October 2016 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

21 October 2016

'एक असामान्य यशोगाथा' - श्री. हणमंतराव गायकवाड



बॉर्न टू विनच्या अठ्ठाविसाव्या लक्ष्यसिध्दी सोहळ्यातील, श्री. हणमंतराव गायकवाड यांच्या 'एक असामान्य यशोगाथा' या विषयावरील प्रभावशाली व्याख्यानाचा व्हिडियो पाहण्यासाठी खालिल YouTube लिंकवर क्लिक करा.


व्हिडियो पहा व इतरांबरोबर शेअर करा.


PArt 1



Part 2




Part 3



07 October 2016

सात उद्योजकीय स्वातंत्र्य!

नमस्कार उद्योजक मित्रांनो!
आपण उद्योजक होण्याचा निर्णय नक्की का घेतलात? उद्योजक बनून आपल्याला काय असं मिळणार होतं म्हणून आपण ही जोखिम घेतली? आपला स्वतःचा व्यवसाय सूरु करण्यामागचं नेमकं कारण काय? मित्रांनो, मी हा प्रश्न माझ्या उद्योजकीय विकास कार्यशाळांमध्ये नेहमीच विचारतो. माझ्या समोर बसलेल्या उद्योजकांची या प्रश्नावर निरनिराळी उत्तरे येतात. परंतु त्या सर्व उत्तरांना एकत्रित करुन जर एकाच शब्दात उत्तर द्यायचं झालं, तर मी ठामपणे सांगु शकतो की प्रत्येक उद्योजकाला स्वतःचा उद्योग सुरु करुन जे खरोखरचं हवं असतं ते म्हणजे 'स्वातंत्र्य'!
प्रत्येक उद्योजकाला आपल्या व्यवसायाव्दारे 'अर्थपुर्ण व समृध्द' जीवन जगण्याचं स्वातंत्र्य हवं असतं. हो मित्रांनो! अर्थपुर्ण आणि समृध्द जीवन! माझ्यामते यशस्वी उद्योजकांकडे अर्थपुर्ण आणि समृध्द जीवन जगण्याचं स्वातंत्र्य असतं. मी बऱ्याच यशस्वी उद्योजकांचा मी अभ्यास केला, (त्यामधील काही उद्योजक आज हयात नाहीत.) माझ्या अभ्यासादरम्यान मला असं जाणवलं की प्रत्येक यशस्वी उद्योजक आपलं जीवन अर्थपुर्ण आणि समृध्दपणे जगतो.
अर्थपुर्ण जीवन जगण्याचं स्वातंत्र्य म्हणजे आपल्या मुल्यांनुसार जगण्याचं स्वातंत्र्य, आपल्याला ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात त्यांच्याशी तडजोड न करता जगण्याचं स्वातंत्र्य, आपलं जीवन एका उद्देशाशी निगडीत जगण्याचं स्वातंत्र्य, आपल्या जीवनाव्दारे इतरांना काहीतरी योगदान देण्याचं स्वातंत्र्य.

समृध्द जीवन जगण्याचं स्वातंत्र्य म्हणजे आपलं ध्येय ठरवून ते साध्य करण्याचं स्वातंत्र्य, आपल्या विचारांनी, भावनांनी व कृतीनी वैभवशाली होण्याचं स्वातंत्र्य, प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचं स्वातंत्र्य, आपले स्नेहसंबंध उत्कृष्ठपणे जोपासण्याचे स्वातंत्र्य, आपले आरोग्य ठणठणीत ठेवून उत्साही व प्रफुल्लीतपणे जगण्याचं स्वातंत्र्य, आर्थिकरित्या सोइस्कर व समधानकारकपणे जगण्याचे स्वातंत्र्य व खर्‍याअर्थाने यशस्वी जीवन जगण्याचं स्वातंत्र्य!

मित्रांनो, माझं असं ठाम मत आहे की आपण यशस्वी उद्योजक आहोत असं तेव्हाच म्हणू शकू जेव्हा आपण अर्थपुर्ण व समृध्द जीवन जगु. प्रत्येक उद्योजकाकडे तसं जीवन जगण्याचं स्वातंत्र्य उपलब्ध आहे. परंतु प्रत्येक उद्योजक स्वतंत्रपणे आपले जीवन जगतोच असे नाही. फार थोडे उद्योजक खर्‍या अर्थाने अर्थपुर्ण व समृध्द जीवन जगत असतात. इतर उद्योजकांसाठी ते आदर्श असतात. इतर उद्योजकांना सुध्दा या यशस्वी उद्योजकाप्रणाने जीवन जगायची इच्छा असते. परंतु सर्वांना तसं जीवन जगता येत नाही. या लेखामध्ये आपण जाणुन घेऊया उद्योजकीय स्वातंत्र्य म्हणजे काय?
मित्रांनो, उद्योजकतेबद्दलची एक व्याख्या जी मला प्रचंड आवडते , ती म्हणजे, "उद्योजकता म्हणजे काही वर्ष असं आयुष्य जगणं जे इतरं कोणी जगण्याचं धाडस करत नाहीत, जेणे करुन उर्वरीत आयुष्य अश्याप्रकारे जगणं जे इतर कोणी जगु शकत नाही!" किती खरं आहे यशस्वी उद्योजक स्वतंत्र्यपणे जीवन जगतात, जे इतरांसाठी स्वप्नंवत असतं. जे स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी त्यांनी व्यवसाय सुरु करण्याचा धाडसी निर्णय घेतला, त्या स्वातंत्र्याचा अगदी मनमुरादपणे आस्वाद घेत असतात. बरेच लघुउद्योजक व्यवसाय सुरु करण्याची जोखिम घेतात, परंतु त्यांना 'उद्योजकीय स्वातंत्र्य' मात्र साध्य होत नाही.

मित्रांनो माझ्यामते कोणत्याही उद्योजकाला व्यवसाय उभारणी करताना स्पष्टपणे ठाऊक असले पाहीजे की त्याला नेमकं कोणतं स्वातंत्र्य आपल्या व्यवसायामार्फत अनुभवायचं आहे. आपल्या व्यवसायाची जडण-घडण त्याने अश्या प्रकारे केली पाहीजे जेणे करुन त्याला हवे असलेले स्वातंत्र्य त्याला अनुभवता येईल. प्रत्येक उद्योजकाला आपल्या व्यवसायाच्या माध्यमातुन इच्छित स्वातंत्र्य जरी अपेक्षित असले तरी प्रत्येक उद्योजकाला वेगळं स्वातंत्र्य हवं असतं. माझ्या मते उद्योजकीय स्वातंत्र्य सात प्रकारची असतात. सात उद्योजकीय स्वातंत्र्यापैकी काही महत्त्वाची स्वातंत्र्य उद्योजकाला हवी असतात.

सात उद्योजकीय स्वातंत्र्य :

१) आदर्श व्यक्ती बनण्याचं स्वातंत्र्य:
मित्रांनो प्रत्येक व्यक्तीची काही मुल्यं असतात. प्रत्येकाची इच्छा असते की आपण आपल्या मुल्यांप्रमाणे वागावे. परंतु प्रत्येकाला त्याच्या मुल्यांप्रमाणे जीवन जगता येतचं असे नाही. बर्‍याच वेळा उद्योजकांना नैतिकतेला धाब्यावर बसवून 'धंदा' करावा लागतो. त्यांना ठाऊक असतं की आपलं वागणं व निर्णय आदर्श नाहीत. जे उद्योजक आपल्या मुल्यांशी तडजोड न करता यशस्वी होतात ते इतरांसाठी आदर्श असतात. उदाहरणार्थ: इंम्फोसिस या जगविख्यात भारतीय कंपनीचे संस्थापक श्री. नारायण मुर्ती, सुरुवाती पासुनच आपल्या मुल्यांशी तडजोड करण्यास तयार नव्हते. सचोटी व स्वाभिमान या त्यांच्या वैयक्तिक मुल्यांना अनुसरुनच ते आपले जीवन जगत आहेत म्हणूनच त्यांना हवं असलेलं उद्योजकीय स्वातंत्र्य त्यांना नक्कीच प्राप्त झालं.

२) वेळेचं स्वातंत्र्य:
काही उद्योजकांना 'सकाळी ९ ते संध्याकाळी ६' या चाकोरीबध्द् जीवना पासुन स्वातंत्र्य हवे असते. त्यांना आपल्या व्यवसायापसुन आपला वेळ आपल्याला हव्या त्या पध्द्तीने व्यतीत करायचा असतो. पाहीजे तेव्हा काम, पाहीजे तेव्हा विश्रांती, पाहीजे तेव्हा मजा! उदारणार्थ: 'व्हर्जिन गृप' या आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी कंपनीचे सर्वेसर्वा सर रिचर्ड ब्रॅन्सन, हे स्वातंत्र्य प्रेमी म्हणुन प्रसिध्द आहेत. आज ते १०० पेक्षा जास्त व्यवसायांचे मालक आहेत परंतु आपला वेळ पाहीजे हवा तसा व्यतीत करतात. ९ ते ६ च्या कचाट्यापासुन ते मुक्त आहेत.

३) हवं ते काम करण्याचं स्वातंत्र्य: काही उद्योजकांना एखाद्या गोष्टीचा प्रचंड ध्यास असतो. त्यांना आपलं जीवन एका विशिष्ट कार्यासाठी समर्पित करण्याची इच्छा असते. त्यामुळे ते एखादा विशिष्ट व्यवसाय करण्याचा निर्णय घेतात. जीवन भर आपल्याला ज्या गोष्टीत रस आहे, ज्या गोष्टीत क्षमता आहे व जे केल्याने त्यांना प्रचंड समाधान मिळतं अशी गोष्टचं सातत्यानं केल्याने त्यांना उद्योजकीय स्वातंत्र्य लाभते. उदाहरणार्थ: तंत्रज्ञान क्षेत्रात नाविन्यपुर्ण नवनिर्मिती हा एकमेव ध्यास असलेले 'अ‍ॅपल' चे जनक स्टीव्ह जॉब्स् आपल्या शेवटच्या श्वासा पर्यंत अविरतपणे आपला ध्यास असलेले कार्य करत होते. माझ्यामते 'उद्योजकीय स्वातंत्र्य' त्यांनी खर्‍या अर्थाने अनुभवले.

४) आर्थिक स्वातंत्र्य: कित्येक उद्योजक आपला व्यवसाय स्थापन करतात कारण त्यांना प्रचंड पैसा कमवायचा असतो. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीवर जर आपण एक दृष्टीक्षेप टाकला तर आपल्याला आढळून येईल की ही सर्व माणसे उद्योजक आहेत. आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त झालेल्या उद्योजकांकडे प्रचंड पैसा असतो. आर्थिक स्वातंत्र्य प्रात्प झालेली ही उद्योजकमंडळी एक सुखकर जीवन जगत असतात. जगातील सर्व भैतिक सुख त्यांना सहज परवडणारे असते. उदाहरणार्थ: 'रिलायन्स ग्रुपचे' जनक श्री. धीरुभाई अंबानी हे सुरुवातीपासुनच प्रचंड संपत्ती निर्माण करण्याचे स्वप्न पहायचे. आर्थिक स्वातंत्र्य त्यांच्यासाठी फार महत्त्वाचे होते ते त्यांनी मिळवले. धीरुभाईंनी आपलं आणि इतरांचं जीवनही समृध्द केलं.

५) सामाजिक कार्याचं स्वातंत्र्य: बर्‍याच उद्योजकांना आपल्या समाजासाठी, राष्ट्रासाठी किंवा जगासाठी काहीतरी योगदान देण्याची प्रचंड इच्छा असते त्यामुळे ते उद्योजक होऊन आपल्या व्यवसायामार्फत सामाजिक गरजांना पुर्ण करण्याचे ठरवतात. काही उद्योजक आपल्या उत्पादन व सेवांव्दारे समाजाची गरज भागवतात, काही उद्योजक जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करुन सामाजिक गरज भागवतात, काही उद्योजक आपल्या व्यवसायातील नफा सामाजिक कार्यासाठी अर्पण करतात, काही उद्योजक राष्ट्राच्या प्रगतिला हातभार लावण्यासाठी धडपडत असतात, काही उद्योजक जगाच्या विकासासाठी अथकपणे कार्यरत असतात. आपण केलेल्या योगदानाव्दारे त्यांना उद्योजकीय स्वातंत्र्य प्राप्त होते. उदाहरणार्थ: मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष बिल गेटस्, आज त्यांनी निर्माण केलेल्या संपत्तीव्दारे जगातील अडचणी दुरकरण्यासाठी कार्यरत आहेत. बी. व्ही. जी ग्रुपचे संस्थापक श्री. हणमंतराव गायकवाड भारताच्या विकासाला हातभार लावण्यासाठी व जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास उत्साहाने कृती करत आहेत. श्री. रामदेव बाबा यांनी पतंजली संस्थेव्दारे लोकांच्या उपयोगी, नाविन्यपुर्ण स्वदेशी उत्पादने स्वस्त दरात उपलब्ध करुन देण्यासाठी स्वतःला झोकून दिले आहे.

६) मानवी स्नेहसंबंधांचं स्वातंत्र्य: काही उद्योजक आपल्या महत्त्वाच्या नाते संबंधांच्या हीतासाठी व्यवसायात येतात. आपल्या कुटुंबियांच्या सर्व गरजा व इच्छा पुर्ण करण्यासाठी त्यांना व्यवसाय करणे योग्य वाटते. नोकरी करुन आपल्या स्नेहसंबंधांसाठी विशेष काही आपण करु शकणार नाही असं त्यांना जाणवतं आणि म्हणूनच ते उद्योजक बनण्याचा निर्णय घेतात. बरेच यशस्वी व्यवसाय हे 'फॅमिली मॅनेज्ड् व्यवसाय' असतात. पिढ्यान पिढ्या हे व्यवसाय सुरु असतात. उदाहरणार्थ: भारतातील फिटनेस इंडस्ट्रीजचे जनक श्री. मधुकर तळवलकर सर यांनी स्वतःच्या व्यायामशाळा सुरु करुन आपला ध्यास असलेल्या क्षेत्रात व्यवसाय सुरु केला परंतु त्यामागे आणखी एक महत्त्वाचा उद्देश आपल्या कुटुबियांना उज्ज्वल भविष्य देणे हा सुध्दा होता. आज तळवलकर सरांची चौथी पिढी त्यांच्या व्यवसायाला पुढे घेऊन जाण्यासाठी कार्यरत आहे. माझ्या मते मधुकर तळवलकर सर अर्थपुर्ण आणि समृध्द जीवन जगण्याचे एक आदर्श उदाहरण आहेत.

७) यशस्वी होण्याचं स्वातंत्र्य: बर्‍याच उद्योजकांची स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची आंतरिक इच्छा असते. ही ओळख आपल्या व्यवसायाव्दारे होईल अशी आशा बाळगुन ते व्यवसाय सुरु करतात. व्यवसाय यशस्वी करुन आपण जगात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करावं असं त्यांना वाटत असतं. उदाहरणार्थ: श्री. दिपक सखाराम कुलकर्णी यांनी 'डी. एस. के.' अशी स्वतःची एक यशस्वी ओळख निर्माण केली. डी. एस. के. आज एक यशस्वी उद्योग समुह म्हणुन ओळखला जातो. निरनिराळ्या उद्योग क्षेत्रांमध्ये डी. एस. के. यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आज डी. एस. के. उद्योजकीय स्वातंत्र्य अनुभवत आहेत.

मित्रांनो वरिल सात स्वातंत्र्यामधील सर्वच स्वातंत्र्य प्रत्येक उद्योजकाला हवी असतात असं मुळीचं नव्हे. या स्वातंत्र्यामधील काही स्वातंत्र्य आपल्याला महत्त्वाची वाटत असतील. मुद्दा हा आहे की आपण आपल्या व्यवसायाची जडणघडण अश्याप्रकारे केली पाहीजे की आपल्या व्यवसायामार्फत आपल्याला ही स्वातंत्र्य प्राप्त होईल. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातुन आपण अर्थपुर्ण व समृध्द जीवन जगु शकू.
उद्योजक मित्रांनो, आपल्याला नेमंक कोणतं स्वातंत्र्य हवं आहे हे ओळखा. आपल्या व्यवसायाची उभारणी त्या नुसार करा. अर्थपुर्ण व समृध्द जीवन जगण्याच्या दिशेने पाऊल उचला. लक्षात ठेवा, 'उद्योजकता' म्हणजे 'काही वर्ष असं आयुष्य जगणं हे इतर कोणी जगण्याचं धाडस करत नाहीत, जेणे करुन उर्वरित आयुष्य अश्याप्रकारे जगणं जे इतर कोणी जगु शकत नाही!' आशा करतो की आपण आपल्या उद्योजकीय प्रवासादरम्यान 'उद्योजकीय स्वातंत्र्य' अनुभवाल. शुभेच्छा!

'उद्योजकीय स्वातंत्र्य' अनुभवण्यासाठी पहीले पाउल उचला.
7666426654 या क्रमांकावर संपर्क करा किंवा 'FREEDOM' असे Whatsapp करा किंवा नाव नोंदवण्यासाठी खालील फॉर्म भरा. बॉर्न टु विनचे Growth Consultant आपल्याला संपर्क करतील. आजच मोफत one to one भेट घ्या. स्वतःमधील उद्योजकाला जागे करा!


Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites