सोळावा लक्ष्यसिध्दी सोहळा: 'रुरल मार्केटिंगची, गोष्ट कोटींची' ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

01 August 2013

सोळावा लक्ष्यसिध्दी सोहळा: 'रुरल मार्केटिंगची, गोष्ट कोटींची'

नमस्कार!
मित्रांनो बॉर्न टू विन च्या परिवारास, आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की आपल्या सर्वांच्या शुभेच्छांनी हे वर्ष अगदी दणक्यात सुरु झालं. खूप आनंदाचे क्षण आपण सर्वांनी मिळून या वर्षी अनुभवले. वर्षाच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत तुमच्या समवेत हा आनंद आपण साजरा करीत आहोत
या वर्षी प्रथमच १४ वा आणि १५ वा लक्ष्यसिद्धी सोहळा यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, माटुंगा (प.) येथे पार पडला. आपल्या त्रैमासिकाच्या दोन आवृत्त्या प्रकाशित झाल्या. १९ मे २०१३ रोजी लक्ष्यवेध Advance ची वी बॅच दणक्यात सुरु झाली. तसेच २६  मे २०१३ रोजी  आपल्या सर्वांचा लाडका विषय म्हणजेचफ्युचर पाठशाला जोश २०१३’ हा कार्यक्रम षण्मुखानंद या सभागृहात २७०० मंडळींच्या उपस्थितीत धूम-धडाक्यात पार पडला. त्याच दिवशी माझा मोटिव्हेटर मित्र या पुस्तकाची तिसरी आवृत्ती याच पुस्तकाची इंग्रजीची पहिली आवृती, My Motivator Mitra याचे प्रकाशन श्री मधुकर तळवळकर सर (Executive Chairman, Talwalkars Better Value Fitness Ltd.). यांच्या हस्ते झाले. १४ जून २०१३ रोजी लक्ष्यवेध Advance च्या तिसऱ्या  बॅचचा पदवीदान सोहळा श्री. वाय. एम. देवस्थळी, चेअरमन, L & T. यांच्या उपस्थितीत पार पडला
आपणा  सर्वांच्या आग्रहास्तव आपण दुसर्‍यांदा वीर सावरकर सभागृह येथे  जुलै २०१३ रोजी ‘सुसज्ज व्हा, यशस्वी व्हा’ ही कार्यशाळा घेतली. आपल्या  हाउसफुल प्रतिसादात ती यशस्वीपणे पार पडली. आणि सर्वात जास्त आनंदाची गोष्ट जी बॉर्न टू विन च्या परिवारात झाली  ती म्हणजे २८ जुलै २०१३ रोजी आपण आपल्या नवीन ऑफीस मध्ये आलो
तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाने शुभेच्छामुळेच हे सगळ शक्य होऊ शकलं. यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून खूप-खूप धन्यवाद
सध्या लक्ष्यवेधची १६ वी  बॅच शेवटच्या टप्प्यात आहे ११ ऑगस्ट २०१३ ला यशस्वीपणे पूर्ण होत आहे. या बॅच्या प्रशिक्षणार्थ्यांची  कामगिरी जबरदस्त सुरु आहे. आता सर्वांना ओढ लागलीय ती १६ व्या लक्ष्यसिद्धी सोहळ्याची. मित्रांनो आपला आगामी लक्ष्यसिद्धी सोहळा पार पडणार आहे १३ ऑगस्ट २०१३ रोजी, प्रा. बी. एन. वैद्य सभागृह, दादर (पू.) येथे संध्याकाळी वाजता
मित्रांनो नेहमीप्रमाणेच  या लक्ष्यसिद्धी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असणार आहेत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक! लक्ष्यसिद्धी सोहळ्याच्या प्रवासातला मैलाचा दगड म्हणजे या वेळी आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे! ते म्हणजे श्री. प्रदीप लोखंडे, Founder, Rural Relations. 
'रुरल मार्केटिंगची, गोष्ट कोटींची' या विषयावर सरांची खास मुलाखत  बॉर्न टू विन चे संचालक संस्थापक श्री. अतुल राजोळी हे घेणार आहेत. १५ वर्षांपूर्वी सुरु केलेल्या त्यांच्या ग्रामीण भारतासाठीच्या कार्याचा आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करण्यापर्यंतचा प्रवास ते या मुलाखतीतून उलगडणार आहेत.   

श्री. प्रदीप लोखंडे सर त्यांच्या कार्याविषयी थोडेसे:
श्री. प्रदीप लोखंडे सर हे रुरल रिलेशन या संस्थेचे संस्थापक आहेत. ग्रामीण भारताच्या प्रगतीसाठी योगदान करणे या ध्यासाने १५ वर्षांपूर्वी सरांनी सुरुवात केली. आज भारतामध्ये १० पैकी माणसे हि गावामध्ये वसलेली आहेत. आत्तापर्यंत संपूर्ण भारतातील ५०००० खेड्यांचा त्यांनी अभ्यास केला आहे. ४००० गावांना त्यांनी स्वतः भेट दिली आहे. तसेच तेथील कार्यपद्धत त्यांनी समजून घेतली आणि अमुल्य असं योगदान  त्यांनी खेड्यांना दिलं
रुरल रिलेशन हि संस्था भारतातील सर्वात मोठी संस्था आहे. हि संस्था राज्यांमध्ये विस्तारलेली आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये रुरल रिलेशन या संस्थेच अस्तित्व आहे. रिलायंस मनी, एच. एल. एल., टेल्को, टाटा  टी., एच. पी., एशियन पेंट अशा मोठ-मोठ्या कंपन्या आता व्हिलेज डेवेलोपर्स या उपक्रमांच्या माध्यमातून रुरल रिलेशनचे संस्थापकीय भागीदार बनले आहेत. Social  Entrepreneurship, Rural Marketing, Future of  Rural India या विषयांवर सरांकडून आपल्याला अमुल्य असं मार्गदर्शन मिळणार आहे.

अशा या स्फुर्तीदायक कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित रहा

सोळावा लक्ष्यसिध्दी सोहळा
विषय: 'रुरल मार्केटिंगचीगोष्ट कोटींची' 
दिनांक: १३ ऑगस्ट २०१३
वेळः संध्याकाळी ठिक वाजता
स्थळः प्राबी. एन. वैद्य सभागृह, किंग जॉर्ज शाळेसमोर,  दादर (पू.)
प्रवेश विनामुल्य
संपर्कः ०२२-२२९३९३७५///७६६६४२६६५४९६१९४६५६८९


No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites