दिनांक १६ जानेवारी २०१६ रोजी ठाणे येथिल हॉटेल मौर्य येथे 'दि सिक्रेट्स ऑफ व्हिजनरी बिझनेस' हा कार्यक्रम बॉर्न टू विन व लघुउद्योग भारती तर्फे आयोजित करण्यात आला होता. 'बॉर्न टू विन' ही वैयक्तिक व व्यवसायिक विकास प्रशिक्षण क्षेत्रातील मुंबई येथिल अग्रगण्य संस्था आहे. लघु उद्योग भारती व बॉर्न टू विन यांच्या संयुक्त विद्यमाने त्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते बॉर्न टू विनचे संचालक व विख्यात बिझनेस कोच अतुल राजोळी. संध्याकाळी ५ ते ९.३० वाजेपर्यंत असलेल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित उद्योजकांना जबरदस्त मार्गदर्शन लाभले.
निरनिराळ्या क्षेत्रातील लघुउद्योग वेगात सुरु होतात प्रारंभिक यश मिळवल्या नंतर मात्र व्यवसाय एकाच कक्षेत राहतो. व्यवसायाची उत्तुंग प्रगती मात्र होत नाही. या मागच्या प्रमुख कारणांबाबत अतुल राजोळी यांनी आपल्या विशेष शैलीमध्ये व्याख्यान दिले. 'व्हिजनरी' व्यवसायांबाबत दाखला देत, लघुउद्योजक कसे आपल्या व्यवसायांअंतर्गत अयोग्य निर्णय घेतात व व्यवसायाच्या अधोगतीसाठी कारणीभुत ठरतात याबद्दल उद्योजकांचे डोळे उघडणारे सत्य अतुल राजोळी यांनी कार्यक्रमात मांडले. प्रारंभिक यशानंतर उद्योजकाच्या वागणुकीमध्ये त्याच्या नकळत पाच स्वभाव दोषांमुळे उद्योजक आपल्याच व्यवसायाच्या प्रगतीमधला अडथळा बनतो व याची त्याला जाणिवच होत नाही. वेळेतच उद्योजकांनी जर आपल्यातील स्वभाव दोषांवर मात केली तर व्यावसायिक प्रगती होण्यासाठी उद्योगाला योग्य दिशा लाभते.
कार्यक्रमाच्या पुढील भागात अतुल यांनी व्यावसायिक विकासाच्या पाच टप्प्यांबाबत माहिती दिली. प्रारंभिक टप्पा ते परिपक्व टप्पा पर्यंतच्या प्रवासादरम्यान प्रत्येक उद्योगाच्या एका टप्प्यातुन दुसर्या टप्प्यात स्थलांतर करताना उद्योजकाला अत्यंत महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. याबद्दल अतुल राजोळी यांनी अत्यंत सोप्या आणि विचार परिवर्तित करणार्या पध्दतीने सांगितले.
मध्यांतरानंतर कार्यक्रम आणखी रंगात आला. व्यवसायाच्या प्रगतीसाठी उद्योजकाला स्वतःमध्ये व्यावसायिक नेतृत्व गुण विकसित करावे लागतात. व्यावसायिक नेतृत्त्वाचे पाच स्तर कोणते व त्या स्तरांवरील उद्योजकांचे गुणधर्म कोणते हे अतुल राजोळी यांनी प्रभावीपणे मांडले. त्याच बरोबर जगातील प्रतिष्ठीत व अग्रगण्य 'व्हिजनरी' व्यवसायांची उदाहरणे देत, 'व्हिजनरी' व्यवसायांबाबतची सात रहस्ये अतुल राजोळी यांनी मांडली. विचार परिवर्तित करणारी ही रहस्ये भारावून टाकणारी होती. लघुउद्योजकांनी आपल्या उद्योगाचे रुपांतरण करण्यासाठी व्यवसाय परिवर्तन प्रक्रीयेचा वापर केला पाहिजे व आपल्या व्यवसायाला पुढच्या ट्प्प्यात नेलं पाहीजे. असे प्रतिपादन कार्यक्रमात करण्यात आले. व्यवसाय परिवर्तन प्रक्रियेव्दारे आपल्या व्यवसायाचे रुपांतरण करणार्या काही यशस्वी उद्योजकांनी आपले मनोगतसुध्दा कार्यक्रमात मांडले. बॉर्न टू विनचे चीफ मेंटॉर व अनुभवी व्यवसाय मार्गदर्शक श्री. अतुल गोरे यांनी सुध्दा आपले विचार थोडक्यात मांडले व उद्योजकांना व्यवसाय विकासा संदर्भात अभ्यास करण्याचा सल्ला दिला.
लघुउद्योग भारतीचे ठाणे विभागाचे सचिव श्री. माधव पुजारी व कोकण विभागाचे सचिव श्री. राजेंद्र पाटील हे सुध्दा कार्यक्रमात उपस्थित होते. लघुउद्योग भारतीव्दारे भविष्यात सुध्दा उद्योजकांसाठी असे कार्यक्रम करण्याबाबत त्यांचा मानस आहे.
लघुउद्योजकांच्या व्यवसायाचे प्रशिक्षण करण्यासाठी बॉर्न टू विनच्या कंसल्टंटस् बरोबर वैयक्तिक भेट घेण्यासाठी आपण ९६६४२२६२६० या नंबर वर संपर्क करु शकता.