LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

04 September 2010

उद्योग साधना - चौथा लक्ष्यसिद्धी सोहळा

नमस्कार!
मित्रांनो, लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाची चौथी बॅच आता पुर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मला सांगायला अतिशय आनंद होत आहे कि या बॅचमध्ये प्रशिक्षणार्थ्यांच्या एकापेक्षा एक यशोगाथा बॉर्न टू विनच्या संपुर्ण टिमला अनुभवायला मिळत आहे. लक्ष्यवेधच्या या चौथ्या बॅचचा लक्ष्यसिद्धी सोहळा व लक्ष्यवेध स्नेहमेळावा येत्या १० सप्टेंबर रोजी दादरच्या बी. एन. वैद्य हॉल येथे संध्याकाळी सहा वाजता अगदी दणक्यात पार पडणार आहे. लक्ष्यवेधच्या या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्यांचा, त्यांनी लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमादरम्यान म्हणजेच गेल्या दहा आठवड्या दरम्यान केलेल्या कामगिरी बद्दल गौरव करण्यात येणार आहे.
लक्ष्यवेधच्या चौथ्या लक्ष्यसिद्धी सोहळ्याला लाभलेले प्रमुख पाहुणे हे एक असाधारण व्यक्तीमत्व आहेत. हो मित्रांनो, सांगायला अत्यंत आनंद वाटतो कि पितांबरी प्रॉडक्टस् प्रायवेट लिमीटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रविंद्र प्रभुदेसाई सर या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी असणार आहेत व एवढेच नव्हे तर श्री. रविंद्र प्रभुदेसाई सर उपस्थित लोकांना 'उद्योग साधना' या विषयावर एका मुलाखतीच्या माध्यमातुन मार्गदर्शन करणार आहेत.

घरातल्या घरात तांबे व पितळची भांडी धुण्याची पावडर तयार करुन विकण्याचा अत्यंत छोटा उद्योग ते देशविदेशभर व्याप असलेला व निरनिराळे दर्जेदार प्रॉडक्टस् चा आदर्श व्यवसाय हा गेल्या २० वर्षांचा पितांबरीचा प्रवास खरोखरच अविश्वसनिय आहे. हा प्रवास कसा होता? तो सुरु कसा झाला? त्या मागची प्रेरणा? प्रवासादरम्यान कोणत्या अडचणी आल्या? त्यांवर मात कशा प्रकारे करण्यात आली? पितांबरी कंपनीचा हा व्याप कसा वाढला? व पितांबरीचे ह्या पुढचे ध्येय व वाटचाल काय? ह्या सर्व गोष्टी प्रत्येक मराठी माणसाला स्फुर्तीदायक आहेत. ह्याच प्रामाणिक हेतुने बॉर्न टू विन घेऊन येत आहे पितांबरीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. रविंद्र प्रभुदेसाई सरांची खास मुलाखत 'उद्योग साधना'. मुलाखत घेतील बॉर्न टू विनचे संचालक श्री. अतुल राजोळी.
या कार्यक्रमाच्या माध्यमातुन लक्ष्यवेधच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांसाठी 'उद्योग साधना' हा कार्यक्रम म्हणजे एक सुवर्ण संधीच असेल. त्याच प्रमाणे त्यांच्या आप्तेष्टांना सुद्धा ह्या कार्यक्रमाचा लाभ घेता येईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य असेल. फक्त सोबत हवी आहे ती तुमच्या शुभेच्छांची!

श्री. रविंद्र प्रभुदेसाई सर यांच्या बद्दल थोडेसे:
- शिक्षण-विज्ञान शाखेतून पदवीधर, व्यवस्थापनाची पदवी ( डी. बी. एम.).
- पितांबरी उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक.
- पितांबरी प्रॉडक्टस् प्रा. लि. अंतर्गत होमकेअर व हेल्थकेअर या दोन विभागांत मिळून एकूण १३ उत्पादने.
- भारतातील १९ राज्यांमध्ये सक्षम मार्केटिंग नेटवर्क. त्याच बरोबर मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड व आखाती देशांमध्ये उत्पादनांची निर्यात.
- गुणवत्तावाढीसाठी सतत प्रयत्नशील. आय. एस. ओ. ९००१ - २००० प्रमाणपत्र पितांबरी प्रॉडक्टस् प्रा. लि. ला प्राप्त झाले आहे.
- यशस्वी उद्योजक पुरस्कार, उद्योगश्री पुरस्कार (२००३), मदर इंडिया अ‍ॅवॉर्ड, श्री फाउंडेशन चा उद्योगश्री पुरस्कार, कर्तृत्व गौरव पुरस्कार, ज्युवेल ऑफ टिसा, आदी पुरस्कारांनी सन्मानित.
लक्ष्यसिध्दी सोहळा व स्नेहमेळावा



दिनांक: १० सप्टेंबर २०१०

वेळः सायंकाळी ठीक ६:०० वाजता
स्थळः बी. एन. वैद्य सभागृह, किंग जॉर्ज हायस्कुल, दादर (पुर्व)
प्रवेश विनामुल्य

कार्यक्रमाचे पास हवे असल्यास कृपया संपर्क साधा: 022-22939375/6/7/8. 7666426654, 9619465689

18 August 2010

THE SUCCESS BLUEPRINT - उदंड प्रतिसाद



नमस्कार!
६ ऑगस्ट २०१० हा दिवस बॉर्न टू विन साठी अभुतपुर्व असा ठरला. बॉर्न टू विनचा महत्वाकांक्षी कार्यक्रम THE SUCCESS BLUEPRINT प्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिर (मोठे सभागृह) येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची वेळ सकाळी दहा वाजताची जरी असली, तरी सकाळी साडे आठ वाजल्यापासुन लोकांची वर्दळ सुरु झालेली होती. आम्ही Expect करत होतो की ४५० ते ५०० लोकं ह्या कार्यक्रमाला उपस्थित रहातील. कारण बॉर्न टू विनचा अशा पध्दतीचा कार्यक्रम आयोजित करण्याचा हा पहीलाच प्रयत्न होता. त्यात ६ ऑगस्ट हा दिवस Odd Working Day होता व कार्यक्रमाची वेळ सकाळची होती. नऊ सव्वा नऊ वाजेपर्यंत रविंद्र नाट्य मंदिरच्या सभागॄहा बाहेर भली मोठी रांग लागलेली होती. एवढी माणसे Odd Working Day च्या सकाळी पाहुन रविंद्र नाट्य मंदिरचे कर्मचारी देखील चकीत झालेले होते. त्यांच्या मते "शनिवार व रविवार शिवाय इतर दिवशी सकाळच्या वेळेला फक्त 'मराठी बाणा' व 'सही रे सही' या कार्यक्रमांनाच होते!" हे विधान आम्हाला सर्वांनाच प्रोत्साहित करणारे होते. THE SUCCESS BLUEPRINT कार्यक्रम ७५० ते ८०० लोकांच्या उदंड प्रतिसादात पार पडला.  त्या बद्दल सर्व प्रेक्षकांचे बॉर्न टू विनची संपुर्ण टिम मनापासून आभरी आहे.


परंतु इकडे मी एक गोष्ट प्रकर्षाने सांगु इच्छितो कि, हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आम्हाला फ्युचर पाठशालालक्ष्यवेधच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांची प्रचंड मदत झाली वर्तमानपत्रांमध्ये पहील्या पानांवर मोठ्या - मोठ्या जाहीराती न देता अश्या प्रकारचा असाधारण प्रतिसाद म्हणजे बॉर्न टू विनच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रेमाची पोच पावतीच म्हणावी लागेल. बॉर्न टू विनच्या प्रशिक्षणार्थ्यांचे निस्वार्थ हेतूने आम्हाला मदत करणे हे त्यांचे प्रेम नाही तर आणखी काय आहे? मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मनापासुन आभार.
त्याच प्रमाणे मला खास कौतुक करावेसे वाटते, ते म्हणजे बॉर्न टू विनच्या टिमचे! हो मित्रांनो THE SUCCESS BLUEPRINT कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यामागे जर सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो माझ्या टिमचा! त्यांच्या अहोरात्र मेहनतीचे फळ आम्हाला ६ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसादाच्या रुपात मिळाले. मी स्वतःला अतिभाग्यशाली समजतो कि मला अश्या उत्कृष्ट संघाचा एक भाग म्हणुन काम करण्यास संधी मिळत आहे व हा अनुभव सुंदर आहे.


विशेष आभारः THE SUCCESS BLUEPRINT कार्यक्रमाचे सहप्रायोजक NAVNEET PUBLICATIONS.


जाता जाता एवढच म्हणेण ...

काम करो ऐसा कि, पेहचान बन जाए...
हर कदम ऐसा चलो कि, एक निशान बन जाए!
यहा जिंदगी तो सभी काट लेते है...
जिंदगी ऐसे जियो कि, एक मिसाल बन जाए!

धन्यवाद ...
अतुल रजोळी
बॉर्न टू विन

Note:- आपण आपल्या प्रतिक्रीया, या पानावर आपल्या डाव्या हाताला असलेल्या Comments सेक्शन मध्ये Type करुन कळवू शकता.

28 July 2010

THE SUCCESS BLUEPRINT - एक अद्वीतीय सेमिनार

नमस्कार! BORN2WIN च्या संपुर्ण टिमच्या वतीने गुरु पौर्णिमेच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

गेल्या अडीच वर्षांमध्ये BORN2WIN - Training  & Consultancy Services च्या निरनिराळ्या सेमिनार्सचा फायदा आता पर्यंत ३०,००० पेक्षा जास्त लोकांना झालेला आहे. तसेच BORN2WIN च्या लक्ष्यवेध, फ्युचर पाठशाला इत्यादी प्रशिक्षणक्रमांचा फायदा आता पर्यंत ५,००० पेक्षा जास्त लोकांना झालेला आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये BORN2WIN ची कामगिरी खरोखरच लक्षणिय आहे, व गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने BORN2WIN च्या संपुर्ण टिमच्या वतीने मी आपणा सर्वांचे मनःपुर्वक आभार मानतो. आतापर्यंत जो विश्वास आपण आमच्यावर दाखविलात तो पुढे ही असाच कायम ठेवाल अशी मी आशा करतो.

प्रशिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असण्याचे माझे एकच उद्दीष्ट आहे ते म्हणजे, "To Inspire & Empower People & Organizations To Achieve What They Deserve & Desire." या एकाच ध्यासापोटी माझा प्रशिक्षणक्रमातील प्रवास सुरु आहे. आणि मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो कि माझे ज्ञान निरनिराळ्या क्षेत्रातील लोकांपर्यंत पोहचविण्यात बर्‍यापैकी यशस्वी ठरलेलो आहे. माझ्या निरनिराळ्या कार्यक्रमांद्वारे व प्रशिक्षणक्रमांद्वारे मी आत्मसात केलेले ज्ञान सोप्या पण तितक्याच परिणामकारक पध्दतीने शिकविण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. माझ्या कर्यक्रमांची विशेषता म्हणजे अत्याधुनिक वैयक्तिक विकास विषय व तंत्र मी मराठीमध्ये शिकवतो व मी जे काही शिकवतो ते Theory स्वरुपात नसुन लोकांना आचरणात आणता येतील असे Practicle Tools मी शिकवतो. कारण माझं नावच आहे... "Atul ... A - Tool To Empower Your Life!"

माझं असं ठाम मत आहे कि यश मिळवण्यासाठी मेहनतीची किंवा Hardwork ची गरज नसते. गरज असते ती Smartwork ची! आपण कमीतकमी परिश्रमांमध्ये व कमीतकमी कालावधी आपल्याला जे हवे आहे ते मिळवू शकतो! आणि हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवांवरुन सांगत आहे.

THE SUCCESS BLUEPRINT हा चार तासांचा आगळावेगळा कार्यक्रम येत्या ६ ऑगस्ट २०१० रोजी मी आपल्यासाठी घेउन येत आहे. आणि नेमकं हेच मी या कार्यक्रमामध्ये आपणासमोर मांडणार आहे कि कमीतकमी परिश्रमांमध्ये व कालावधीमध्ये आपण कसे यशस्वी होउ शकतो?

या कार्यक्रमामध्ये अतिप्रगत अशी तंत्रे मी आपल्याला शिकवणार आहे ज्याच्या मदतीने आपण आपल्याला जे हवे आहे ते मिळवू शकता! Hardwork न करता व Smartwork करुन! जे तुम्हाला हवे आहे ते... 'आरोग्य, ऐश्वर्य, यश आणि आनंद' तुम्ही कमीतकमी कालावधीमध्ये व कमीतकमी परिश्रमांमध्ये साध्य करु शकता.

THE SUCCESS BLUEPRINT हा एक Action Packed, Power Pcked, Motivational कार्यक्रम असणार आहे ज्याचा तुमच्या आयुष्यात नक्कीच प्रचंड फायदा होईल ...

तर मग विसरु नका...!

दिनांकः शुक्रवार, ६ ऑगस्ट २०१०

वेळः सकाळी १०:०० ते दुपारी २:००

स्थळः रविंद्रनाट्य मंदिर, प्रभादेवी, दादर (प.)

गुंतवणुकः रुपये ५००/-, ३५०/- व २००/-

प्रवेशिका मिळविण्यासाठी संपर्कः ०२२- २२९३९३७५/६/७/८, ९८२१८९८१७१, ८०९७७६२११०.




(Click on below To Enlarge Image)
(Click on below To Enlarge Image)

07 July 2010

मित्राची गुंतवणूक - प्रत्येकाने जरुर वाचावे असे पुस्तक

नमस्कार!

मित्रांनो, 'मित्राची गुंतवणूक' या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीच्या प्रकाशनाचा कार्यक्रम नुकताच शिवाजी मंदीर येथे पार पडला. श्री. अरविंद इनामदार, श्री. नितीन पोतदार व श्री. लोढा या मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्या निमित्ताने...

गुंतवणूकदारांना सल्ला देणारी अनेक पुस्तकं बाजारात आहेत. या पुस्तकांमध्ये थोडं वेगळं ठरेल, असं 'मित्राची गुंतवणूक' हे पुस्तक संजय गोविलकर यांनी लिहिलं आहे.

या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूकदारांना व वाचकांना आपल्या उपक्रमात सामावून घेण्याचा प्रयत्न लेखकानं केला आहे. त्यासाठी पुस्तकात गुंतवणूकदारांना येणारे अनुभव, चांगल्या व वाईट योजना इत्यादी लिहून ठेवण्यासाठी रिकाम्या जागा ठेवल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक वाचकांना स्वत:साठी संदर्भ डायरी म्हणूनही जपून ठेवता येणार आहे.

लेखक स्वत: पोलिस खात्यात अधिकारी असल्यानं गुंतवणूकदारांना फसविणाऱ्या कोणत्या योजना बाजारात आल्या होत्या, याची तपशीलवार माहितीही पुस्तकात आहे. सहा महिन्यांत पैसे डबल करणारी 'शेरेगर योजना', तीन महिन्यांत चौपट रक्कम करून देणारी 'वायूदूत डोमेस्टिक अँड इंटरनॅशनल' आणि आविष्कार एंटरप्रायझेस यांच्या योजना, 'टूरला गेला नाहीत तर दुप्पट पैसे परत करणारी' राजकमल टूर्स अँड ट्रॅव्हल्सची योजना, गाड्या घ्या, शेळ्या मेंढ्या पाळा, झाडे लावा योजना, परदेशी चलनांत लाखो रकमेची बक्षिसांचे आमिष दाखाविणारे ई-मेल पाठवून लुटणारी आंतरराष्ट्रीय टोळी, नायजेरियन फ्रॉड अशा अनेक योजनांची माहिती देऊन भारतीय रिर्झव्ह बँकेची मान्यता असलेल्या योजनांशिवाय इतरत्र कोठेही पैसे गुंतविण्यात येऊ नयेत, असा सल्लाही लेखक देतो.

आथिर्क व्यसनात फसलेल्या तरुणांना पुन्हा मार्गावर आणण्याचा प्रयत्नही यात आहे. त्यासाठी त्यांनी आतापर्यंत व्यसनावर केलेला खर्च कसा फुकट गेला आहे, हे साधीसोपी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. खरा मित्र कोण आणि उसने घेतलेले पैसे परत न करणारा दगाबाज मित्र कोण, यातील फरकही लेखकाने दाखवून दिला आहे.

पुस्तकात गुंतवणूकदारांच्या अनेक समस्यांचा विचार आहे. गुंतवणुकीवर भविष्यात उत्पन्न मिळावे, तसेच आजार व आथिर्क अडचणींत आधार कसा मिळवावा, यासाठी गुंतवणुकीची कोणती साधने आहेत, बँकांकडून कोणती कजेर् मिळू शकतात, याची माहितीही आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने मिळणारी बँकिंगची सेवा व उपलब्ध सुविधा यांचा आढावा घेऊन त्याविषयी जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

सुरक्षित व जोखमेची गुंतवणूक केव्हा व कोठे करता येईल, हे सहजपणे दाखविण्यासाठी आथिर्क नियोजनाचं उभारलेलं पिरॅमिड आणि कष्टाचे पैसे खाऊन गब्बर झालेला साप दाखविण्यासाठी मुखपृष्ठावरील सापशिडी खेळाचं चित्र परिणाम साधणारं आहे. पुस्तक छोटं असलं तरी गुंतवणूकदारांना उपयोगी आहे.

.........................................................

मित्राची गुंतवणूक
संजय गोविलकर
जीवनरंग प्रकाशन
पाने : १४८ किंमत : १५० रुपये

संपर्कः ९६६४३७५५०१

17 June 2010

लक्ष्यसिध्दीच्या सहा महत्त्वाच्या पायर्‍या

नमस्कार!

गेल्या रविवारी दिनांक १३ जुन २०१० रोजी लक्ष्यवेधचा प्रास्ताविक कार्यक्रमाचा सेमिनार रविंद्रनाट्य मंदिरच्या मिनी ऑडीटोरीयम मध्ये पार पडला. हॉल हाउसफुल होता, नव्हे तर लोकांनी अक्षरशः ओथंबून वाहत होता. काही लोकं हॉलच्या पायर्‍यांवर बसुन कार्यक्रम पहात होते. लक्ष्यवेध कार्यक्रमाची वाढती लोकप्रियता लक्षात घेता एवढं तर मी नक्कीच सांगु शकतो कि आज लोकांना लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमासारख्या कार्यक्रमांची खरोखरचं खुप गरज आहे. गेल्या वर्षभरामध्ये ३५० पेक्षा जास्त मराठी व अमराठी प्रोफेशनल लोकांनी (नोकरदार, स्वयंरोजगार व उद्योजक) लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाचा लाभ घेतला आहे व सेमिनार बद्दल सांगायचे झाले तर २००० पेक्षा जास्त लोकांनी गेल्या वर्षभरामध्ये लक्ष्यवेध अंतर्गत राबवण्यात येणार्‍या कार्यक्रमाचा लाभ घेतला आहे.

प्रशिक्षण क्षेत्रामध्ये पाऊल टाकण्यापुर्वी पासुनच मी सतत स्वतःला प्रश्न विचारला कि, "काही माणसे इतर बर्‍याच माणसांपेक्षा जास्त यशस्वी का होतात? ते असे काय करतात जे इतर बरीच माणसे करत नाहीत?" या एका प्रश्नाभोवतीच माझा अभ्यास व प्रशिक्षणक्षेत्रातील प्रवास सुरु झाला. भरपुर पुस्तके, यशस्वी माणसांबाबतचे संशोधन, निरनिराळे प्रशिक्षण या सर्व माध्यमांच्या सहाय्याने मला हे लक्षात आले कि आयुष्यात यश मिळविणे ही एक कला व त्याच बरोबर ते एक शास्त्र सुद्धा आहे. ह्या शास्त्राला मी एका सोप्या व सरळ यंत्रणेमध्ये रुपांतरीत करण्याचा प्रयत्न केला जेणे करुन हे शास्त्र अथवा कला सर्वसामान्य माणसांसमोर मांडता येईल व सर्वसामान्य माणुस त्या यंत्रणेचा वापर करुन असामान्य यश मिळवू शकेल. या यंत्रणेला मी यशस्वी माणसांची ब्लु प्रिंट किंवा नकाशा मानतो व मी ठामपणे सांगु शकतो कोणताही यशस्वी माणुस कळत नकळतपणे या नकाश्याचा वापर करतोच करतो. या नकाश्याला मी "लक्ष्यसिध्दीच्या सहा महत्त्वाच्या पायर्‍या" असे नाव दिले आहे.

लक्ष्यसिध्दीच्या सहा महत्त्वच्या पायर्‍या या खालिल प्रमाणे आहेतः

१) ध्येय निश्चिती:- आपल्या भावी आयुष्याचे नेमकं व स्पष्ट ध्येय ठरविणे.

२) रिसर्च:- ध्येयाला अनुसरुन उपलब्ध सर्व माहिती विशिष्ट पध्दतीने गोळा करणे.

३) आरखडा:- ध्येय साध्य करण्यासाठी कोणती कृती व ती कोणत्या क्रमाने कराल याची मांडणी करणे.

४) अ‍ॅक्शन प्लॅन:- तुमच्या रिसर्च व आराखड्याला अनुसरून सविस्तर अ‍ॅक्शन प्लॅन तयार करणे.

५) कृती:- तुमच्या क्षमतांचे केंद्रिकरण करुन कृती करणे.

६) लक्ष्यसिध्दी:- लक्ष्य साध्य करणे.


लक्ष्यसिध्दीच्या सहा महत्त्वाच्या पायर्‍यांबद्दल आणखी जाणून घ्यायचे असल्यास व या पायर्‍यांचा वापर करुन तुम्ही पाहीजे ते साध्य कसे करायचे हे समजुन घेण्यासाठी लक्ष्यवेधच्या आगामी सेमिनारला नक्की उपस्थित रहा!
लक्ष्यसिध्दीच्या सहा महत्त्वाच्या पायर्‍यांचा वापर करुन आज पर्यंत कित्येक लोकांनी त्यांचे ध्येय साध्य केलेले आहे. तुम्ही सुध्दा तुम्हाला हवे ते नक्कीच साध्य करू शकता.

तर मग भेटुया लक्ष्यवेध सेमिनारमध्ये...













दिनांक : २७ जुन २०१०.

वेळ: सकाळी १०:००वाजता.

स्थळ: रविंद्र नाट्य मंदिर, मिनी ऑडिटोरियम, प्रभादेवी.

नाव नोंदणीसाठी संपर्क:

०२२-२२९३९३७५/६/७/८, ९८६९१२०१३०.

प्रवेश विनामुल्य
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites