फ्युचर पाठशाला जोश २०१२ ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

21 May 2012

फ्युचर पाठशाला जोश २०१२

नमस्कार!
मित्रांनो, आपल्या कळवण्यास बॉर्न टू विनची संपूर्ण टिम अत्यानंदीत होत आहे की आम्ही आमच्या टिमचं स्वप्नं येत्या २७ मे रोजी साकार करत आहोत. हो मित्रांनो, २७ मे २०१२ रोजी फ्युचर पाठशाला जोश २०१२ कार्यक्रम अतिशय धुमधडाक्यात आम्ही साजरा करणार आहोत. हा कार्यक्रम भारतातील सर्वात मोठं सभागृह ते म्हणजे षणमुखानंद सभागृह, सायन येथे पार पाडणार आहे व या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण असणार आहे फ्युचर पाठशालाच्या आमच्या फ्युचर स्टार्सचे उत्साहवर्धक व अर्थपुर्ण असे परफॉर्मन्सेस! आता पर्यंत पार पडलेल्या फ्युचर पाठशालाच्या प्रत्येक जोश कार्यक्रमामध्ये फ्युचर स्टार्सचे अद्वितीय परफॉर्मन्स इतके भन्नाट पध्दतीने सादर केले आहेत की उपस्थित प्रेक्षक अक्षरशः थक्क होतात. फ्युचर पाठशाला जोश २०१२ हा आतापर्यंतचा सर्वात जबरदस्त आणि धमाकेदार पध्दतीने साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला आपण कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहीलंच पाहीजे!

मित्रांनो, या वर्षी बॉर्न टू विन तर्फे फ्युचर पाठशाला कार्यक्रम मुंबईभरात निरनिराळ्या ठीकाणी राबवण्यात आले. फ्युचर पाठशालाच्या उत्साही प्रशिक्षकांनी, रिव्हुवर्सनी व सह-प्रशिक्षकांनी आपली कामगिरी चोखपणे बजावत फ्युचर पाठशालाच्या विविध केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक परिवर्तन घडवून आणले. या वर्षी जवळजवळ ३०० नवीन फ्युचर स्टार्स फ्युचर पाठशालाने घडवले. मुंबईभरात समाधानकारक पध्दतीने या वर्षी फ्युचर पाठशालाचे सर्व वर्ग पार पाडले. आमचे फ्युचर स्टार्स आत्मविश्वासाने पेटून उठले आहेत, त्यांना त्यांच्या सुप्त शक्तींची आता जाणिव झाली आहे, त्यांची ध्येय आता ठरली आहेत आणि भविष्यात उत्तुंग यश मिळवण्यासाठी आता ते सज्ज झाले आहेत. जर आपल्याला त्यांचा जोश प्रत्यक्षात पहायचा आणि अनुभवायचा असेल तर २७ मे २०१२ रोजी सकाळी १० वाजता षणमुखानंद सभागृहामध्ये नक्की या!
यंदाचा जोश २०१२ कार्यक्रम भव्यदिव्य तर असणारच आहे परंतु त्याच बरोबर आणखी एक विशेष गोष्ट या कार्यक्रमामध्ये होणार आहे, ती म्हणजे बॉर्न टू विनचे संचालक अतुल राजोळी यांचे पहिले पुस्तक 'माझा मोटिव्हेटर मित्र' चे प्रकाशन. हो मित्रांनो! आपण ज्या पुस्तकाची आतुरतेने वाट पाहत होतात, ते आता लवकरच आपल्या भेटीला येत आहे! नावा प्रमाणेच हे पुस्तक प्रेरणादायी असणार आहे व यशप्राप्तीचे ५० मैत्रीपूर्ण कानमंत्र देणार आहे. अशा या आगळ्यावेगळ्या पुस्तकाचे प्रकाशन प्रत्यक्षात पाहण्याची सुवर्ण संधी आपल्या समोर आहे!

फ्युचर पाठशाला जोश २०१२ चे वारे सध्या सगळी कडे वाहत आहेत. झी २४ तास वाहिनी या कार्यक्रमाचे मिडीया पार्टनर असणार आहे! बॉर्न टू विनचे सर्व आजी-माजी प्रशिक्षणार्थी या कार्यक्रमाची आधीपासुनच वाट पाहत आहेत, गेल्या चार वर्षाचे फ्युचर पाठशालाचे विद्यार्थी आमचे फ्युचर स्टार्स या कार्यक्रमाची आस लावून बसले आहेत. मित्रांनो, आता फक्त काही दिवस उरले आहेत.


मित्रांनो, बॉर्न टू विनच्या या स्वप्नपूर्ती सोहळ्याला असाल अशी नम्र विनंती!

- टिम बॉर्न टू विनNo comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites