सांगता सोहळा फ्युचर पाठशाला जोश २०१३ ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

02 June 2013

सांगता सोहळा फ्युचर पाठशाला जोश २०१३

नमस्कार!
मित्रांनो संपूर्ण बॉर्न टू विन च्या टीमला आपणांस  कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि, या वर्षीचा फ्युचर पाठशाला जोश २०१३ भारतातील सर्वात मोठ्या सभागृहात, म्हणजेच षण्मुखानंद, सायन येथे २६ मे २०१३ ला सकाळी १० ते २ च्या दरम्यान दणक्यात पार पडला. या वर्षी आपण दुसऱ्यांदा फ्युचर पाठशाला जोश हा कार्यक्रम षण्मुखानंद येथे साजरा केला. गेल्या वर्षी म्हणजेच २७ मे  २०१२ ला पहिल्यांदा इथेच आपला स्वप्नपूर्ती सोहळा पार पडला होता. या वर्षी मुंबई व मुंबई बाहेर २० वेग- वेगळ्या ठिकाणी फ्युचर पाठशाला चे वर्ग पार पडले व ५४० पेक्षा जास्त फ्युचर स्टार्स घडविले. फ्युचर पाठशालाच्या उत्साही प्रशिक्षकांनी, रिव्हुवर्सनी व सह-प्रशिक्षकांनी आपली कामगिरी चोखपणे बजावत फ्युचर पाठशालाच्या विविध केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले. हे सगळे फ्युचर स्टार्स उत्साहाने व आत्मविश्वासाने पेटून उठले होते. आणि त्यांनी त्यांचा हाच आत्मविश्वास व जोश तिथे सादर केला.


कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण म्हणजे; बॉर्न टू विनचे संचालक श्री अतुल राजोळी यांचे सुपर हिट व गेले एक वर्ष सातत्याने बेस्ट सेलर च्या यादीत असणारे पुस्तक 'माझा मोटिव्हेटर मित्र' याच्या तिसऱ्या आवृत्तीच  प्रकाशन व पहिल्याच आवृत्तीपासून याच पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीची जोरदार मागणी होती, म्हणूनच लोकाग्रहास्तव याच्याच इंग्रजीच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकशन केले. मराठी वाचक वर्गाचे मन जिंकणारे हे पुस्तक आता इतर भाषिकांची मने जिंकण्यास सज्ज झाले आहे. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते माननीय श्री मधुकरजी तळवलकर सर (Executive Chairman, Talwalkars Better Value Fitness Ltd.). ज्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. उपस्थितांना सरानकडून  खूपच छान मार्गदर्शन मिळाले. सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील आपल्या सर्व फ्युचर स्टार्सनी उत्साहवर्धक व अर्थपूर्ण परफॉर्मन्सेस सादर केले. कार्यक्रमास जवळ-जवळ तीन हजार मंडळी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे मिडीया पार्टनर होते झी २४ तास. 
कार्यक्रमास फ्युचर पाठशाला चे आजी-माजी विद्यार्थी तसेच त्यांचे पालकहि उपस्थित होते. तसेच लक्ष्यवेध, लक्ष्यवेध Advance, NLP, Graphology च्या प्रशिक्षणार्थ्यांनी देखील हजेरी लावली व सगळ्या फ्युचर स्टार्सच्या उत्साहात ते हि भारावून गेले.

कार्यक्रमास आलेला प्रत्येक व्यक्ती स्वतः बरोबर एक उर्जा व उत्साह तसेच जगण्याची एक नवी दिशा घेऊन गेला. 
या कार्यक्रमाची काही क्षण चित्रे

खास तुमच्यासाठी झी २४ तास ने घेतलेला फ्युचर पाठशाला जोश २०१३ चा आढावा. 

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites