LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

21 May 2012

फ्युचर पाठशाला जोश २०१२

नमस्कार!
मित्रांनो, आपल्या कळवण्यास बॉर्न टू विनची संपूर्ण टिम अत्यानंदीत होत आहे की आम्ही आमच्या टिमचं स्वप्नं येत्या २७ मे रोजी साकार करत आहोत. हो मित्रांनो, २७ मे २०१२ रोजी फ्युचर पाठशाला जोश २०१२ कार्यक्रम अतिशय धुमधडाक्यात आम्ही साजरा करणार आहोत. हा कार्यक्रम भारतातील सर्वात मोठं सभागृह ते म्हणजे षणमुखानंद सभागृह, सायन येथे पार पाडणार आहे व या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण असणार आहे फ्युचर पाठशालाच्या आमच्या फ्युचर स्टार्सचे उत्साहवर्धक व अर्थपुर्ण असे परफॉर्मन्सेस! आता पर्यंत पार पडलेल्या फ्युचर पाठशालाच्या प्रत्येक जोश कार्यक्रमामध्ये फ्युचर स्टार्सचे अद्वितीय परफॉर्मन्स इतके भन्नाट पध्दतीने सादर केले आहेत की उपस्थित प्रेक्षक अक्षरशः थक्क होतात. फ्युचर पाठशाला जोश २०१२ हा आतापर्यंतचा सर्वात जबरदस्त आणि धमाकेदार पध्दतीने साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला आपण कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहीलंच पाहीजे!

मित्रांनो, या वर्षी बॉर्न टू विन तर्फे फ्युचर पाठशाला कार्यक्रम मुंबईभरात निरनिराळ्या ठीकाणी राबवण्यात आले. फ्युचर पाठशालाच्या उत्साही प्रशिक्षकांनी, रिव्हुवर्सनी व सह-प्रशिक्षकांनी आपली कामगिरी चोखपणे बजावत फ्युचर पाठशालाच्या विविध केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक परिवर्तन घडवून आणले. या वर्षी जवळजवळ ३०० नवीन फ्युचर स्टार्स फ्युचर पाठशालाने घडवले. मुंबईभरात समाधानकारक पध्दतीने या वर्षी फ्युचर पाठशालाचे सर्व वर्ग पार पाडले. आमचे फ्युचर स्टार्स आत्मविश्वासाने पेटून उठले आहेत, त्यांना त्यांच्या सुप्त शक्तींची आता जाणिव झाली आहे, त्यांची ध्येय आता ठरली आहेत आणि भविष्यात उत्तुंग यश मिळवण्यासाठी आता ते सज्ज झाले आहेत. जर आपल्याला त्यांचा जोश प्रत्यक्षात पहायचा आणि अनुभवायचा असेल तर २७ मे २०१२ रोजी सकाळी १० वाजता षणमुखानंद सभागृहामध्ये नक्की या!
यंदाचा जोश २०१२ कार्यक्रम भव्यदिव्य तर असणारच आहे परंतु त्याच बरोबर आणखी एक विशेष गोष्ट या कार्यक्रमामध्ये होणार आहे, ती म्हणजे बॉर्न टू विनचे संचालक अतुल राजोळी यांचे पहिले पुस्तक 'माझा मोटिव्हेटर मित्र' चे प्रकाशन. हो मित्रांनो! आपण ज्या पुस्तकाची आतुरतेने वाट पाहत होतात, ते आता लवकरच आपल्या भेटीला येत आहे! नावा प्रमाणेच हे पुस्तक प्रेरणादायी असणार आहे व यशप्राप्तीचे ५० मैत्रीपूर्ण कानमंत्र देणार आहे. अशा या आगळ्यावेगळ्या पुस्तकाचे प्रकाशन प्रत्यक्षात पाहण्याची सुवर्ण संधी आपल्या समोर आहे!

फ्युचर पाठशाला जोश २०१२ चे वारे सध्या सगळी कडे वाहत आहेत. झी २४ तास वाहिनी या कार्यक्रमाचे मिडीया पार्टनर असणार आहे! बॉर्न टू विनचे सर्व आजी-माजी प्रशिक्षणार्थी या कार्यक्रमाची आधीपासुनच वाट पाहत आहेत, गेल्या चार वर्षाचे फ्युचर पाठशालाचे विद्यार्थी आमचे फ्युचर स्टार्स या कार्यक्रमाची आस लावून बसले आहेत. मित्रांनो, आता फक्त काही दिवस उरले आहेत.






मित्रांनो, बॉर्न टू विनच्या या स्वप्नपूर्ती सोहळ्याला असाल अशी नम्र विनंती!

- टिम बॉर्न टू विन



09 May 2012

अकरावा लक्ष्यसिध्दी सोहळा: 'ब्रँड गुरु'

नमस्कार!
आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की या उन्हाळी सुट्टी दरम्यान "फ्युचर पाठशाला" जो एक विद्यार्थी विकास प्रशिक्षणक्रम आहे, तो एकूण १४ शाखांद्वारे राबविण्यात येत आहे. माटुंगा, मुलुंड, दादर, अंधेरी (पुर्व), अंधेरी (पश्चिम), जोगेश्वरी, वसई, विक्रोळी, डोंबिवली, पनवेल, कल्याण, मालाड, कांदिवली आणि पुणे इथे हा प्रशिक्षणक्रम १४ ते २४ वयोगटातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे.
त्याच प्रमाणे "लक्ष्यवेध अ‍ॅडवान्स" ह्या एका वर्षाच्या उद्योजकता विकास कार्यक्रमाची तिसरी बॅच देखील नुकतीच सुरू झाली आहे.
लक्ष्यवेधची अकरावी बॅच अतिशय उस्फूर्तपणे पार पडली! ३ जुन पासून लक्ष्यवेधची बारावी बॅच देखील सूरु होत आहे.

आणि आता सगळे आजी-माजी प्रशिक्षणार्थी वाट पाहत आहेत ते ११व्या लक्ष्यसिद्धी सोहळ्याची! मित्रांनो आगामी लक्ष्यसिद्धी सोहळा पार पडणार आहे १० मे २०१२ रोजी, सांयकाळी ६.३० वाजता वीर सावरकर सभाग्रुह, शिवाजी पार्क, दादर येथे.
नेहमीप्रमाणे या वेळेसही लक्ष्यसिद्धी सोह्ळ्याचे प्रमुख आकर्षण असणार आहेत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक! ११व्या लक्षसिद्धी सोह्ळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत प्रख्यात अ‍ॅड व ब्रँड गुरु श्री. गोपी  कुकडे !
"ब्रँड गुरु" या त्यांच्या लाइव्ह मुलाखतीद्वारे आपल्याला त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे आणि त्यांची मुलाखत घेणार आहेत बॉर्न टू विन संस्थेचे संस्थापक व सचांलक श्री. अतुल राजोळी. या मुलाखती द्वारे आपल्याला अ‍ॅडवर्टायझींग व ब्रँन्डींग-संदर्भात त्यांचाकडून सखोल मार्गदर्शन तर मिळेलच शिवाय अ‍ॅडवर्टायझींग क्षेञातल्या त्यांच्या प्रवासाबद्द्ल देखिल ते सांगणार आहेत.
मला माहितच आहे की ही संधी तुम्ही कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही! तर मग भेटूया १० मे रोजी ६.३० वाजता, वीर सावरकर सभाग्रुह येथे.....

Indian Advertising Industry चे दिग्गज व्यक्तिमत्व  श्री. गोपी  कुकडे  सर यांच्याबद्दलः

Creative Talent मुळे त्यांना खुप वेळा Communication Art Guide आणि Advertising Club Award  यांच्यासारखे वेगवेगळे पूरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला गेला आहे. त्याच बरोबर त्यांना Sir J. J. Institute of
Applied Art या नामांकीत College मधून गोल्ड मेडल मिळालं आहे. तसेच Onida TV च्या "Neighbour's Envy & Owner's Pride" या आणि अशा अनेक कॅच-लाइन्स चे जनक त्यांना मानले जाते आणि विविध नामांकित अशा Advertising Agencies बरोबर Associate होउन त्यांनी १९८२ मध्ये त्यांच्या करियरची सुरुवात केली, तसेच  Advertising Institute मध्ये सोळा वर्षांचा त्यांचा दांडगा अनुभव आहे.

अकरावा लक्ष्यसिध्दी सोहळा:
विषय: ब्रँड गुरु
दिनांक: १० मे २०१२
स्थळः वीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क जवळ, दादर(प.)
प्रवेश विनामुल्य
संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९
 

10 April 2012

पुस्तका बाहेरील जग दाखवणारी शाळा


जन्माला आलेलं प्रत्येक मुल हे लिओनार्दो दा विंची अथवा आईनस्टाईन यांच्या इतकेच प्रभावशाली असते. आपणास कदाचीत अविश्वसनिय वाटेल परंतु ही गोष्ट संशोधनाअंती सिद्ध झाली आहे. आपली चुकिची शिक्षणपद्धती, चाकोरीबद्ध विचारशैली त्याच्या वाढीच्या प्राथमिक वर्षात त्याचे केवळ खच्चीकरण करीत असते.





"सारी उम्र हम, मरमरके जी लिये;
एक पल तो अब हमें जीने दो.. जीने दो!
Give me some sunshine, give me some rain!
Give me another chance wanna grow up once again!"

गाजलेल्या 'थ्री इडीयटस्' चित्रपटातील हे गाणं पाहताना आजच्या युवा पिढीच्या दयनीय अवस्थेला अनूभवून जीव कासाविस होतो. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांवर असलेले प्रचंड दडपण, पालकांच्या अपेक्षा, जीवघेणी स्पर्धा, गोंधळात टाकणारी अ‍ॅडमिशन पध्दत, शैक्षणिक संस्थांचे व्यावसायिकीकरण व भविष्याबाबतची अनिश्चितता असे आजचे विदारक चित्र युवा पिढीसमोर खुप मोठे प्रश्नचिंन्ह निर्माण करते. कोवळ्या वयामध्ये ह्या सर्व बाबींना तोंड देण्यासाठी आजची युवा पिढी खरोखरच मानसिक व बौधिकरित्या तेवढी सक्षम आहे का? बहूतेक नाही. गेल्या काही वर्षातील विद्यार्थ्यांमधील आत्महत्येचे प्रमाण लक्षात घेता हे आपण मान्य केलेच पाहीजे. खास करुन दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे व परीक्षेचे एवढे जबरदस्त दडपण निर्माण होते कि ह्या मुलांचे संपुर्ण भविष्य त्यांनी परिक्षेत मिळविलेल्या मार्कांवरच अवलंबुन असते हे गृहीतच धरण्यात येते. ज्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी भविष्यामध्ये आपले करियर करणार आहे त्याचा निर्णय हा सर्वस्वी त्याने परीक्षेत मिळविलेल्या मार्कांवरच अवलंबून असतो. विद्यार्थ्याची कोणत्या क्षेत्रात आवड आहे? विद्यार्थ्याकडे कोणत्या विषयात योग्यता व कौशल्ये आहेत? त्याची भविष्याबद्दलची संकल्पना काय आहे? विद्यार्थ्याला काय बनायला आवडेल? ह्या प्रश्नांचा बहूतांशपणे विचार केला जात नाही. आपल्या मुलाने किंवा मुलीने डॉक्टर अथवा इंजिनीयर झालं पाहीजे असा बहूतांश पालकांचा आग्रह असतो. हे कितपत योग्य आहे? खरेतर विद्यार्थ्याला सुध्दा त्याचा स्वतःचा कल कोणत्या क्षेत्रात आहे हे कोवळ्या वयात सांगणे कठीणच असते, त्याचे कारण म्हणजे माहीतीचा व कौशल्य प्रदान शिक्षणाचा अभाव. रट्टा मारुन कोणत्या क्षेत्रात आपल्याला रस आहे हे कसे कळणार?
हे सगळं आपण पाहत आहोत, अनुभवत आहोत, आणि दुर्दैव हे कि आपण सगळे कळत-नकळत या चुकिच्या यंत्रणेचे भाग झालेलो आहोत. आज आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आक्रमक व आमुलाग्र अश्या बदलांची गरज आहे. आपल्याला आपल्या भावी पिढीला मानसिक व बौधिकरित्या सबळ बनवायचे असेल तर पुस्तकी ज्ञानाला व मार्कांना महत्त्व न देता त्यांची कौशल्ये व प्रवृत्ती या दोन महत्त्वाच्या अंगांवर काम करणे गरजेचे आहे. परंतु दुर्दैवाने ७५% पेक्षा जास्त शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना कौशल्य प्रदान शिक्षण जाणिवपुर्वकरित्या पुरवत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची आवड-निवड कळणे कठीण असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात करियर निवडण्याबाबतचा गोंधळ नेहमीच जाणवतो.
आजच्या युवा पिढीची ही गरज लक्षात घेता बॉर्न टू विन ने चार वर्षापुर्वीच फ्युचर पाठशाला ही कार्यशाळा राबवायला सुरुवात केली. उन्हाळी सुट्टीदरम्यान विद्यार्थ्यांना फ्युचर पाठशालाच्या कार्यशाळेद्वारे त्यांचे ध्येय ठरविण्यास मदत करणे, त्यांच्यातील सुप्त शक्तिचा ठाव घेण्यास मदत करणे, त्यांच्यात प्रवृत्तीमय बदल घडवून आणणे व आवश्यक तत्वांचे व कौशल्यांचे परिणामकारक प्रशिक्षण देणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख हेतु. फ्युचर पाठशाला प्रशिक्षणक्रमाद्वारे आत्तापर्यंत मुंबईभरातुन १५०० पेक्षा जास्त विद्यार्थी प्रशिक्षित झाले असुन ह्या उन्हाळी सुट्टीमध्ये देखिल ही कार्यशाळा  मुंबईमध्ये दादर, माटुंगा, अंधेरी, जोगेश्वरीमालाड, कांदिवली, मुलुंड, डोंबिवली, कल्याण, विक्रोळी, पनवेल, उल्हास नगर व पुण्यामध्येसुध्दा राबवण्यात येणार आहे. 
अधिक माहीतीकरिता संपर्कः 9619465689, 7666426654, 022-22939375/6/7/8,
वेबसाईटः http://www.born2win.in/

27 March 2012

"भारुकाकाची पत्रे" व "भारुकाका.कॉम"

१०वी-१२वी च्या परीक्षा साठी प्रत्येक जण आपापल्या परीने तयारी करतो. गेल्या काही वर्षात या परीक्षांच्या संदर्भातील ताण-तणावही अगदी शिगेला पोहचले आहेत.
तसेच १०वी-१२वी नापासांचा  आकडाही वर्षागणिक वाढत चालला आहे. २००९ मध्ये ५.५ लाख, २०१० मध्ये ७ लाख आणि २०११ मध्ये ९ लाख... येणाऱ्या परीक्षात हा आकडा १० लाखांच्या वर जाण्याची शक्यता आहे...
यातून मार्ग निघावा याचसाठी व परीक्षेच्या ताण-तणावांपासून मुक्त राहून १०वी-१२वी च्या अभ्यासाची प्रेरणा देणारी "भारुकाकाची पत्रे" यांचं लिखाण व "भारुकाका.कॉम" हि १०वी-१२वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी महाराष्ट्रातील पहिली वेबसाईट तयार करण्यात आली आहे.
"भारुकाकाची पत्रे"  व "भारुकाका.कॉम" या  वेबसाईटचा  प्रकाशन-लोकार्पण सोहळा सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ व लेखक डॉ.राजेंद्र बर्वे यांच्या शुभहस्ते पार पडला. याप्रसंगी त्यांनी १०वी-१२वीच्या  विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी अतिशय बहुमोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा दूरदर्शन वृत्तांत व  डॉ.राजेंद्र बर्वे यांचे १०वी-१२वीच्या  विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी  मार्गदर्शन रविवार दि.१२ फेब्रु.२०१२ रोजी  दूरदर्शन  सह्याद्री  उपग्रह  वाहिनीवरून सकाळी १०वा. प्रसारित करण्यात आले. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त १०वी-१२वीच्या  विद्यार्थ्यांना याचा लाभ व्हावा  हा यामागील उद्देश होता !
"भारुकाकाची पत्रे"  व "भारुकाका.कॉम" प्रकाशन-लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सर्व व्हिडीओज  व  मान्यवरांचे १०वी-१२वीच्या  विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी अतिशय बहुमोल मार्गदर्शन    www.bharukaka.com
या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यांचा लाभ कोणालाही पाहिजे तेव्हा घेता  येईल.
१०वी-१२वी म्हणजे शिक्षण व पुढील करीअरच्या दृष्टीने आपल्या आयुष्यातील "टर्निंग पॉईंट"च असतो यात शंका नाही! त्यामुळे प्रत्येकाला वाटतं  की  १०वी-१२वीत आपण खूप अभ्यास करावा, चांगले मार्क्स मिळवावेत आणि हव्या  त्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळवून मनासारखं उत्तम करीअर घडवावं. 
*चांगलं करीअर घडवायचं म्हटलं कि एक बागुलबुवा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि तो म्हणजे स्पर्धा! नुसतीच स्पर्धा नाहीतर प्रचंड स्पर्धा... आणि मग या स्पर्धेत टिकून राहायचे तर अभ्यास एके अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क मिळवायचे याचाच ध्यास प्रत्येक विध्यार्थ्याला लागतो. या बाबतीत आपले पालकसुद्धा कधी वास्तव तर कधी अवास्तव अपेक्षांची भर घालून या स्पर्धेचे रुपांतर जीवघेण्या मार्कांच्या शर्यतीत कधी करून टाकतात ते त्यानाही उमजत नाही.
याविषयी योग्य ते मार्गदर्शन मिळावे या  हेतूने भारुकाकाची पत्रे" या पुस्तकाचे लिखाण व योजना करण्यात आली आहे. याचा लाभ नियमित व नापास विद्यार्थ्यांनाही व्हावा ही या मागची प्रेरणा आहे. खरं म्हणजे "भारुकाकाची पत्रे" हे पुस्तक एकदा वाचून ठेऊन देण्यासाठीचं पुस्तक नाही तर त्यातल्या गोष्टी प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी  बनवलेला तो एक प्रशिक्षणक्रमच आहे! त्याने तुमच्या अभ्यासाच्या, विचार करण्याच्या पद्धतीत आमुलाग्र बदल घडून येऊ शकतो. अभ्यासाची, परीक्षेची तयारी तर करावीच पण तणावांपासून मुक्त राहून! "भारुकाकाचीपत्रे"  "भारुकाका.कॉम" ही वेबसाईट याकामी तुमच्या सतत सोबत राहील.
-भारतकुमार महेंद्र जी. बैसाणे. 



पुस्तक सवलतीच्या दरात मिळवण्यासाठी संपर्क
B2W Training & Consultancy Services Pvt. Ltd.
ऑफिस नं. ११३, काकड उद्योग भवन, ३रा मजला, एस. किर मार्ग, माटुंगा (प), मुंबई - ४०००१६.
फोनः ०२२- २२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९

14 March 2012

चार रस्त्यावर पाचवा फाटा - करीअरचा कोपरा

वाटतं, मोठं झाल्यावर कंडक्टर होऊ.
किंवा मग, मस्त कडक इस्त्रीतला पोलीस इन्सपेक्टर.
वाटतं होऊ नेता, आणि मस्त फिरू लाल दिव्याच्या गाडीतून.
पण ते वाटणं लहान असतानाच.
आपण का मोठे होतो?
लहानपणी लोक विचारतात तू मोठ्ठं झाल्यावर कोण होणार, आणि आपण उत्तर दिलंच की पाण्याची टाकी होणार तरी खूप कौतूक करतात.
पण मोठं झाल्यावर मात्र लागतात मागे.
विचारतात सतत, सांग काम काय करणार.? किती पैसे मिळवणार.? अमक्याला बघ एवढा पगार. तुला का मिळत नाही?
किती प्रश्न... केवढा वैताग..?
काही म्हणता काही कळत नाही.
की करावं काय...?
आधी कुठल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा हा तिढा. मग कुठे घ्यायचा.? कोणती साईड.? कुठलं करिअर भविष्यात चालेल.? अमकातमका काय करतो.?


आपल्याला भेटतच नाही आपला बाबा रॅन्चो...
जो सांगतो पैसे के पिछे मत भाग. काबील बन. काबील...!!
पण हे काबील बनायचं कसं.? आणि बनलंच तर आपल्या भवितव्यासाठी जिवाचं पाणी करणार्‍या आई-बाबांना सांगायचं कसं.?

यंदा तुम्ही उभेच असाल या करिअरच्या चार रस्त्यावर आणि तिथून फुटत असेल एखादी पाचवीही वाट.

तर जरा ही १२ सूत्रं लक्षात ठेवा....

बघा.... कदाचित तुमचा निर्णय सोप्पा होईल आणि तुम्हाला सापडेल तुमची स्वत:ची हक्काची वाट.!

) आधी एका प्रश्नाचं उत्तर स्वत:ला द्या की मला काय करायला आवडेल.?

) जग गेलं खड्ड्यात! पैसे मिळतील किंवा नाही मिळणार, आईबाबा "हो" म्हणणारही नाहीत कदाचित पण तुम्ही ठरवाच की तुम्हाला काय करायला आवडेल.

) काही जण म्हणतात की, "असं काहीच नाही", "मला नाही कळत", हे साफ चूक! आपल्याला भूक लागली आहे हे जसं फक्त आपल्यालाच कळतं तसं आपल्याला काय करायला आवडेल हेही फक्त आपल्यालाच कळतं. लोक ठरवतात का आपल्याला किती भूक लागलीये ते? तसंच हे... इतकं सोपं! त्यामुळे एकदा ठरवाच की काय करायला आवडेल...?

) एकदा ठरलं की शोधा ते कसं करायचं.... कुठं करायचं...?

) आपल्याला जे आवडतं ते करण्याची पात्रता आपली आहे का? हे ठरवा. म्हणजे आपल्याला आवडतं म्हणून आपण सचिन तेंडूलकर होऊ शकतो का? एकदा विचार करा...

) तो विचार प्रॅक्टिकल असलेला बरा. अनेक लोकांना आवड आणि प्रॅक्टिकल गोष्टी याची सांगड नाही घालता येत.


) नुसतं वाटतं होऊ डॉक्टर... पण जीवशास्त्रच आवडत नाही, असं होतं का आपलं...?

) मित्र म्हणतात म्हणून काही करायचं. हे तर साफ चूक. मित्र काय म्हणायचं ते म्हणो. तुम्हाला वाटलं ना की लावायची बटाटेवड्याची गाडी तर लावा बिनधास्त...! पण ती एकदा लावली की लोक माझ्याकडे पाहतात. रस्त्यावर वडे तळतो म्हणून हसतात, असा फालतू विचार करायचा नाही.

) आईवडील ऐकतात आपलं. पण त्यांना नीट समजावलं तर.? आपण त्यांच्याशी भांडलो आणि 'तुम्हाला काहीच कळत नाही' असं म्हटलं तर का ते आपल्याला मदत करतील.

0) आई-वडिलांना कमी लेखू नका. तुम्हाला काय कळतं करिअरमधलं असं म्हणून त्यांना व्हिलन करू नका. त्यापेक्षा त्यांच्या आर्थिक क्षमतांचाही विचार करा.

११) जे काम तुम्हाला आवडेल तेच आपण करायचं. मग त्यात पैसे नाही मिळाले आणि इतर लोकांना त्यांच्या कामात खूप पैसे मिळाले तरी आपण स्वत:ला दोष देणार नाही, याची खात्री असेल तर स्वतच्या जबाबदारीवर निर्णय घ्या.

१२) घेतला निर्णय. आता पुरे खयाली पुलाव... लागा झडझडून कामाला.!
लोकमत - शुक्र, जानेवारी २०१२
Please Click on Following Link: http://born2win.in/future.aspx
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites