गेल्या अडीच वर्षांमध्ये BORN2WIN - Training & Consultancy Services च्या निरनिराळ्या सेमिनार्सचा फायदा आता पर्यंत ३०,००० पेक्षा जास्त लोकांना झालेला आहे. तसेच BORN2WIN च्या लक्ष्यवेध, फ्युचर पाठशाला इत्यादी प्रशिक्षणक्रमांचा फायदा आता पर्यंत ५,००० पेक्षा जास्त लोकांना झालेला आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये BORN2WIN ची कामगिरी खरोखरच लक्षणिय आहे, व गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने BORN2WIN च्या संपुर्ण टिमच्या वतीने मी आपणा सर्वांचे मनःपुर्वक आभार मानतो. आतापर्यंत जो विश्वास आपण आमच्यावर दाखविलात तो पुढे ही असाच कायम ठेवाल अशी मी आशा करतो.
प्रशिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असण्याचे माझे एकच उद्दीष्ट आहे ते म्हणजे, "To Inspire & Empower People & Organizations To Achieve What They Deserve & Desire." या एकाच ध्यासापोटी माझा प्रशिक्षणक्रमातील प्रवास सुरु आहे. आणि मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो कि माझे ज्ञान निरनिराळ्या क्षेत्रातील लोकांपर्यंत पोहचविण्यात बर्यापैकी यशस्वी ठरलेलो आहे. माझ्या निरनिराळ्या कार्यक्रमांद्वारे व प्रशिक्षणक्रमांद्वारे मी आत्मसात केलेले ज्ञान सोप्या पण तितक्याच परिणामकारक पध्दतीने शिकविण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. माझ्या कर्यक्रमांची विशेषता म्हणजे अत्याधुनिक वैयक्तिक विकास विषय व तंत्र मी मराठीमध्ये शिकवतो व मी जे काही शिकवतो ते Theory स्वरुपात नसुन लोकांना आचरणात आणता येतील असे Practicle Tools मी शिकवतो. कारण माझं नावच आहे... "Atul ... A - Tool To Empower Your Life!"
माझं असं ठाम मत आहे कि यश मिळवण्यासाठी मेहनतीची किंवा Hardwork ची गरज नसते. गरज असते ती Smartwork ची! आपण कमीतकमी परिश्रमांमध्ये व कमीतकमी कालावधी आपल्याला जे हवे आहे ते मिळवू शकतो! आणि हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवांवरुन सांगत आहे.
THE SUCCESS BLUEPRINT हा चार तासांचा आगळावेगळा कार्यक्रम येत्या ६ ऑगस्ट २०१० रोजी मी आपल्यासाठी घेउन येत आहे. आणि नेमकं हेच मी या कार्यक्रमामध्ये आपणासमोर मांडणार आहे कि कमीतकमी परिश्रमांमध्ये व कालावधीमध्ये आपण कसे यशस्वी होउ शकतो?
या कार्यक्रमामध्ये अतिप्रगत अशी तंत्रे मी आपल्याला शिकवणार आहे ज्याच्या मदतीने आपण आपल्याला जे हवे आहे ते मिळवू शकता! Hardwork न करता व Smartwork करुन! जे तुम्हाला हवे आहे ते... 'आरोग्य, ऐश्वर्य, यश आणि आनंद' तुम्ही कमीतकमी कालावधीमध्ये व कमीतकमी परिश्रमांमध्ये साध्य करु शकता.
THE SUCCESS BLUEPRINT हा एक Action Packed, Power Pcked, Motivational कार्यक्रम असणार आहे ज्याचा तुमच्या आयुष्यात नक्कीच प्रचंड फायदा होईल ...
दिनांकः शुक्रवार, ६ ऑगस्ट २०१०
वेळः सकाळी १०:०० ते दुपारी २:००
स्थळः रविंद्रनाट्य मंदिर, प्रभादेवी, दादर (प.)
गुंतवणुकः रुपये ५००/-, ३५०/- व २००/-
प्रवेशिका मिळविण्यासाठी संपर्कः ०२२- २२९३९३७५/६/७/८, ९८२१८९८१७१, ८०९७७६२११०.
(Click on below To Enlarge Image)
(Click on below To Enlarge Image)