आधुनिक युगाचा विश्वकर्मा - श्री. नितीन चंद्रकांत देसाई. ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

25 May 2018

आधुनिक युगाचा विश्वकर्मा - श्री. नितीन चंद्रकांत देसाई.


नमस्कार. मित्रांनो तुम्ही कधी मयसभा पहिली आहे का? 
आपल्या पुराणांमध्ये याचा उल्लेख प्रामुख्याने आढळतो. मयसभा म्हणजे अतिभव्य अशा दिव्यत्वाचा साक्षात्कार. आपणही आजच्या युगात अशा अनेक मयसभांचा अनुभव चित्रपट सृष्टीच्या माध्यमातुन घेत असतो. या चित्रपटांमधील नेपथ्य आपल्याला त्या त्या जगाची सफर घडवून आणतात. ही 70mm ची अनुभूती देणाऱ्या किमयागारांमध्ये ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते ते म्हणजे श्री. नितीन चंद्रकांत देसाई. 

नितीनजींचे चे नाव घेतल्यावर आपल्यासमोर उभ्या राहतात त्या Larger than life आणि Finest of its time असणाऱ्या कलाकृती देवदास, लगान, जोधा अकबर, हरिश्चंद्राची फॅक्टरी, हम दिल दे चुके सनम, बादशाह, राजू चाचा, प्रेमरतन धन पायो, फॅशन, मंगल पांडे, भगत सिंग, मिशन कश्मीर, ट्रॅफिक सिग्नल, वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, अशा अनेक चित्रपट तसेच बिग बॉस, कौन बनेगा करोडपती अशा मालिकांची मांदियाळी.
 नितीनजींचा जन्म एका मध्यम वर्गीय मराठी कुटुंबात झाला, त्यांनी आपले शिक्षण मराठी माध्यमातून पूर्ण केले. आपल्या आवडीचे क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य घरच्यांकडून मिळाल्याने त्यांनी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् आणि एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्टस् मधून फोटोग्राफी चे शिक्षण घेतले. १९८७मध्ये त्यांनी आपल्या चित्रपट सृष्टीतील कारकिर्दीला सुरवात केली. स्थिर चित्रणाच्या 2D फ्रेम पेक्षा कलादिग्दर्शनाची 3D दुनिया त्यांना अधिक भावली. १९९३ मध्ये आलेला "भूकंप" हा त्यांचा पहिला चित्रपट. २००३ साली "देश देवी माँ आशापुरा" या चित्रपटाने त्यांनी निर्मिती क्षेत्रात देखील यशस्वी पदार्पण केले. 

१९९४ साली प्रदर्शित झालेल्या 1942- A Love Story याचित्रपटाने त्यांच्या करिअर ला कलाटणी दिली. त्यानंतर नितीन देसाई म्हणजे उत्कृष्ट- अस्सल कलादिग्दर्शन असे समीकरणच झाले. पुरातन वास्तू, किल्ले, अतिभव्य राजवाडे,जगभरातील कोणतेही शहर, रेल्वे स्टेशन असो नितीनजी ते अगदी हुबेहूब प्रत्यक्षात उतरवतात. त्यांच्या मते प्रेक्षक हा नुसता दर्शक नसून त्याला आपण त्या कलाकृतीचा एक भाग आहोत असा अनुभव देणे महत्वाचे आहे. नितीनजींच्या प्रवासात आणखी एक मैलाचा दगड म्हणजे "राजा शिवछत्रपती" ही मालिका, या कलाकृतीने प्रामुख्याने पडद्यामागे असणाऱ्या नितीनजींचे नाव घराघरात पोहोचवले.

नितीनजींची कारकीर्द १७० राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट, २५० जाहिराती, १०० मालिका, ०४ राष्ट्रीय पुरस्कार, ०३ फिल्मफेअर अवॉर्ड्स ने समृद्ध झाली आहे.


नुकतेच त्यांनी कर्जत येथे त्यांच्या "N.D.Studio" येथे भारतीय चित्रपट सृष्टीला १०० वर्षे पूर्ण झाल्या प्रित्यर्थ "Bollywood World" थिम पार्क ची निर्मिती केली आहे. या थिम पार्कमध्ये आपल्याला चित्रपटसृष्टीचा अतिभव्य अनुभव प्रत्यक्ष घेता येणार आहे. नितीनजींच्या स्वप्नातील कर्जत येथील "N.D.Studio" हा चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा व तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.
सुरवातीच्या काळात जेव्हा नितीनजींनी आपली हि स्टुडिओ ची कल्पना चित्रपट सृष्टीतील दिग्गजांना सांगितली तेंव्हा त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. अनेकांनी त्यांना सांगितले कि हि अशक्यप्राय गोष्ट आहे. परंतु ते आपल्या ध्येयापासून बधले नाहीत. 

२००५ मध्ये त्यांचे हे स्टुडिओचे स्वप्न प्रत्यक्षात आले, आणि Superstar of the Millennium श्री. अमिताभ बच्चन यांच्या हस्ते"N.D.Studio" चे उदघाटन झाले. या सोहळ्यात नितीनजींचे कौतुक करताना श्री. अमिताभजी म्हणाले होते, " नितीन ने दाखवून दिले की, साधारण परिस्थिती मधून येऊनही तुम्ही मोठी स्वप्ने पाहण्याचे धैर्य बाळगा, आणि सर्वस्व झोकून प्रयत्नांनी ती पूर्ण करू शकता." 


नितीनजींचा हा अदभूत प्रवास आपण त्यांच्याकडून प्रत्यक्षात अनुभवू शकतो. दि. ३० मे २०१८ रोजी लक्ष्यवेध इन्स्टिटयूटच्या ३५ व्या लक्ष्यसिद्धी सोहळ्यात.

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites