नमस्कार!
मित्रांनो, २०१२ वर्षाचा आज शेवटचा दिवस, आज मी जेव्हा २०१२ या वर्षाकडे मागे वळून पाहिले तेव्हा मला जाणवले की हे वर्ष बॉर्न टू विनसाठी जबरदस्त अनुभव देणारे होते. बॉर्न टू विनच्या टिममधील प्रत्येक सदस्याला वर्ष २०१२ ने भरपूर काही शिकवले. वर्ष २०१२ जरी आज संपत असले तरी या वर्षाने बॉर्न टू विनच्या इतिहासामध्ये एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले.
मित्रांनो वर्ष २०१२ ची सुरुवात बॉर्न टू विनने (B2W) धमाकेदार पध्दतीने केली. आमचा THE SUCCESS BLUEPRINT Workshop, दिनांक ३ जानेवारी २०१२ रोजी आयोजीत करण्यात आला आणि प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात कार्यशाळा पार पडली. THE SUCCESS BLUEPRINT Workshop चे नवे रुप उपस्थितांच्या आयुष्यात अभूतपूर्व अनुभव देऊन २०१२ ची सुरूवात दमदार पध्दतीने झाली.
लक्ष्यवेधच्या १० व्या बॅचच्या लक्ष्यसिध्दी सोहळ्यामध्ये दिनांक २१ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या डबेवाल्यांनी धमाल उडवून टाकली.
मे २०१२ मध्ये लक्ष्यवेध ADVANCE ची तिसरी बॅच सुरू झाली.
१० मे २०१२ रोजी प्रसिध्द अॅड गुरू गोपी कुकडे यांनी अकराव्या लक्ष्यसिध्दी सोहळ्यामध्ये अॅडव्हर्टायसिंग व ब्रँडींगचे फंडे सांगितले.
१३ मे २०१२ रोजी लक्ष्यवेध ADVANCE च्या पहिल्या बॅचचा पदवीदान समारंभ एकदम दणक्यात पार पडला. कार्यक्रमाचे खास आकर्षण होते. लक्ष्यवेध ADVANCE च्या यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांच्या यशोगाथा आणि श्री. मधुकर तळवलकर यांचे खास मार्गदर्शन. It was a highly inspiring event.
२७ मे २०१२ हा दिवस बॉर्न टू विनच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरला. Future Paathshala JOSH २०१२ हा फ्युचर पाठशालाचा स्वप्नपुर्ती सोहळा, भारतातील सर्वात मोठे सभागृह षणमुखानंद हॉलमध्ये २,५०० लोकांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला. डॉ. उदय निरगुडकर व कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे होते. त्यांच्या हस्ते अतुल राजोळीयांचे 'माझा मोटिव्हेटर मित्र' हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.
४ जुलै रोजी पुन्हा एकदा THE SUCCESS BLUEPRINT Workshop जबरदस्त प्रतिसादात पार पडला. धुंवाधार पाऊस, ट्रॅफीक जाम, असे अडथळे पार करुन हाऊसफुल कार्यक्रम करण्याचा पराक्रम B2W ने केला.
२०१२ या वर्षी B2W चे ३ नवीन कार्यक्रम झाले ९ सप्टेंबर रोजी विश्वास निर्मिती, वेगवान प्रगती, १ ऑक्टोबर रोजी MAXIMUM ACHIEVEMENT व २८ नोव्हेंबर रोजी सुसज्ज व्हा, यशस्वी व्हा! असे प्रेरणादायी व मार्गदर्शक कार्यक्रम B2W ने लोकांसमोर आणले. उपस्थित प्रेक्षकांनी या कार्यक्रमांबद्दल उत्तम प्रतिक्रीया दिल्या.!
९ ऑगस्ट रोजी बाराव्या लक्ष्यसिध्दी सोहळ्याम्ध्ये श्री. दिपक घैसास सरांनी खचाखच भरलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये भविष्याचा वेध घेण्याबाबत विचार परिवर्तित करणारे मार्गदर्शन केले.
१ नोव्हेंबर रोजी तेराव्या लक्ष्यसिध्दी सोहळ्यामध्ये डॉ. सुहास अवचट व दिपा अवचट यांनी त्यांच्या यशस्वी रेस्टॉरंट व्यवसायाबाबतची रहस्य सादर केली. याच कार्यक्रमात 'माझा मोटिव्हेटर मित्र' पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली.
लक्ष्यवेध ADVANCE च्या दुसर्या बॅचचा पद्वीदान समारंभ दिनांक १४ डिसेंबर रोजी पार पडला. लक्ष्यवेध ADVANCE च्या यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांच्या यशोगाथांनी उपस्थितांना भारावून टाकले व श्री. नितीन पोतदार सरांच्या प्रोत्साहसात्मक व्याख्यानाने सर्वांची मने जिंकली.
बॉर्न टू विनच्या NLP च्या २०१२ वर्षाचे एकूण चार बॅच झाल्या. आता B2W ने एकूण १५० NLP Practitioners घडवले आहेत. Graphology च्या या वर्षी ३ बॅच झाल्या व Graphology Advance ची एक बॅच झाली. फ्युचर पाठशालाच्या एकूण १० प्रशिक्षणकेंद्राद्वारे यावर्षी ३२५ फ्युचर स्टार्स घडवले गेले.
एकूणच २०१२ हे वर्ष B2W साठी आगळावेगळा अनुभव देणारे व नवीन उद्दीष्ट प्राप्त करुन देणारे ठरले. या वर्षाने B2W वरील जबाबदार्या वाढवल्या आहेत. B2W कडे आता महाराष्ट्रीयन माणसे आशेच्या नजरेने पाहत आहेत. आमच्या कडून आता लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आमचे मनोधैर्य देखिल आत उंचावले आहे.
मित्रांनो वर्ष २०१२ ने आमची एक समजुत आणखी दृढ केली आणि ती म्हणजे " If you can dream it, then you can achieve it" - "जर आपण स्वप्न पाहू शकतो तर ते साध्य देखिल करु शकतो." ही दृढ समजुत २०१२ आम्हाला देऊन आज अलविदा करत आहे... आणि नवीन स्वप्ने व नवीन महत्त्वकांक्षा घेऊन आम्ही वर्ष २०१३ चे स्वागत करत आहोत.
Thank You 2012.... Welcome 2013...!
मित्रांनो, २०१२ प्रमाणेच २०१३ ची सुरुवात आम्ही THE SUCCESS BLUEPRINT Workshop ने करत आहोत. आपण देखिल २०१३ वर्षाची सुरुवात धमाकेदारपणे करण्यासाठी या कार्यक्रमात सामिल व्हा...
कृपया खालिल व्हिडीवो पहा..