फ्युचर पाठशाला जोश २०१४ ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

15 May 2014

फ्युचर पाठशाला जोश २०१४

नमस्कार!
मित्रांनो, दरवर्षी प्रमाणे उन्हाळी सुट्टीमध्ये बॉर्न टू विन तर्फे राबविण्यात येणारा 'फ्युचर पाठशाला' हा विद्यार्थी विकास प्रशिक्षणक्रम एप्रिल पासून मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठीकाणी विद्यार्थी व पालकांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात दणदणीतरित्या पार पडत आहे. यंदा मुंबईमध्ये आठ वेगवेगळ्या ठीकाणी फ्युचर पाठशालाच्या कार्यशाळा राबविण्यात आल्या आहेत. व प्रत्येक ठीकाणी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद हा थक्क करणारा आहे.

फ्युचर पाठशाला कार्यशाळेचा समारोप समारंभ म्हणजेच आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम 'फ्युचर पाठशाला जोश २०१४', दिनांक २५ मे २०१४ या दिवशी, यशवंत नाट्यमंदीर, माटुंगा रोड (प.) येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची वाट आपण वर्षभर पाहत असतो. अदभूत अशी अनुभुती देणार्‍या या फ्युचर पाठशालाचे २५० पेक्षा जास्त फ्युचर स्टार्स जगण्याची दिशा देणारे निरनिराळे परफॉर्मन्स आत्मविश्वासाने सादर करणार आहेत. असा हा अदभूत फ्युचर पाठशालाचा जोश अनुभवण्याची सुवर्ण संधी आपल्याला या कार्यक्रमामध्ये मिळणार आहे.



फ्युचर पाठशाला जोश २०१४ चे वारे सध्या सगळीकडेच वाहत आहेत. आपल्या या आवडत्या कार्यक्रमाचे मिडीया पार्टनर असणार आहेत झी २४ तास वाहिनी. बॉर्न टू विनचे सर्व आजी-माजी प्रशिक्षणार्थी या कार्यक्रमाची आधीपासुनच वाट पाहत आहेत. मित्रांनो, आता फक्त काही दिवस उरले आहेत आपल्या या आवडत्या कार्यक्रमासाठी. बॉर्न टू विनच्या संपुर्ण परिवारासाठी हा कार्यक्रम एक विशेष अनुभव असणार आहे.




मित्रांनो, बॉर्न टू विनच्या या आगळ्या-वेगळ्या सोहळ्याला उपस्थित असाल अशी नम्र विनंती!

धन्यवाद

- टिम बॉर्न टू विन


फ्युचर पाठशाला जोश २०१४

दिनांक: रविवार, २५ मे २०१४

वेळ: सकाळी ठिक १०:०० वाजता

स्थळः यशवंत नाट्यमंदीर, स्टार सिटी सिनेमा जवळ, माटुंगा रोड (प.)

प्रवेश विनामुल्य

संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९


फ्युचर पाठशाला जोश २०१३ ची काही क्षणचित्रे:










No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites