हिजनरी बिझनेस

बॉर्न टू विन व लघुउद्योग भारती आयोजित सेमिनारला मुंबई व ठाणे येथिल उद्योजकांचा उदंड प्रतिसाद.
दिनांक १६ जानेवारी २०१६ रोजी ठाणे येथिल हॉटेल मौर्य येथे 'दि सिक्रेट्स ऑफ व्हिजनरी बिझनेस' हा कार्यक्रम बॉर्न टू विन व लघुउद्योग भारती तर्फे आयोजित करण्यात आला होता. 'बॉर्न टू विन' ही वैयक्तिक व व्यवसायिक विकास प्रशिक्षण क्षेत्रातील मुंबई येथिल अग्रगण्य संस्था आहे. लघु उद्योग भारती व बॉर्न टू विन यांच्या संयुक्त विद्यमाने त्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते बॉर्न टू विनचे संचालक व विख्यात बिझनेस कोच अतुल राजोळी. संध्याकाळी ५ ते ९.३० वाजेपर्यंत असलेल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित उद्योजकांना जबरदस्त मार्गदर्शन लाभले.
निरनिराळ्या क्षेत्रातील लघुउद्योग वेगात सुरु होतात प्रारंभिक यश मिळवल्या नंतर मात्र व्यवसाय एकाच कक्षेत राहतो. व्यवसायाची उत्तुंग प्रगती मात्र होत नाही. या मागच्या प्रमुख कारणांबाबत अतुल राजोळी यांनी आपल्या विशेष शैलीमध्ये व्याख्यान दिले. 'व्हिजनरी' व्यवसायांबाबत दाखला देत, लघुउद्योजक कसे आपल्या व्यवसायांअंतर्गत अयोग्य निर्णय घेतात व व्यवसायाच्या अधोगतीसाठी कारणीभुत ठरतात याबद्दल उद्योजकांचे डोळे उघडणारे सत्य अतुल राजोळी यांनी कार्यक्रमात मांडले. प्रारंभिक यशानंतर उद्योजकाच्या वागणुकीमध्ये त्याच्या नकळत पाच स्वभाव दोषांमुळे उद्योजक आपल्याच व्यवसायाच्या प्रगतीमधला अडथळा बनतो व याची त्याला जाणिवच होत नाही. वेळेतच उद्योजकांनी जर आपल्यातील स्वभाव दोषांवर मात केली तर व्यावसायिक प्रगती होण्यासाठी उद्योगाला योग्य दिशा लाभते.
कार्यक्रमाच्या पुढील भागात अतुल यांनी व्यावसायिक विकासाच्या पाच टप्प्यांबाबत माहिती दिली. प्रारंभिक टप्पा ते परिपक्व टप्पा पर्यंतच्या प्रवासादरम्यान प्रत्येक उद्योगाच्या एका टप्प्यातुन दुसर्‍या टप्प्यात स्थलांतर करताना उद्योजकाला अत्यंत महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. याबद्दल अतुल राजोळी यांनी अत्यंत सोप्या आणि विचार परिवर्तित करणार्‍या पध्दतीने सांगितले.
मध्यांतरानंतर कार्यक्रम आणखी रंगात आला. व्यवसायाच्या प्रगतीसाठी उद्योजकाला स्वतःमध्ये व्यावसायिक नेतृत्व गुण विकसित करावे लागतात. व्यावसायिक नेतृत्त्वाचे पाच स्तर कोणते व त्या स्तरांवरील उद्योजकांचे गुणधर्म कोणते हे अतुल राजोळी यांनी प्रभावीपणे मांडले. त्याच बरोबर जगातील प्रतिष्ठीत व अग्रगण्य 'व्हिजनरी' व्यवसायांची उदाहरणे देत, 'व्हिजनरी' व्यवसायांबाबतची सात रहस्ये अतुल राजोळी यांनी मांडली. विचार परिवर्तित करणारी ही रहस्ये भारावून  टाकणारी होती. लघुउद्योजकांनी आपल्या उद्योगाचे रुपांतरण करण्यासाठी व्यवसाय परिवर्तन प्रक्रीयेचा वापर केला पाहिजे व आपल्या व्यवसायाला पुढच्या ट्प्प्यात नेलं पाहीजे. असे प्रतिपादन कार्यक्रमात करण्यात आले. व्यवसाय परिवर्तन प्रक्रियेव्दारे आपल्या व्यवसायाचे रुपांतरण करणार्‍या काही यशस्वी उद्योजकांनी आपले मनोगतसुध्दा कार्यक्रमात मांडले. बॉर्न टू विनचे चीफ मेंटॉर व अनुभवी व्यवसाय मार्गदर्शक श्री. अतुल गोरे यांनी सुध्दा आपले विचार थोडक्यात मांडले व उद्योजकांना व्यवसाय विकासा संदर्भात अभ्यास करण्याचा सल्ला दिला.
लघुउद्योग भारतीचे ठाणे विभागाचे सचिव श्री. माधव पुजारीकोकण विभागाचे सचिव श्री. राजेंद्र पाटील हे सुध्दा कार्यक्रमात उपस्थित होते. लघुउद्योग भारतीव्दारे भविष्यात सुध्दा उद्योजकांसाठी असे कार्यक्रम करण्याबाबत त्यांचा मानस आहे.

लघुउद्योजकांच्या व्यवसायाचे प्रशिक्षण करण्यासाठी बॉर्न टू विनच्या कंसल्टंटस् बरोबर वैयक्तिक भेट घेण्यासाठी आपण ९६६४२२६२६० या नंबर वर संपर्क करु शकता.



08 January 2016

The Secrets of VISIONARY BUSINESS

A Paradigm Shifting Entrepreneurial Transformation Seminar

कोणताही उद्योजक व्यवसाय का सुरु करतो? उद्योजक हा प्रचंड ध्यास असलेला व्यक्ती असतो.  स्वतंत्र, स्वाभिमानी आणि स्वावलंबी! त्याची काही स्वप्नं असतात. जगात परिवर्तन घडवून आणण्याची त्याची महत्त्वाकांक्षा असते. आपले जीवन आपल्या शर्थीवर जगण्याची त्याची जिद्द असते. खर्‍या अर्थाने त्याला अर्थपूर्ण आणि समृध्द जीवन जगण्याचे स्वातंत्र्य हवे असते. स्वातंत्र्यप्रिय उद्योजकाला हे ठाऊक असते की, त्याचे व्हिजन वास्तवात साकार करण्यासाठी 'व्यवसाय'  हेच एकमेव माध्यम आहे. म्हणुनच उद्योजक मोठ्या हिम्मतीने, जोखिम घेऊन आपला व्यवसाय सुरु करतो.

रिसर्च असे सांगतो की, बहुतांश व्यवसाय आपले दुरगामी स्वप्नं साकार करण्यात अपयशी ठरतात. बर्‍याच व्यवसायांना प्राथमिक यश मिळते परंतू त्याच कक्षेत व्यवसाय अडकून राहतात.  दुरगामी प्रगती होत नाही. काहीतरी भव्यदिव्य साकार करण्याची मनातली इच्छा मनातच विझून जाते.  क्षमता असुन सुध्दा उद्योजक आपलं व्हिजन साध्य करण्यात अपयशी ठरतात, व बहूसंख्य उद्योजक असमाधानी जीवन जगतात. फारच कमी व्यवसाय जगात आपले वर्चस्व गाजवतात. आपलं 'व्हिजन' खर्‍या अर्थाने साकार करतात. जगात परिवर्तनाची लाट निर्माण करतात. व्यवसाय सुरु होण्यामागील उद्देश तसाच धगधगत ठेवतात. त्या व्यवसायाचा उद्योजकीय जनक अर्थपुर्ण आणि समृध्द जीवन तर जगतोच परंतु त्याच्या पश्चात देखिल व्यवसायाचा अमुल्य वारसा कायम राहतो. हे व्यवसाय फक्त यशस्वी नसतात, तर हे व्यवसाय 'व्हिजनरी व्यवसाय' असतात.


बॉन टु विन 'लक्ष्यवेध' सादर करत आहे... जगातील 'व्हिजनरी' व्यवसायांच्या अभ्यासावर आधारीत व प्रभावी उद्योजकीय नेतृत्त्व गुणांच्या संशोधनावर आधारीत अतुल राजोळी यांचा एक विचार परिवर्तित करणारा कार्यक्रम The Secrets of VISIONARY BUSINESS. भव्यदिव्य व्यावसायिक स्वप्नं आपल्या उराशी बाळगणार्‍या प्रत्येक उद्योजकाने या कार्यक्रमाला उपस्थित असणे अत्यावश्यक आहे.

ह्या कार्यक्रमात खालिल गोष्टींचा उलघडा होईल :-
१) व्हिजनरी व्यवसाय विचारसरणी.
२) व्यवसाय विकासाचे ५ टप्पे.
३) व्यवसायिक प्रगती न होण्यास कारणीभूत उद्योजकामधील उणीवा.
४) व्हिजनरी व्यवसायाबद्दलचे आपल्याला माहित नसलेले रहस्य.
५) व्यावसयिक नेतृत्त्वाचे ५ स्तर. 
६) व्यवसायाची संघटनात्मक बांधणी.
७) व्यवसाय परिवर्तन प्रक्रीया. 


हा कार्यक्रम कोणासाठी? 
१) वार्षिक आर्थिक उलाढाल रु. १ करोड किंवा जास्त असणार्‍या व्यवसायातील संचालकांसाठी.
२) कमीतकमी १०० वर्षे आपला व्यवसाय अस्तित्त्वात असावा अशी इच्छा असणार्‍या उद्योजकांसाठी.
३) आपल्या व्यवसायांमार्फत जगात लक्षणीय योगदान करण्याची जिद्द असणार्‍या उद्योजकांसाठी.
४) भविष्यात कमीतकमी रु. १०० करोड इतकी आर्थिक उलाढाल करण्याचे ध्येय असलेल्या उद्योजकांसाठी. 

प्रशिक्षक: अतुल राजोळी 
दिनांक: १६ जानेवारी २०१६
वेळ: ४ वाजता
Call or Whatsapp: 7666426654
Website: www.born2win.in
Facebook: www.facebook.com/atulrajoliborn2win

आयोजक: बॉर्न टु विन













सह आयोजक: लघु उद्योग भारती

 नेटवर्किंग पार्टनर: मी उद्योजक













प्रायोजक: ग्रेटर बँक 






ऑनलाईन मीडिया पार्टनर: मराठी इंफोलाईन








05 January 2016

संधी ओळखणाराच खरा उद्यमी - नीरज गुप्ता

उद्योग कुठलाही असो, तो करताना मी कमीपणा मानला नाही. मी डोअर टू डोअर कपड्यांचे मार्केंटींग केले. प्रसंगी माझ्याच कंपंनीत ड्रायव्हर बनून कारही चालवली. पण ग्राहकाला पूर्ण समाधान दिले. माझ्या सहकार्‍यांना नेहमीच कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवले. उद्योग ५० कोटींहून ५०० कोटींवर नेताना प्रोफेशनल अॅप्रोच अंगी बाळगला, असे सांगत गुप्ता यांनी नव उद्योजकांना यशाची सूत्रे समजावली.

आपल्या अवतीभोवती असंख्य घडामोडी घडत असतात, कळत नकळत बर्‍याच संधी आपल्यासमोर चालून येतात, परंतु त्या ओळखता न आल्यास वेळ आणि श्रम दोन्ही वाया जातात. खरा उद्योजक तोच, जो या संधी अचूक ओळखतो आणि त्याव्दारे आपल्या यशस्वी उद्योगाची मुहूर्तमेढ रोवतो, असे सांगत प्रसिध्द उद्योजक मेरु कॅबचे संस्थापक नीरज गुप्ता यांनी नव उद्योजकांना मोलाचा सल्ला दिला.     

शनिवारी प्रभादेवी येथील वस्त्र समितीच्या सभागृहात पार पडलेल्या 'मी उद्योजक' या बिझनेस नेटवर्किंग फोरमच्या 'डेट विथ ग्रेट' कार्यक्रमाला 'एसएमई' क्षेत्रातील उद्योजकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 'मी मराठी LIVE' या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते.



गुप्ता यांनी उपस्थित उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी स्वतःच्या खडतर वाटचालीचा पटच सर्वांसमोर सादर केला. यामुळे  आपापल्या क्षेत्रात भरारी घेण्यासाठी धडपडणार्‍या नव उद्योजकांना काही वेळ जणू स्वतःचेच प्रतिबिंब पाहत असल्याचा भास झाला.

गुप्ता म्हणाले, शाळा-कॉलेजच्या वयात सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमेलने, सहल आयोजनात नेहमीच पुढाकार घेत असल्याने माझे नेतृत्त्वगुण अवघ्या विशीतच तळपू लागले होते. कॉलेजच्या वयात इतर तरुणांप्रमाणेच अभ्यास कमी आणि इतर गोष्टींकडे माझे लक्ष असायचे. पण कॉलेजनंतर पुढे काय? या प्रश्नाने मलाही बेचेन करायला सुरुवात केली.  

सुरुवातीला नोकरीचा काटेरी अनुभव घेतला पण त्यापुढे करेन तर एखादा उद्योगच करेन, नोकरी करणार नाही, या निर्णयावर ठाम राहून नवनव्या उद्योगांत हात आजमावायला सुरुवात केली. इम्पोर्ट-एक्पोर्ट, गिफ्ट आर्टिकल सप्लायर, प्रिंटींग प्रेस, गारमेंट, गॅरेज, फर्निचर मेकिंग, फिल्म प्रोडक्शन, व्हेईकल सप्लायर इ. डझनभर उद्योग केले. या प्रत्येक उद्योगात मी यश, अपयशाची गोडी चाखली, पण गुंतवलेला पैसा कधीही गमावला नाही. शिवाय प्रत्येक उद्योगात कल्पकतेचाही पुरेपूर वापर केला. उदा. तोंडचलाखीने मला 'एचयूल' कंपनीला गिफ्ट आर्टिकल पुरवण्याचे कंत्राट मिळाल्यावर वाजवी दरासोबतच मी कंपनीचा 'लोगो' टाकून गिफ्ट आर्टिकल दिले. १९९९ मध्ये सामान्य गॅरेजपेक्षा दर्जेदार आणि कार कंपनीच्या सर्व्हिस सेंटरपेक्षा वाजवी अशी प्रीमियम सेगमेंटमधील गॅप भरुन काढणारे गॅरेज सुरु केले. यातूनच पुढे 'टीसीएस' ला वरिष्ठ अधिकारी, पाहुण्यांसाठी बस पुरवण्याचे कंत्राट मिळाले. या बसमध्येही मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, टीव्ही, नोटपॅड, एसी, फ्रीज इ. सुविधा दिल्या होत्या. ज्याचा विचार इतरांनी केला नव्हता.



एक-एक बस, कार जोडत २००१ मध्ये सुरु केलेल्या व्ही-लिंक नावाच्या कंपनीव्दारे मी पुढे नव्याने उदया आलेल्या 'बीपीओ' सेंटरला कार पुरवणारा सर्वात मोठा कंत्राटदार बनलो होतो. २००१ ते २००३ पर्यंत वर्षाला ३०० कार्स आणि १२ लाखांची उलाढाल असणारा माझा व्यवसाय केवळ सहा वर्षांमध्ये ५० कोटींपर्यंत गेला. तिथूनच पुढे २००७ मध्ये जीपीएस तंत्रज्ञानावरील 'रेडिओ कॅब' सुरु करण्याची संधी मी हुडकून काढली आणि त्यातही यशस्वी झालो. तब्बल ६५० कोटींहून जास्त उलाढाल असलेला मेरु 'रेडिओ कॅब' क्षेत्रातील नामांकित ब्रँड बनला आहे.

मी उद्योगात शिरलो तेव्हा मला कुणाचेही मार्गदर्शन नव्हते. मात्र 'मी उद्योजक' सारखी संस्था नव उद्योजकांना मार्गदर्शनासोबतच उद्योगवाढीसाठी व्यासपीठही देत आहे. हा अतिशय कौतुकास्पद उपक्रम असुन मला देखील संस्थेचा सदस्य व्हायला आवडेल, असे गुप्ता म्हणाले.

कार्यक्रमात 'मी उद्योजक' संस्थापक स्वप्नील दलाल यांनी नेटवर्किंग फोरमची संकल्पना, पुढील योजनेची माहिती दिली. तर 'बॉर्न टु विन' ट्रेनिंग सेंटरचे अतुल राजोळी यांनी 'हेल्प इच अदर, ग्रो टूगेदर' संकल्पनेमागचा गाभा समजावत सांगितला.


Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites