तुमचे मन शांत ठेवण्याचे काही उपाय पुढे दिले आहेत. नेहमी तुमच्या वर्तमानाविषयी जागरुक रहा आणि आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. तुमच्या अंतर्मनातील शांततेचा अनुभव हे क्षण देत असतात त्याचबरोबर वस्तुस्थितीला सामोरे जाण्याची ताकदही.
स्वस्थचित्तासाठी दीर्घश्वसन : श्वसनाच्या व्यायामामुळे तुमचे शरीर स्वस्थचित्त बनते. शरीर आणि मन ताजेतवाने होते. दिर्घ श्वसनामुळे अंतरात्म्याशी संवाद शाधता येतो.
इतरांकडून शिका : शिकणे ही कायमस्वरुपी चालणारी प्रक्रीया आहे. तुमच्या अवती-भवती वावरणार्यांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. ते आपले सर्वोत्कृष्ट शिक्षक असतात. त्यांच्याकडून चांगले गुण घ्या. त्यांच्या अनुभवातून शिकत रहा.
निसर्गातील सौंदर्य न्याहळा : निसर्ग ही देवाची सगळ्यात सुंदर निर्मिती आहे. पक्ष्यांचे गाणे, वाहणार्या पाण्याचा आवाज, निसर्गाची साद हे सगळे मनुष्याला सुखावणारे असते त्याचा आस्वाद आणि आनंद कसा घ्यायचा हे मात्र आपल्यालाच ठरवावे लागते. लवकर उठा, फिरायला जा, सूर्योद्यापूर्वीचा निसर्ग मनात साठवा, लांबवर एकटेच चालत जा. या सगळ्यातून निसर्गातील सौंदर्याची आणि सुप्त ऊर्जेची जाणीव आपल्याला होते.
संगीताची ताकद : तुमच्या आवडीचे संगीत ऐका. कुणाचीही फिकीर न करता मस्त पैकी नृत्य करा. त्यामुळे तुमचे मन शांत होण्यास मदत होईल. मन आणि शरीराचे सूर जुळण्यासाठी संगीताचा खूपच उपयोग होतो.
स्वतःच्या विचारांबरोबरील लढाई थांबवा : नेहमी एकाचवेळी तुमच्या डोक्यात अनेक विचारांची गर्दी झालेली असते. हे करु का ते करु, पहिल्यांदा काय करु, त्याचे कसे होणार , घाई केली पाहिजे, हा लगेच दारात उभा आहे अशा गोष्टींनी मेंदू चक्रावून गेलेला असतो. अशा गोंधळामुळे अजिबात घाबरुन जाऊ नका. विचारांचे येणेजाणे चालूच राहिले तरी त्याकडे गरजेनुसार दुर्लक्ष करायला शिका.
विसरा आणि माफ करा : भूतकाळात कधी तरी तुम्ही लोकांना दुखावले असेल. त्या खेदजनक आठवणी अजूनही तुमच्या मनात असतील. तुम्हांला वेदना देणार्यांना माफ करा आणि त्या आठवणींमधून बाहेर पडा.
सौजन्य: संध्यानंद
No comments:
Post a Comment