2011 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

14 December 2011

THE SUCCESS BLUEPRINT WORKSHOP - एक अद्वीतीय कार्यशाळा

नमस्कार! BORN2WIN च्या संपुर्ण टिमच्या वतीने आपणा सर्वांना नमस्कार!

गेल्या चार वर्षांमध्ये, BORN2WIN - Training & Consultancy Services च्या निरनिराळ्या सेमिनार्सचा फायदा आता पर्यंत ४०,००० पेक्षा जास्त लोकांना झालेला आहे. तसेच BORN2WIN च्या  लक्ष्यवेध, फ्युचर पाठशाला इत्यादी प्रशिक्षणक्रमांचा फायदा आता पर्यंत ७००० पेक्षा जास्त लोकांना झालेला आहे. गेल्या चार वर्षांमध्ये BORN2WIN ची कामगिरी खरोखरच लक्षणिय आहे, BORN2WIN च्या संपुर्ण टिमच्या वतीने मी आपणा सर्वांचे मनःपुर्वक आभार मानतो. आतापर्यंत जो विश्वास आपण आमच्यावर दाखविलात तो पुढे ही असाच कायम ठेवाल अशी मी आशा करतो.
THE SUCCESS BLUEPRINT WORKSHOP - ६ ऑगस्ट २०१०
प्रशिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असण्याचा माझा एकच उद्देश आहे तो म्हणजे, "To Inspire & Empower People & Organizations To Achieve What They Deserve & Desire." या एकाच ध्यासापोटी माझा प्रशिक्षणक्रमातील प्रवास सुरु आहे. आणि मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो कि माझे ज्ञान निरनिराळ्या क्षेत्रातील लोकांपर्यंत पोहचविण्यात बर्‍यापैकी यशस्वी ठरलेलो आहे. माझ्या निरनिराळ्या कार्यक्रमांद्वारे व प्रशिक्षणक्रमांद्वारे मी आत्मसात केलेले ज्ञान सोप्या पण तितक्याच परिणामकारक पध्दतीने शिकविण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. माझ्या कार्यक्रमांची विशेषता म्हणजे अत्याधुनिक वैयक्तिक विकास विषय व तंत्र मी मराठीमध्ये शिकवतो व मी जे काही शिकवतो ते Theory स्वरुपात नसुन लोकांना  आचरणात आणता येतील असे Practical Tools मी शिकवतो. कारण माझं नावच आहे... "Atul ... A - Tool To Empower Your Life!" :-)
THE SUCCESS BLUEPRINT WORKSHOP - ६ ऑगस्ट २०१०
माझं असं ठाम मत आहे कि यश मिळवण्यासाठी मेहनतीची किंवा HARDWORK ची गरज नसते. गरज असते, ती SMARTWORK ची! आपण कमीतकमी परिश्रमांमध्ये व कमीतकमी कालावधी आपल्याला जे हवे आहे ते मिळवू शकतो! आणि हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवांवरुन सांगत आहे.

एक विसाव्या शतकात जर कोणत्याही व्यक्तीस यशस्वी व्हायचं असेल तर त्याने सर्वात जास्त स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करणे गरजेचे आहे.


THE SUCCESS BLUEPRINT WORKSHOP - ६ ऑगस्ट २०१०
वर्ष २०११ हे प्रचंड वेगवान होते व येणारा काळ आणखी वेगवान असणार आहे. वर्ष २०११ ला अलविदा व वर्ष २०१२ चे स्वागत नेहमी प्रमाणे करायची तयारी आपण सुरु केली असेल बहुतेक. परंतु यावर्षी ती आपणास काही वेगळे करण्याची संधी देउ इच्छीतो.

हो मित्रांनो, जर वर्ष २०१२ मध्ये आपली स्वप्न आपणास साकार करायची असतील, यशाची उत्तुंग भरारी घ्यायची असेल तर वर्षाची सुरवातच आपण धमाकेदार पध्दतीने का करु नये? आपल्याला नेमकं काय साध्य करायचं आहे व कसं साध्य करायचं आहे, स्वतःचं व्यक्तीमत्व कसं घडवायचं आहे हे जाणुन व त्या दिशेने एक जबरदस्त, उत्साहवर्धक पाउल उचलुन २०१२ या वर्षाची सुरवात आपण केली तर आपणास आवडेल का?
THE SUCCESS BLUEPRINT WORKSHOP - २७ ऑक्टोबर २०१०


जर वरील प्रश्नाचं उत्तर 'हो' असेल तर मित्रांनो BORN2WIN ची आगामी एकदिवसिय कार्यशाळा आपल्याला नक्कीच लाभदायक ठरेल.

THE SUCCESS BLUEPRINT ही सहा तासांची आगळीवेगळी एकदिवसिय कर्यशाळा येत्या ३ जानेवारी २०१२ रोजी मी आपल्यासाठी घेउन येत आहे. आणि नेमकं हेच मी या कार्यशाळेमध्ये आपणासमोर मांडणार आहे कि कमीतकमी परिश्रमांमध्ये व कालावधीमध्ये आपण कसे यशस्वी होउ शकतो?

THE SUCCESS BLUEPRINT WORKSHOP - २७ ऑक्टोबर २०१०


कार्यक्रमामध्ये अतिप्रगत अशी तंत्रे मी आपल्याला शिकवणार आहे ज्याच्या मदतीने आपण आपल्याला वर्ष २०१२ मध्ये जे हवे आहे ते मिळवू शकता! HARDWORK  न करता व SMARTWORK करुन! जे तुम्हाला हवे आहे ते... ' आरोग्य, ऐश्वर्य, यश आणि आनंद' तुम्ही कमीतकमी कालावधीमध्ये व कमीतकमी परिश्रमांमध्ये साध्य करु शकता.

THE SUCCESS BLUEPRINT ही एक Action Packed, Power Packed, Motivational कार्यशाळा असणार आहे ज्याचा तुमच्या आयुष्यात नक्कीच प्रचंड फायदा होईल...



तर मग विसरु नका...! 

दिनांकः मंगळवार, ३ जानेवरी २०१२.
वेळः दुपारी २:०० ते संध्याकाळी ९:३०
स्थळः वीर सावरकर हॉल, शिवाजी पार्क, दादर (प.)
गुंतवणुकः रुपये १२००/- (बॉर्न टू विनच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी रु. १०००/- फक्त)
प्रवेशिका मिळविण्यासाठी संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९


30 November 2011

"उद्योग निर्माण" - श्री. राजेंद्र सावंत आणि श्री. अजित मराठे

बॉर्न२विनच्या कार्यक्रमात डोळे ऊघडणारी, ऊद्बोधक मुलाखत.
 बॉर्न२विन संस्थेच्या लक्ष्यवेध सोहळा नुकताच संपन्न झाला. त्यात  निर्माण रीअलटर्स अॅन्ड डेव्हलपर्स लिमिटेडचे चेअरमन राजेंद्र सावंत आणि कार्यकारी संचालक अजित मराठे हे दोन मान्यवर प्रमुख पाहुणे होते. बॉर्न२विनचे प्रमुख अतुल राजोळी यांनी दोघांची मुलाखत घेतली. ही मुलाखत अनेक दृष्टीने ऊद्बोधक होती, नव्हे डोळे ऊघडणारी होती.
राजेंद्र सावंत आणि अजित मराठे दोघेही इंजिनिअर. पार्ल्याच्या परांजपे विद्यालयात अगदी लहानपणापासून ते एकत्र शिकत. राजेंद्र संपन्न वर्गातील तर अजित निम्न मध्यम वर्गातील, दोघांच्या जाती वेगळ्या. पण या कशाचा अडथळा न येता ते दोघे घनिष्ट मित्र झाले, कारण त्या दोघांची उंची. ती जास्त असल्याने दोघांना मागच्या बाकावर बसावे लागे- बॅकबेंचर्स! पण बॅकबेंचर्स असूनही दोघांनी इंजिनिअरींगची पदवी घेतली. अजित यांनी इंजिनिअरींगची पदवी घेतल्यानंतर दोन वर्षे संघाचा स्वंयसेवक म्हणून पूर्ण वेळ काम केले. राजेंद्र यांनी त्यांच्या वडिलांना बांधकाम व्यवसायात मदत करणे सुरू केले. रायगड मिलीटरी स्कूलचे मोठे काम त्यांना करायला मिळाले व त्यातून खूप शिकायले मिळाले. पुढे वडिलांबरोबर व्यवसाय कसा करायचा यावरून मतभेद झाले. ते घराबाहेर पडले. ते व अजित यांनी मिळून व्यवसायच करायचे ठरवले. श्रीमंत व्हायचे असेल तर धंदा करणे आवश्यक हा स्पष्ट विचार त्यांच्या मनात होता. राजेंद्र यांनी वडिलांबरोबर व्यवसाय केला होता, त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील कामाचा त्यांना अनुभव होता. इंजिनिअरींगची पदवीबरोबरच राजेंद्र यांच्या मते एफइ युनिव्हर्सिटीचे मौल्यवान शिक्षण गाठीशी होते. एफइ युनिव्हर्सिटी म्हणजे फिल्ड एक्सपिरीयन्स युनिव्हर्सिटी!

ह्या दोघांना पहिले काम मिळाले ते पाच हजार रुपयात एका घराचे पेंटींग करण्याचे. स्वत: रंगकाम केले. अशी छोटी कामे करत असताना १९९४मध्ये, अजित यांच्या मावशीने सुचवले, त्यांचा नेरळला प्लॉट आहे, तो प्लॉट विकसित करा. बदल्यात पैसे नकोत, दोन फ्लॅट द्या. हा प्रस्ताव म्हणजे जणू एक खाण मिळाली. या प्लॉट योजनेच्या भूमीपुजनाच्या दिवशी तेथिल बारा प्लॅटपैकी सहाचे बुकींग झाले. इतकच नाही तर तिथे नंतर असे अनेक प्रस्ताव त्यांच्याकडे चालून आले. राजेंद्र यांनी या योजनेची सुरवात करताना उद्गार काढले होते, इथे निर्माण नगरी होणार आहे. ते उद्गार सार्थ ठरवत या जोडीने तिथे पंचवीस इमारती बांधल्या.

अतुल राजोळी उपस्थित प्रेक्षकांना संबोधताना
या दोघांच्या कंपनीचे काम अशा प्रकारे सुरू होते. पण बांधकाम व्यवसाय हा अतोनात पैसा आवश्यक असणारा उद्योग आहे. २००२ पर्यंत ते कामे मिळवत होते, पूर्ण करत होते, पण आर्थिक बाजूचा फारसा विचार न करता. बरीच वर्षे कॅश फ्लोची समस्या होती. डोक्यावर चाळीस लाखाचे कर्ज झाले होते. अनेकदा त्यांच्या मनात विचार यायचा, उगाच धंद्यात पडलो. दोघांनी त्याच सुमारास लॅंडमार्क फोरमचा प्रशिक्षणाचा कोर्स केला. या कोर्समुळे मात्र त्यांच्या काम करण्याच्या पध्दतीत आमूलाग्र बदल झाला. डेलिगेशन हा शब्द त्यांनी इथे ऐकला आणि तो प्रत्यक्ष अंमलात आणला. काम मिळाल्यानंतर त्यातच गुंतून न राहता, ते पूर्ण करण्याची जबाबदारी योग्य व्यक्तींवर सोपवून, त्यावर देखरेख करण्याचे काम स्वत:कडे घेणे असे धोरण त्यांनी स्वीकारले. यामुळे जास्त कामे ते घेऊ शकले. तसेच त्रयस्थपणे नजर ठेवल्याने गुणवत्ता राखली जात आहे याची खात्री बाळगतानाच, त्यातून उचित नफा कसा मिळवायचा तेही लक्षात आले. कंपनीकरता व्हिजन काय असावी त्यांनी ठरवले. अशा प्रशिक्षणाचा कोर्सचे या दोघांना इतके महत्व वाटते की ते सतत दर सहा महिन्यांनी असे नवे नवे कोर्स करत असतात. आपल्या कर्मचार्‍यांना सतत प्रशिक्षणाचा देतात. असे कोर्स म्हणजे स्वत:चा नव्याने शोध घेणे म्हणता येईल. लॅंडमार्क फोरमचा प्रशिक्षणाचा कोर्स करून तर जीवनाकडे बघण्याची दृष्टीच बदलली असे ते म्हणतात. आपल्याकडे काही विचारवंत व्यक्तीमत्व विकास प्रशिक्षणाचे कोर्स इत्यादी म्हणजे एकाच छापाची माणसे घडवणे, थोतांड वगैरे त्याला नावे ठेवतात. त्यांचे डोळे उघडायला हरकत नाही.
अर्थात व्यवसाय वाढवताना पैसा कुठून आणायचा हा फार मोठा प्रश्न होता. राजेंद्र म्हणतात ओपीएम हे भांडवल म्हणजे अदर पीपल्स मनी!  तुमची सचोटी, तुमचे नाव हे तुमचे भांडवल. तुम्ही जर शर्यतीत जिंकणारे घोडे असाल तर लोक तुमच्यावर पैसे लावणार. लोक पैसे देतात ते चॅरीटी म्हणून नाहीच वा बिनव्याजी नाही. त्यांनी दिलेल्या पैशावर त्यांना योग्य परतावा मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते. तो त्यांना देऊन स्वत:ला वाजवी नफा मिळायला हवा. हे गणित जमले तर एफइ युनिव्हर्सिटीच्या परिक्षेत उत्तीर्ण होऊन तुम्हाला यशस्वी उद्योजक ही पदवी मिळणार!


'उद्योग निर्माण' मुलाखत रंगात आली असताना...
पार्टनरशिप टिकली आहे, अशी उदाहरणे कमी आहेत. त्याबाबत राजेंद्र सांगतात, प्रत्येक मोठा माणूस पार्टनरशिप करूनच मोठा झाला आहे. पार्टनरशिप हाच विकासवृध्दीचा एकमेव मार्ग आहे. ती टिकवण्याचे त्यांनी नियम सांगितले ते असे: योग्य पार्टनर निवडता आला पाहिजे. एकमेकांबरोबर थेट संवाद होणे फार महत्वाचे आहे. मला न विचारता निर्णय का घेतला असा इगोचा प्रश्न निर्माण होतो. तो होऊ नये म्हणून संवाद हवाच. एकमेकांबद्दल विश्वास हवा. तसेच स्वत:ची व पार्टनरची सामर्थ्यस्थाने ओळखता आली पाहिजेत. राजेंद्र म्हणतात मी क्रिएटर आहे, मी नवनवीन आयडिया देतो, पण अमंलबजावणीत कमी पडतो हे ते मोकळेपणाने सांगतात.
अजित पार्टनरशिपबाबत सांगतात, मतभेद झाले असा सुगावा लागला तरी लोक आगीत तेल ओतायला तयार असतात. इतकेच काय मतभेद नसतानाही लोक एकमेकांविषयी काय बोलतात, त्याऐवजी स्वत:च एकमेकांशी बोला. मनातून स्पष्टता हवी. व्यवसाय करताना प्रत्येक बाबतीत दोघांचे मत तंतोतंत जुळणार नाही. त्यातून कटूता येऊ शकते. तिचे लगेच निराकरण व्हायला पाहिजे. एक मार्मिक मुद्दा त्यांनी लक्षात आणून दिला. पार्टनरशिप आहे म्हणून एकमेकांच्या घरात हस्तक्षेप करायचा, दुसर्‍याच्या घरात जास्त लक्ष घालायचे हे टाळलेच पाहिजे. त्यात अंतर राखायला हवे. खूप जिव्हाळ्याचे मैत्र असले तरी एकमेकांना स्पेस दिली पाहिजे. राजेंद्र हे लिडर आहेत असे अजित दिलखुलासपणे म्हणतात. महत्वाचा प्रस्ताव घेऊन कोणी आले तर पहिली मिटींग राजेंद्र यांच्याबरोबर होते, मग अजित ते काम पुढे नेतात.
मैत्रीच्या भक्कम पायावर त्यांच्या पार्टनरशिपची टोलेजंग इमारत ऊभी आहे.
लघुउद्योजकांना चांगली माणसे मिळत नाहीत, मिळाली तरी टिकत नाहीत ही समस्या नेहमी ऐकू येते. अजित त्याबाबत म्हणतात, नवी नवी माणसे आणा, तुमच्यापेक्षा हुशार माणसे आणा. ही चांगली माणसे तुमच्यासाठी पैसा कमावतील. ही माणसे छोट्या कंपनीत का येतील? जर तुमच्याकडे व्हिजन असेल तर येतील. वाढीच्या मार्गावर असलेल्या कंपनीत राहून त्यांचीही वाढ होत जाईल म्हणून येतील. कामाचे समाधान हा महत्वाचा मुद्दा आहे. मी सांगेन ते, तसच आणि तेवढेच करा म्हणजे ओझ्याचे हमाल व्हा, अशा पध्दतीने माणस असमाधानी राहतील. त्यांच्यावर कामाची जबादारी दिली पाहिजे, डेलिगेशन पाहिजे. ते केल्यानंतर त्यांच्यामागे ऊभे राहून त्यांच्या खांद्यावरून बघत त्यांना काय करायचे बारिकसारीक सूचना देत राहू नका. तुम्ही डेलिगेशन केले नाहीत तर अपवर्ड डेलिगेशन होते, म्हणजे हाताखालचा माणूस तुम्हाला कामाल लावतो, कारण तो प्रत्येक काम घेऊन तुमच्याकडे येतो आणि काय करू विचारतो! कामाची एक सुनियोजित व्यवस्था निर्माण केली पाहिजे. दैनंदिन व्यवहारातील आपल्या हस्तक्षेपाशिवाय कंपनी सुरू राहिली पाहिजे म्हणून टीम हवी. कर्मचार्‍यांची वृत्ती व सचोटी याला ते महत्व देतात. आवश्यक असेल तर कर्मचार्‍यांची मानसिकता बदलणे गरजेचे ते म्हणतात.  राजेंद्र म्हणतात लोक काम का करतात याच्या पाच प्रेरण आहेत. भीती, पैसा, कामाची दखल घेतली जाणे, त्याबद्दल शाबासकी, मालकाचे नेतृत्व, श्रद्धा उदा: देश, धर्म यासाठी लोक काम करतात. मग पैसा हा त्यांच्यासाठी बाय-प्रॉडक्ट असतो.
यशस्वी लक्ष्यवेध प्रशिक्षणार्थी लक्ष्यसिध्दी पुरस्कार स्विकारताना
बिल्डर म्हटल्यावर एक प्रतिमा डोळ्यासमोर येते, शब्द बदनाम झाला आहे याबाबत राजेंद्र सांगतात, त्यांच्या आईने त्यांना सांगितले सामान्य माणूस आपल्या आयुष्याची कमाई विश्वासाने तुमच्या हवाली करतो, त्यांचा विश्वास सार्थ करा. आईला दिलेला शब्द ते कसोशीने पाळतात. लोक काय बोलतात यापेक्षा ग्राहक समाधानी आहेत याचा त्यांना आनंद आहे. स्वत:चे मन साफ आहे. लोकांचा इतका विश्वास निर्माणने कमावला आहे की लोक त्यांच्याकडे मुदतठेवीत पैसे ठेवतात तेही फक्त १२ टक्के व्याज मिळत असताना, कारणे इथे ठेवलेले पैसे सुरक्षित आहेत हा त्यांचा विश्वास आहे. प्लॅटचे शंभर टक्के पेमेंट ते चेकने घेतात. चुक होणे आणि फसवणूक यात फरक आहे. त्यांच्या हातूनही कधी चुक होऊ शकते, पण त्याची दुरुस्ती केली जाते यामुळे विश्वास टिकून राहतो.

सहसा उद्योजकांची आपल्याला प्रतिस्पर्धी निर्माण होऊ नये अशी इच्छा असते. पण निर्माण मात्र आपले ज्ञान शेअर करण्यावर विश्वास ठेवते. पन्नास मराठी बिल्डर त्यांना तयार करायचे आहेत. त्यांनी साडे तीन वर्षांचा कोर्स त्याकरता तयार केला आहे. बिल्डरच्या हाताखाली बिल्डर ही संकल्पना त्यांनी अंमलात आणली.
प्रत्येक मोठा माणूस पार्टनरशिप करूनच मोठा झाला आहे. पार्टनरशिप हाच विकासवृध्दीचा एकमेव मार्ग आहे.
अजित यांनी एक चांगली आयडीया सुचवली. समजा व्यवसायातील उलाढालीचा ५००० कोटी रुपयांचा टप्पा साधायचा आहे. मग अशा उद्योजकाला जाऊन भेटा, ज्याची तितकी उलाढाल आहे. त्याच्याबरोबर सहज बोलूनही काही नवीन गोष्टी समजू शकतात. अजित व राजेंद्र दोघे दीपक घैसासना भेटले, तेही डिनरच्या निमित्ताने. ह्या एका बैठकीतून आर्थिक बाजू कशा बघावा लागतात त्याबाबतची माहिती त्यांना मिळाली. आपल्या व्यवसायाचे प्रॉफीट सेंटर काय आहे, कुठून नफा होतो ते शोधणे ही कल्पनाही अजित यांनी सांगितली.
काम व कुटुंबासाठी वेळ देणे, यांच्यात कसा समन्वय साधता हा एक हमखास प्रश्न असतो. त्याबाबत ते म्हणतात, २००२ पर्यंत आम्ही कामात सतत व्यस्त असायचो. घराकडे लक्ष दिले नाही. ते संघर्षाचे दिवस होते. नंतर घडी बसल्यावर व डेलिगेशन करणे सुरू केल्यावर आता वेळ देऊ शकतात.

मराठी उद्योजक म्हटल्यावर समाजसेवेची अपेक्षा असते. उद्योजक स्वत: त्यात गुंतला तर व्यवसायाकडे दुर्लक्ष होणार हा धोका त्यात असतो. परंतु निर्माणने त्याचीही एक सुनियोजित प्रणाली तयार केली आहे. प्रत्येक प्लॅटमागे ते पाच हजार रुपये समाजासाठी बाजूला काढून ठेवतात. त्यातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल शंभर मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवला जातो.

यापुढील व्हिजनबाबत ते सांगतात, आम्हाला कधीच रहेजा, हिरनंदानी बनायचे नव्हते. एल अॅन्ड टी सारखी एक उत्तम नाव असलेली कंपनी व्हावे असे वाटते. आणखी तीन वर्षांनी वार्षिक उलाढाल पाच हजार कोटीपर्यंत नेण्याचा त्यांचा मानस आहे. आज त्यांचे चाळीस प्रकल्प सुरू आहेत. भारतातील पहिल्या पाच बिल्डरपैकी एक त्यांना व्हायचे आहे. या उद्दीष्टांबरोबरच राजेंद्र यांनी एक उद्दीष्ट सांगितले ते अक्षरश: क्रांतिकारी म्हणावे असे आहे. मराठी समाज म्हणजे धंदा करणारा समाज अशी समाजाची ओळख असावी अशी त्यांची महत्वाकांक्षा आहे. असा विचार सुचणे हीच परिवर्तनाची नांदी आहे.
बॉर्न२विन आपल्या प्रशिक्षणातून उद्योजकांना प्रेरित करत असतेच, पण अशा कार्यक्रमातून सातत्याने उद्योग व अर्थक्षेत्रातील मान्यवरांना, लोकांसमोर आणून त्यांचे उद्बोधन करत असते, त्यामुळे राजेंद्र यांची महत्वाकांक्षा पूर्ण होईल अशी आशा वाटते.


उदय कुलकर्णी  ९८६९६ ७२६९६
kuluday@rediffmail.com

23 November 2011

नववा लक्ष्यसिध्दी सोहळा: "उद्योग निर्माण"

नमस्कार!
मित्रांनो २०११ हे वर्ष कधी सुरु झाले आणि आता कधी संपत आले, हे कळलेच नाही... नाही का? २०११ हे वर्ष बॉर्न टू विनसाठी अतिशय समाधान कारक होते असे नक्कीच मला म्हंटले पाहीजे. २०११ मध्ये BORN2WIN ने NLP (Neuro Lingustic Programming) हा उपक्रम मराठीत सुरु केला व एकूण चार प्रशिक्षणक्रम राबविले. त्या द्वारे एकूण ८७ NLP Practitioners BORN2WIN ने तयार केले. त्याच प्रमाणे फ्युचर पाठशालाच्या एकूण ६ शाखांद्वारे फ्युचर पाठशाला उन्हाळी सुट्टी दरम्यान माटूंगा, चेंबुर, वाशी, खारघर, बोरीवली व बोईसर येथे राबवण्यात आला. Graphology (हस्ताक्षराद्वारे मनोविश्लेषण) चे मराठीतुन एकूण २ प्रशिक्षणक्रम आपण राबवले, व तिसरी बॅच २७ नोव्हेंबर रोजी सुरु होत आहे. BORN2WIN चा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम LAKSHYAVEDH ADVANCE हा एक वर्षाचा उद्योजकता विकास कार्यक्रम देखिल २०११ मध्ये सुरु झाला व दोन प्रशिक्षणक्रम सध्या दणदणीत रित्या सुरु आहेत. बॉर्न टू विनचा परिवार दिवसेंदिवस वाढत आहे व बॉर्न टू विनच्या प्रशिक्षणार्थ्यांचा यामध्ये खुप मोठे योगदान आहे. लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाला तर महाराष्ट्रीय मंडळींनी अक्षरशः डोक्यावर उचलुन घेतले आहे व त्याची लोकप्रियता प्रचंड प्रमाणात वाढत आहे.

लक्षवेधच्या नवव्या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्यांची कामगिरी तर Record Breaking आहे. ही बॅच खरच खुप छान झाली व प्रशिक्षणार्थ्यांची मस्त गट्टी जमली आहे. आता सगळे आजी माजी प्रशिक्षणार्थी वाट पाहत आहेत ती म्हणजे नवव्या लक्ष्यसिध्दी सोहळ्याची...
मित्रांनो आगामी लक्ष्यसिध्दी सोहळा पार पडणार आहे २५ नोव्हेंबर २०११ रोजी, वीर सावरकर सभागृह, प्रभादेवी येथे संध्याकाळी ६:३० वाजता.

मित्रांनो, नेहमी प्रमाणे लक्ष्यसिध्दी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असणार आहेत कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे व मार्गदर्शक! यावेळचे प्रमुख पाहूणे म्हणजे एक व्यक्ति नसुन दोन व्यक्ति असणार आहेत. हो मित्रांनो, निर्माण रिअल्टर्स अँड डेव्हलपर्स लि. या कंपनीचे संस्थापक श्री. अजीत मराठे व श्री. राजेंद्र सावंत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत 'उद्योग निर्माण' या त्यांच्या लाइव मुलाखती द्वारे. त्यांची मुलाखत घेणार आहेत, बॉर्न टू विन चे संचालक अतुल राजोळी. ह्या मुलाखती द्वारे निर्माण या संस्थेची शुन्यातुन झालेली सुरुवात व विस्तार याबाबत सविस्तर उलगडा होणार आहे. आपणास जिवनात जर यशस्वी व्हायचे असेल व यशाची सुत्रे जाणुन घ्यायची असतील तर खुद्द यशस्वी व्यक्तींकडून हे जाणुन घेणे नेहमीच उत्तम! 


निर्माण बद्दल थोडेसे:
'To be among the top 5 builder developers in India and among the top 25 in the world while being the leader in the affordable housing segment by creating better lifestyles and better environments through state of the art township at affordable rates.'


हे ब्रीद वाक्य घेउन आज निर्माणची वाटचाल सुरु आहे. १९९५ साली अजित मराठे आणि राजेंद्र सावंत या दोन युवकांनी भागीदारीत सुरु केलेल्या ह्या फर्मचे रुपांतर आता रिअल्टर्स अँड डेव्हलपर्स लि. अशा पब्लिक लिमिटेड कंपनीत झाले आहे. येत्या २ ते ३ वर्षात या कंपनीचा पब्लिक इश्श्यु बाजारात येणार आहे आणि आज फक्त एक कंपनी न रहाता अनेक कंपन्यांचा हा निर्माण ग्रुप तयार झाला आहे.

निर्माण रिअल्टर्स अ‍ॅंड डेव्हेलपर्स लिमिटेड कंपनीच्या अंतर्गत मुख्यतः बिल्डर डेव्हलपर म्हणून विविध ठिकाणी जागा विकत घेऊन त्या जागेवर विविध प्रकारचे प्रकल्प मुख्यतः निवासी प्रकल्प उभारण्याचे काम केले जाते. असे आज जवळजवळ ४० प्रकल्प विविध स्तरावर आणि विविध ठिकाणी सुरु आहेत. कांदिवली, मालाड, जोगेश्वरी, महालक्ष्मी, पार्ले, गोवंडी, नेरळ, रत्नागिरी, गणपतीपुळे, मांणगाव (गोरेगांव), गोवेले इ. सर्व ठिकाणी प्रकल्पांचे काम सुरु आहे.

बिल्डरच्या हाताखाली बिल्डर ही संकल्पना निर्माणने अतिशय उत्तमरित्या राबविली आहे. अधिकाधिक मराठी लोकांनी बांधकाम व्यवसायात यावे या दृष्टीकोनातून विविध स्तरावरील प्रशिक्षण वर्ग निर्माण ट्रेनिंग अ‍ॅकेडमी तर्फे राबविले जाते. प्रत्येक बुकींग मागे रु. ५०००/- हे निर्माण चॅरिटेबल ट्रस्टच्या खात्यात जमा होतात. या ट्रस्ट तर्फे मांणगाव येथील १०० विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च ट्रस्ट करते. मुंबईतील काही अनाथश्रयातील विद्यार्थी देखिल या योजने अंतर्गत दत्तक घेतले आहे. कोकणातल्या विविध ठिकाणच्या उद्योगधंद्यांना पुरक असे मनुष्यबळ विकसित करुन कोकणातील तरुणांना त्याच्या स्वतःच्या पायावर उभे करावे असे उद्दिष्ट ठेऊन निर्माण तर्फे माणगाव - जिल्हा रायगड येथिल I. T. I. केंद्र शासनाच्या सहाय्याने चालिवले जाते.त्यात परंपरागत कोर्सेस सोबत काही नविन अभ्यासक्रम चालू करण्याचा मानस निर्माणने ठेवला आहे त्यामध्ये पर्यट्न, संगणक, इंग्रजी संभषण, कृषी विषयक अभ्यासक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे.

असा हा स्फुर्तीदायक कार्यक्रम अजिबात चुकवू नका...!

नववा लक्ष्यसिध्दी सोहळा:
विषय: उद्योग निर्माण
दिनांक: २५ नोव्हेंबर २०११
स्थळः वीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क जवळ, दादर(प.)
प्रवेश विनामुल्य
संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९



29 October 2011

स्टीव्ह जॉब्स: 'मरावे पण किर्ती रुपी उरावे...'

नमस्कार मित्रांनो!
याच महीन्यात अ‍ॅपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांचे निधन झाले. स्टीव्ह जॉब्स या व्यक्तीबद्दल मला प्रचंड आदर आहे. त्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात केलेले योगदान प्रचंड मोठे आहे. जी व्यक्ती ग्रॅज्युएट देखिल नाही, कॉलेजचा चेहरापण कधी ज्या व्यक्तीने पाहिला नाही त्या व्यक्तीने सर्वसाधारण व्यक्तीचा तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला व आपण कल्पना ही करु शकत नाही असा क्रांतीकारक बदल संपुर्ण जगात घडवून आणला.
स्टीव्ह जॉब्स यांनी २००५ साली स्टॅनफॉर्ड विद्यापिठात अतिशय स्पुर्तीदायक असे भाषण केले होते. या भाषणातील "Stay Hungry, Stay foolish" हे वाक्य माझ्यासाठी नेहमीच दिशादर्शक ठरले... Thank You Steve Jobs...! तेच भाषण आपणास पाहण्यासाठी खाली उपलब्ध करुन देत आहे. त्याच प्रमाणे, लोकसत्ता या वृत्तपत्रात आलेल्या स्टीव्ह जॉब्स यांच्या भाषणाचा गिरीष कुबेर यांनी केलेला अनुवाद देखिल आपणास वाचण्यासाठी उपलब्ध करून देत आहे.
दिनांक ६ ऑक्टोबर २०११ रोजी स्टीव्ह जॉब्स मरण पावले. परंतु त्यांच्या योगदानाच्या रुपात ते नेहमीच आपल्या मनात जीवंत राहतील. We miss you Steve.....
कृपया Steve Jobs यांच्या भाषणाचा अनुवाद जास्तीत जास्त लोकांना वाचण्यास प्रवृत्त करा. धन्यवाद..!






अन्यथा.... : उद्याच्या ‘अॅपल’कारांसाठी..




गिरीश कुबेर, शनिवार, ३ सप्टेंबर २०११
girish.kuber@expressindia.com


मित्रानो, मला तुमच्यासमोर भाषणासाठी संधी मिळाली, याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे. इतक्या प्रतिष्ठित विद्यापीठातील बुद्धिमान मुलांसमोर बोलायला मिळणं, हा मला माझा मोठा सन्मान वाटतो. खरं सांगायचं विद्यापीठाशी माझा संबंध आला तो हा असा आणि इतकाच. कारण तुमच्यासारखं असं माझं शिक्षण कधीच झालं नाही. आता तुमच्यासमोर आलोच आहे, तर मला तीन प्रमुख गोष्टी तुमच्यासमोर उघड करायच्या आहेत.
पहिलं म्हणजे मी माझं महाविद्यालयीन शिक्षण कधीच पूर्ण करू शकलो नाही. सहा महिन्यांतच मला इथल्या वातावरणाचा कंटाळा आला. नंतर कसंबसं वर्ष काढलं मी महाविद्यालयात. पण मी इथं कधी रमलोच नाही. हे असं का झालं असावं? माझ्या दृष्टीनं याची कारणं माझ्या जन्मातच असावीत. माझी आई अविवाहित असतानाच तिला मी झालो. बाळंत झाली तेव्हा ती महाविद्यालयात शिकत होती. तेव्हा तिची परिस्थिती लक्षात घेता तिनं मला दत्तक द्यायचं ठरवलं. एक वकील आणि त्याची सुविद्य पत्नी मला दत्तक घेणार होते. पण ऐन वेळी ते म्हणाले त्यांना मुलगी हवीये. तेव्हा माझी आई चिडली. तिची अट होती की कोणा पदवीधरालाच मला दत्तक द्यायचं. पण हे असं घडलं. तेव्हा ऐन वेळी जो समोर आला, त्याला तिनं मला देऊन टाकलं. अट एकच. मला महाविद्यालयात शिकू द्यायचं. तेव्हा माझे आताचे जे आईवडील आहेत, ते मला लाभले.
गरीब होते ते. पण त्यांना मी शिकावं असं प्रामाणिकपणे वाटत होतं. माझ्या खऱ्या आईच्या इच्छेला मान देत त्यांनी मला शिकू द्यायचं ठरवलं. तेव्हा मी महाविद्यालय निवडलं ते अगदी महागडं होतं. अगदी स्टॅनफोर्डइतकं. माझं म्हणणं शिकायचं तर मग स्वस्त महाविद्यालयात कशाला जा. पण खरं सांगायचं तर त्यात काहीही अर्थ नव्हता. कारण मी जे काही शिकत होतो, त्यातलं काहीही मला आवडत नव्हतं. एकीकडे पोटाला चिमटा काढून माझी फी भरणारे माझे आईवडील आणि ओढूनताणून शिकणारा मी. १७ वर्षांचा होतो, तेव्हा हे जाणवलं. मग ठरवलं. हे फारच होतंय. आयुष्यात काय कराचंय ते दिसत नाहीये आणि तरीही आपण आईवडिलांचे घामाचे पैसे असे उधळतोय. हे बरोबर  नाही. त्याच क्षणी निर्णय घेतला. हे नावडतं शिकणं थांबवायचं. बाहेर पडलो महाविद्यालयातून. मोकळा श्वास घेतला. एव्हाना जाणवलं होतं, आपण जे काही करतोय ते फारच स्वप्निल आहे. मित्राच्या वसतिगृहावर राहायला गेलो. इतरांच्या रिकाम्या कोकच्या बाटल्या  वगैरे विकून जेवायला चार पैसे मिळाले तर मिळवायचो. आठवडय़ातून एकदा मात्र पलीकडच्या गावातल्या हरे कृष्ण मंदिरात जायचो. अर्थात तिथे काही भक्ती वगैरे होती म्हणून नाही. तर तिथे आरतीनंतर मोफत जेवण मिळायचं म्हणून. पण तिथे जायलाही पैसे नसायचे. तेव्हा चालत जायचो. म्हणजे जायचेयायचे १४ किमी अंतर मी चालायचो. या काळात मला प्रश्न पडायचा. मला नक्की काय आवडतंय. तेव्हा लक्षात आलं. आपलं सुलेखन कलेवर प्रेम आहे. मग ते शिकायला लागलो. अक्षरांचे आकार, त्यांचे तलम पोत मला फार आवडायचे. अक्षरांच्या नुसत्या मांडणीतूनसुद्धा काही सांगता येतं, असं मला वाटायचं. आपण त्यांना कसं सादर करतो, यावर बरंच काही अवलंबून असतं, हे मला जाणवलं. त्यामुळे मी त्या कलेचं शिक्षण घ्यायला लागलो. जे शिकतोय त्याचा काय उपयोग, नोकरी मिळणार आहे का त्यामुळे, वगैरे फालतू प्रश्नांनी मी मला विचलित होऊ देत नव्हतो. आवडतंय ना.. शिकायचं. इतकाच तो विचार.
पुढे १० वर्षांनी जेव्हा मी माझा पहिला संगणक तयार केला, तेव्हा या सुलेखन कलेचा उपयोग झाला. कारण इतरांच्या तुलनेत माझ्या संगणकाचा कळफलक जास्त चांगला आणि सुलेखनासाठी उपयुक्त असलेला होता. मी तेव्हा जे शिकलो, ते हे असं उपयोगी आलं. मग जाणवलं, बरंच झालं आपलं महाविद्यालय सुटलं ते. मी असा त्या वेळी बाहेर पडलो नसतो, तर हे काही जमलंच नसतं.
दुसरी गोष्ट माझ्या उद्योगाची. मी आणि वॉझ यांनी माझ्या वडिलांच्या गॅरेजमध्ये पहिला संगणक तयार केला. बरीच खटपट करावी लागली. चांगलं फळ आलं त्याला. तेव्हा आम्ही नाव दिलं आमच्या संगणकाचं अ‍ॅपल. हे जमलं तेव्हा मी जेमतेम २० वर्षांचा होतो. मग आम्ही दोघांनी कंपनीच काढली. पुढच्या १० वर्षांत आम्हा दोघांच्या कंपनीत चार हजारजण नोकरीत होते आणि अ‍ॅपलचा आकार २०० कोटी डॉलर्सचा झाला होता. आमचा पहिला मोठा संगणक जन्माला आला होता. मॅकिंतोश. मी तेव्हा तिशीत होतो. तिथे दुसरा धक्का बसला.
मला माझ्या भागीदारानं कंपनीतून काढूनच टाकलं. मला प्रश्न पडला. मीच जी कंपनी जन्माला घातली, तिथून मलाच कसं काय हे लोक बाहेर काढतात. पण तसं झालं होतं खरं. तेव्हा मी ठरवलं, या प्रश्नाच्या उत्तरात रक्त आटवायचं नाही. नवं करूया काहीतरी. खरं तर समोर अंधार होता. पण म्हटलं हरकत नाही. जमेलच आपल्याला काही ना काही. तशी खात्री होती. कारण माझं माझ्यावर प्रेम होतं. शांत बसलो. स्वत:लाच विचारलं. झालं ते झालं. आपल्याला आता काय करायला आवडेल. माझं पहिलं प्रेम होतं ते अर्थातच अ‍ॅपल. दुसरं काय? तर तेही अ‍ॅपलच. मग दुसरी संगणक कंपनी काढायची मी ठरवलं. तिला नाव दिलं नेक्स्ट. पाठोपाठ दुसरा उद्योग सुरू केला पिक्सर नावानं. जगातली पहिली अ‍ॅनिमेशन फिल्म मी केली. तिचं नाव टॉय स्टोरी. आजही तिची लोकप्रियता कमी झालेली नाही. याच काळात माझ्या कंपनीचा विस्तार इतका झाला की अ‍ॅपलला पुन्हा मोह झाला या कंपन्या घेण्याचा. कारण मी विकसित केलेलं तंत्रज्ञानच तसं होतं. शेवटी अ‍ॅपलनं या कंपन्या विकत घेतल्या. मी आपोआपच पुन्हा अ‍ॅपलमध्ये आलो. अ‍ॅपलचा सध्याचा जो काही विस्तार सुरू आहे तो मी नेक्स्ट आणि पिक्सरमध्ये जे काही केलं, त्याच्या जोरावर. इथंच मला माझी जीवनसाथी मिळाली. लॉरीन आणि माझा संसार उत्तम सुरू आहे.
मागे वळून बघितल्यावर आता मला वाटतं, अ‍ॅपलनी मला हाकललं नसतं तर नेक्स्ट आणि पिक्सर जन्माला आल्या असत्या का? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मला लॉरीन मिळाली असती का?
माझी तिसरी गोष्ट मरणाविषयीची आहे.
सतराव्या वर्षी मी कुठेतरी वाचलं होतं, ‘‘आपण प्रत्येक उगवणारा दिवस हा आपला जणू शेवटचाच दिवस आहे असं जगायला लागलो तर एखादा दिवस असा उजाडतो की त्या सगळय़ा जगण्याचा अर्थ कळतो.’’ हे वाक्य माझ्या डोक्यात सतत गुंजत असतं. मरणाचं भान सतत असलं मनात तर आपण वेळ वाया घालवत नाही. यशापयश, मानापमान वगैरे सर्व भौतिक भावना मरणात संपून जातात. आपण काहीतरी गमावणार आहोत ही भावना मृत्यूच्या जाणिवेने आपल्याला नग्न करत असते. याचं भान आलं की एकच प्रश्न त्यावर पुरून उरतो. आपण जो काही वेळ आपल्याला मिळाला.. त्याचं काय केलं? तो सत्कारणी लावला का? हा प्रश्न माझ्या डोक्यातून कधी जात नाही.
गेल्या वर्षी कर्करोग झाल्याचं निदान झालं. ते कळल्यावर डॉक्टरांनाच वाईट वाटलं. कारण हा अगदी दुर्मीळ असा कर्करोग आहे. स्वादुपिंडाचा. डॉक्टर म्हणाले, तयारीला लागा.. शेवटच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करून घ्या.. जेमतेम तीन महिने तुम्हाला मिळतील.
मी घरी गेलो. दोन दिवसांनी माझी बायोप्सी करायची होती. त्यासाठी मला डॉक्टरांनी भूल दिली. घशातून एंडोस्कोप पोटात सोडला अणि माझ्या स्वादुपिंडाच्या काही पेशी घेऊन तो बाहेर आला. मी बेशुद्धच होतो. पण लॉरीन ते सगळं पडद्यावर बघत होती. ती म्हणाली, एंडोस्कोप बाहेर आल्यावर डॉक्टरच रडायला लागले. कारण त्यांना लक्षात आलं, परिस्थिती काही इतकी वाईट नाही. शस्त्रक्रिया केली तर मी वाचू शकेन. तशी ती शस्त्रक्रिया झाली आणि मी वाचलोदेखील.
मृत्यूच्या या स्पर्शानं मला बरंच काही शिकवलं. मरणाइतकं काहीही शाश्वत नाही. आपल्याला वेळ कमी असतो आणि तरीही त्यातला मोठा वाटा आपण वायाच घालवतो. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, मला सांगायचंय ते इतकंच की.. इतरांची मतं, त्यांचे जगण्याचे निष्कर्ष, मार्गदर्शन या गोंडस नावाने त्यांच्याकडून लादली जाणारी मतं.. याचा कसलाही विचार करू नका.. इतरांच्या मतांचं ओझं कधीही वागवू नका.. जे काही जगायचंय ते स्वत:च आयुष्य जगा. तुम्हाला आयुष्यात काय आवडतं ते तुमच्या मनाला माहीत असतं.. त्याचं तेवढं लक्ष देऊन ऐका. बाकीचं सगळंच दुय्यम असतं. धन्यवाद.
(अ‍ॅपलचा जन्मदाता स्टीव्ह जॉब्स नुकताच कंपनीतून पायउतार झाला. त्याआधी स्टॅनफोर्ड विद्यापीठानं त्याला विद्यार्थ्यांसमोर भाषणासाठी बोलावलं होतं. तेथील भाषणाचा हा स्वैर अनुवाद.. उद्याच्या अ‍ॅपलकारांसाठी)

07 October 2011

अतुल राजोळी यांची लाइव मुलाखत झी २४ तास वर

नमस्कार मित्रांनो,
दिनांक ५ ऑक्टोबर २०११ रोजी बॉर्न टू विनचे संचालक अतुल राजोळी यांची लाइव मुलाखत झी २४ तास या वाहीनीवर 'हितगुज' या कार्यक्रमामध्ये आयोजित करण्यात आली होती. मुलाखतीचा विषय होता 'लघुउद्योजकीय व्यवस्थापन व विकास'
या मुलाखतीमध्ये अतुल राजोळी यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये लघुउद्योजकांना अनुसरुन व्यवसाय व विकास यांवर आधारीत प्रश्नांना उत्तरे दिली.

आपणास जर ही मुलाखत पहाण्याची संधी मिळाली नसेल, अथवा आपणास ही मुलाखत पुन्हा पाहण्याची इच्छा असेल, तर संपुर्ण मुलाखत आपण या ब्लॉगमध्ये खाली पाहू शकता. तीन भागांमध्ये ती इथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

फक्त क्लिक करा व पहा...

भाग १



भाग २



भाग ३



21 September 2011

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती - वॉरन बफे


१.त्यांनी वयाच्या अवघ्या अकराव्या (११) वर्षी शेअर बाजारात गुंतवणुक कर ण्यास सुरुवात केली. आणि तरी देखिल आपण खुप उशीरा सुरुवात केली याची त्यांना खंत आहे.
२. वृत्तपत्रे विकुन मिळवलेल्या कमाईतून त्यांनी एक छोटीशी शेत जमीन विकत घेतली. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी.
३. ते आजही मिड टाउन येथील त्यांच्या जुन्या ३ बेडरूमच्या घरात राहतात, जे त्यांनी ५० वर्षांपुर्वी त्यांच्या लग्नाच्या आधी घेतले होते. वॉरन बफे यांच्या मतेत्यांना मोठ्या घराची गरज नाही. आजही त्यांच्या घराला कुंपणाची भिंत नाही.
४. वॉरन बफे त्यांची कार स्वतःच चालवतात. त्यांना ड्रायव्हर अथवा सुरक्षारक्षकांची गरज नाही.
५. वॉरन बफे जगातील सर्वात मोठ्या विमान कंपनीचे मालक आहेत. पण ते कधीही स्वतंत्र विमानाने प्रवास करत नाहीत.
६. त्यांची कंपनी बर्कशायर हाथवेच्या (Berkshire Hathaway) मालकीच्या ६३ कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांच्या CEO's (कार्यकारी अधिकारी) ना ते फक्त वर्षाला एक पत्र लिहितात. सर्व CEO's ना त्यांनी दोन नियम सांगीतले आहेत. पहिला नियम, कधीही आपल्यागुंतवणुकदारांचे पैसे बुडणार नाहीत याची काळजी घ्या. दुसरा नियम, कधीही पहिला नियम विसरु नका.
७. त्यांना इतर उच्च वर्गीयांबरोबर वेळ व्यतीत करणे आवडत नाही. घरी आल्यावर स्वतःसाठी काही पॉपकॉर्न बनवुन चित्रपट बघणे हा त्यांचा आवडता छंद आहे.

८. बिल गेट्स या जगातील दुसर्‍या श्रीमंत माणसाची त्यांच्याशी पाच वर्षांपुर्वी भेट झाली. बिल गेट्सला तेव्हा वाटले की वॉरन बफें बरोबर बोलण्या सारखे काहीच नाही त्यामुळे त्यांनी मीटींग साठी केवळ अर्ध्या तासाचा वेळ दिला. मात्र प्रत्यक्षात हीभेट दहा तास चालली. आणि त्या भेटी नंतर बिल गेटस हे वॉरन बफे यांचे भक्तच झाले.
९. वॉरन बफे आजही मोबाइल फोन वापरत नाहीत. तरुणांसाठी वॉरन यांचा सल्ला - "क्रेडीट कार्ड पासुन दुर रहा. खरी गुंतवणुक स्वतःमध्ये करा."
-- पैशाने माणसाला घडवले नसुन माणसाने पैसा बनवला आहे.
-- जितकी साधे जीवनमान राखता येइल तितके साधे रहा.
-- ऐकावे जनाचे करावे मनाचे.
-- ब्रॅंड पाहुन खरेदी करु नका. आपल्याला जे आवडते तेच खरेदी करा.
-- अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करु नका. तेवढेच विकत घ्या ज्याची गरज आहे.
दरवर्षी मी काही धोरणे अवलंबतो, जी पुढे वर्षभर सर्व उलाढालीत माझ्यासाठी दिपस्तंभाचे काम करतात. आणि स्वत:च शिकून घेतलेल्या या धड्यांमुळे दरवर्षी माझे फ़क्त वयच वाढत नाही तर शहाणपणाही तेवढाच वाढतो।
१०. या वर्षी मी तुम्हा सर्वांना पुराणकाळापासून चालत आलेल्या (पण विस्म्रुतीत गेलेल्या) अशाच काही शहाण पणाच्या गोष्टी सांगणार आहे -

* अपार कष्ट करा : मेहनत कधिच वाया जात नाही, पण काम न करता केलेली बाप्ष्फळ बडबड 
मा
सा
ला लयास नेल्या खेरिज राहत नाही.

*
 
आळस झटकुन टाका :
वाळुवर झोपुन राहणारा खेकडा कोणत्याही लाटेबरोबर समुद्रात वाहुन जातो.
* ऊत्पन्न(मिळकत) : कधिही केवळ एका उत्पन्नाच्या साधनावर अवलंबून राहु नका. एका मर्गाने 
येणार्‍या 
०० रुपयांपेक्षा १०० मर्गांनी येणारा १-१ रुपया नेहमीच चांगला.

* खर्च - आवश्यकते पेक्षा जास्त खरेदी केली तर लवकरच आवश्यक असणारया गोष्टी विकाव्याची वेळ येईल.
*बचत - खर्च करुन उरलेले उत्पन्नाची बचत करण्यापेक्षा, आधी बचत करुन नंतर उरलेले पैसे खर्च करा.
* कर्ज - कर्ज घेणारा हा कर्ज देणरयाचा गुलाम हॊउन जातो.
* जमाखर्च - जमाखर्च मांडणे आणि त्याचा अभ्यास करणे अतिशय मह्त्वाचे आहे. जरबूटच फ़ाटला असेल तर पावसाळ्यात छ्त्रीचा काय उपयोग ?
* हिशोब तपासणे - लहान लहान खर्चांचा ताळेबंद ठेवा, एक छोट्याशा भोकामुळे पुर्णजहाज बुडू शकते.
* आर्थिक धोका - बरयाच इन्वेस्ट्मेन्ट्स भरपुर फ़ायदा देणरया आणी आकर्षक असतातमात्र त्यात तेवढाच धोका लपलेला असतो. त्यामुळे अशा इन्वेस्ट्मेन्ट्सचा जराकाळजीपुर्वक विचार करुन करा. जर नदीची खोली पहायची असेल तर दोन्ही पाय पाण्यातटाकुन कसे चालेल?
* गुंतवणुक - सर्व अंडी एकाच पारड्यात टाकुन कसे चालेल बरे?


मला खात्री आहे की जे या सर्व सुचनांचे आधीपासून पालन करत आहेत, त्य सर्वांचीआर्थिक परिस्थिती उत्तम असेल. आणी मी हे देखिल खात्रीपुर्वक सांगु शकतो, कि जे यासर्व सुचनांचे पालन करायचे ठरवतिल तेही लवकरच आर्थिक सुखाचा आनंद घेतिल. चला आपण सर्वजण हुशार हॊउया आणि एक सुखी, समाधनी आणी शांत जीवन जगुया.
माणुस आर्थिक गरजेपोटी आयुष्यभर धडपडत असतो, त्याचं मुख्य कारण म्हणजे माणसाने शाळा व कॉलेजमध्ये बरीच वर्षे शिक्षण जरी घेतले असले तरी पैश्याबद्दल त्याला काहीच शिकवलं गेलेलं नसतं. परिणामस्वरुपी माणुस पैश्यासाठी काम करायला शिकतो परंतु स्वत:साठी पैश्याकडून काम करवून घ्यायला मात्र कधीच शिकत नाही. बॉर्न टू विन सादर करत आहे, THE FINANCIAL BLUEPRINT SEMINAR जो आपल्या उत्पन्नाचे योग्य नियोजन करुन आजच्या महागाईने ग्रासलेल्या युगात आपल्याला आर्थिकदृष्ट्या सबळ बनविण्यास मार्गदर्शन करेल.

योग्य आर्थिक नियोजनाच्या मदतीने सर्वसाधारण माणुस करोडपती बनु शकतो व योग्य आर्थिक नियोजनाच्या अभावी करोडपती माणुस कंगाळ होऊ शकतो! एकविसाव्या शतकात आपल्याला आज खरी गरज आहे ती आर्थिक साक्षरतेची. THE FINANCIAL BLUEPRINT SEMINAR आपल्याला अत्यंत सोप्या व सरळ पद्धतीने आर्थिकदॄष्ट्या साक्षर बनवेल.
या प्रभावशाली कार्यक्रमात आपणास खालिल गोष्टींचे स्पष्टीकरण होईल
- देशातील आर्थिक व्यवस्थेबाबतची वस्तुस्थिती
- कष्टाची कमाई गिळंकृत करणारे साप
- महागाईवर मात
- आर्थिक व्यवस्थापनाचा पिरॅमिड
- कोणतीही तडजोड न करता, सन्मानाने व समृध्दीने निवृत्त कसे व्हावे?
- योग्य आर्थिक नियोजन कसे करावे?
- सुयोग्य गुंतवणुकीचे पर्याय व परिणाम

वक्ते: श्री. अरुण सिंह
श्री. अरुण सिंह, हे वेल्थ क्रिएटर या आर्थिक सल्लागार संस्थेचे संचालक आहेत व या क्षेत्रामध्ये ते गेले दहा वर्षे कार्यरत आहेत. आर्थिक साक्षरतेबाबत समाजामध्ये जनजागृती व्हावी या एकमेव ध्यासापोटी निरनिराळ्या कार्यक्रमांव्दारे आजपर्यंत हजारो लोकांपर्यंत अरुण सिंह पोहोचु शकले आहेत. आर्थिक व्यवस्थापनाविषयीचे प्रचंड ज्ञान असलेल्या अरुण यांना या क्षेत्रात वेल्थ विझर्ड असे संबोधले जाते!
 
दिनांकः २ अक्टोबर २०११
वेळः ठिक संध्याकाळी ६ वाजता
स्थळ: टेक्सटाईल कमिटी हॉल, टाटा प्रेस जवळ, प्रभादेवी, दादर (प.)

गुंतवणूक: रुपये ५०० फक्त

अधिक माहितीसाठी संपर्कः  022-22939375/6/7/8, 7666426654, 9619465689
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites