उद्योजक होण्यास सध्याचा काळ अनुकूल. ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

17 February 2017

उद्योजक होण्यास सध्याचा काळ अनुकूल.

स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा बहुतेक सगळ्यांची असते. हल्ली तर स्टार्टअपसाठी पोषक दिवस आहेत. सरकारची गुंतवणुकूसाठी, योजना आणि सवलतींसाठी उत्सुक आहे. पण स्वतःचा व्यवसाय सुरु करताना काही गोष्टींचे भान असणे गरजेचे आहे. तसेच काही कौशल्यांबद्दल जागरुकता असणे गरजेचे आहे.



१. कल्पकता/ सर्जनशिलता : कुठल्याही व्यवसायासाठी कल्पकता आवश्यक असते. वस्तू बनवण्यापासून ती विकण्यापर्यंत सगळ्या टप्प्यात कल्पकता उपयोगी पडू शकते. इतरांचे कॉपी करण्यापेक्षा स्वतःचा असा वेगळा ठसा कसा उमटवता येईल याचा विचार करा. तो जास्त यशस्वी होऊ शकतो.


२. वेळेचे भान : वेळेचे गणित अचूक असणे आवश्यक आहे. दिलेला शब्द, वेळ पाळणे आवश्यक आहे. कुठलाही व्यवसाय करत असताना वेळेचे नियोजन अचूक असेल तर निम्म्यहून अधिक अडचणी दूर होतात.


३. सुसंवाद : व्यवसायात ग्राहक, कच्चा माल विक्रेता, इतर व्यावसायिक यांच्याशी सुसंवाद असणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे समस्या सोडवण्यासाठीचे उपाय सहज सापडू शकतात. आपण नवीन काम सुरु केलेले असताना सुसंवाद असेल तर बाजाराची अनेक गुपिते, कळीचे मुद्दे आपोआप समजतात. त्यासाठी वेगळे कष्ट घेण्याची गरज नसते.


४. सकारात्मक दृष्टीकोन : समस्येतून बाहेर पडण्यासाठी गरजेचे कौशल्य आहे. व्यवसाय म्हटलं की चढ आणि उतार आलाच . कधी नफा, तर कधी तोटा त्यामुळे दृष्टीकोन सकारात्मक असेल तर तोट्याच्या वेळीही त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न होतात.

५. नियोजन / आयोजन : या कौशल्यांशिवाय व्यवसायात यशस्वी होता येऊ शकत नाही. कामाचे नियोजन नसेत तर व्यवसायाला शिस्त येत नाही. त्यातून गलथान कारभार सुरु होतो ज्यामुळे व्यवसाय बुडीत निघण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

६. विश्लेषण : आपल्या यशापयशाचे, आपण बनवलेल्या वस्तूंचे विश्लेषण करता आलेच पाहिजे. ते जमले की पाय आपोआप जमिनीवर राहतात.
७. गृहपाठ हवाच : एखादा विषय शोधणं त्याची माहिती गोळा करणं. समस्या सोडवता येणं. आजूबाजूला होणार्‍या बदलांवर नजर असणं. ते बद्द्ल स्वीकारण्याची तयारी असणं. सतत नवीन काही तरी शिकवण्याची उत्सुकता असणं. पुर्वतयारी आणि गृहपाठ करण्याची तयारी असणं. आपल्या कल्पना प्रभावीपणे मांडता येणं. आपल्याजवळ असणारी कौशल्ये आपल्याबरोबर इतरही लोकांनी आत्मसाद करावीत यासाठी प्रयत्नशिल असणं. या तुमच्याजवळ असतील तर उत्तमच पण नसतील तर ती तुम्ही विकसित करु शकता.

सौजन्य: संध्यानंद

बिझनेस सुरु करण्याआधी किंवा सुरु केल्यानंतर येणार्‍या अडचणींवर मात करण्यासाठी व्यवसाय विकास क्षेत्रातील अग्रगण्य संस्था बॉर्न टू विन घेऊन येत आहे "मोफत काउंसिलींग"

फ्री काउंसिलिंगसाठी खालील फॉर्म भरा किंवा संपर्क करा: 7666426654

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites