LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

25 March 2010

लक्ष्यसिध्दी सोहळा व स्नेहमेळावा - प्रमुख पाहूणे श्री. नितीन पोतदार सर

लक्ष्यसिध्दी सोहळा व स्नेहमेळावा

नमस्कार!


मित्रहो, लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमादरम्यान आपण आपले दुरगामी लक्ष्य ठरविलेत व आपल्या दुरगामी लक्ष्याला अनुसरुन एक आव्हानात्मक लक्ष्य साध्य करण्यासाठी उत्तुंग झेप घेतली. लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमादरम्यान आपल्या वैयक्तिक व प्रोफेशनल जीवनात आपण एक सकारात्मक परिवर्तन अनुभवलेत. आपला आत्मविश्वास द्विगुणित झाला असुन आपण भविष्याकडे एका नवीन उमेदीने पाहत आहोत. आपल्या दुरगामी ध्येयाच्या दिशेने आपला प्रवास हा खरोखच आव्हानात्मक असणार आहे. या प्रवासादरम्यान मानसिकरीत्या सबळ रहाण्यासाठी बॉर्न टू विनची साथ नेहमीच आपल्या बरोबर असेल. आपल्या विचारांना चालना देण्यासाठी व कृतीलाप्रेरणा देण्यासाठी लक्ष्यवेधचा आगामी लक्ष्यसिध्दी सोहळा व स्नेहमेळाव्याचा कार्यक्रम नक्कीच लाभदायक ठरेल. हा कार्यक्रम म्हणजे लक्ष्यवेधच्या तुमच्या सह-प्रशिक्षणार्थींना भेटण्याचे एक उत्तम निमित्त असेल व या कार्यक्रमात तुम्ही पुन्हा एकदा लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमादरम्यान अनुभवलेले मोलाचे असे स्फुर्तीदायक क्षण अनुभवाल. विशेष म्हणजे आपल्याला लाभेल व्यावसायिक क्षेत्रातील एका दिग्गज व्यक्तिमत्वाचे महत्त्वपुर्ण असे मार्गदर्शन.

हो मित्रांनो! लक्ष्यवेध स्नेहमेळाव्यामध्ये सुप्रसिध्द कॉर्पोरेट लॉयर श्री. नितीन पोतदार सर आपल्या सर्वांना '... तरच मराठी उद्योजकाची पाउलं पडतील पुढे!' या त्यांच्या व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन करणार आहेत.


श्री. नितीन पोतदार यांच्याबद्दल थोडेसे:


श्री. नितीन पोतदार सर हे व्यवसायाने कॉर्पोरेट लॉयर आहेत. जे सागर असोशिएटस् या भारतातील दुसर्‍या क्रमांकाच्या लॉ फर्म मध्ये ते सिनियर पार्टनर म्हणून कार्यरत आहेत. भारतामध्ये येणार्‍या परकीय गुंतवणुकीचे तज्ञ म्हणून त्यांची देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती आहे. सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील विलीनीकरण व परदेशी कंपन्यांबरोबरचे सहकार्याचे करार करण्याच्या कामात त्यांनी मोठे नाव मिळविले आहे. दक्षिण एशिया पॅसिफिक लिगल ५०० या आंतरराष्ट्रीय स्तरावर कॉर्पोरेट लॉयर्सच्या यादीमध्ये श्री. नितीन पोतदार यांना भारताचे परकीय गुंतवणुक तज्ञ म्हंटले जाते.

श्री. नितीन पोतदार उद्दोग, व्यवसाय व करिअर संदर्भातच लिखाण करत असतात. त्यांचे विचार तुम्हाला त्यांच्या ब्लॉगवर वाचता येतीलः http://www.nitinpotdar.blogspot.com/

श्री. नितीन पोतदार यांच्याबद्दल आणखी जाणुन घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा: http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/msid-3017021,prtpage-1.cms

लक्ष्यसिध्दी सोहळा व स्नेहमेळावा

दिनांक: ४ एप्रिल २०१०
वेळः सायंकाळी ठीक ६:०० वाजता
स्थळः कर्नाटक संघ हॉल, वेस्टर्न माटूंगा स्टेशनच्या जवळ, माटूंगा (प.)
प्रवेश विनामुल्य
कार्यक्रमाचे पास हवे असल्यास कृपया संपर्क साधा: राजेंद्र 9967309018, 022939377/78.

05 March 2010

SPIN SELLING SEMINAR

नमस्कार! 
१९ फेब्रुवारी २०१० हा दिवस बॉर्न टू विनच्या संपुर्ण टिमला नक्कीच लक्षात राहील. बॉर्न टू विन संस्था आपल्या दुसर्‍या वर्षात पदार्पण करीत असतानाचे निमित्त साधून एका नवीन उपक्रमाची सुरुवात आम्ही केली. 'बॉर्न टू विन प्रोफेशनल कौशल्य सेमिनार'. या उपक्रमामार्फत प्रोफेशनल व्यक्तींना आवश्यक कौशल्यांवर आधारीत परिणामकारक असे कार्यक्रम घेऊन येण्याचा आमचा मानस आहे.


१९ फेब्रुवारी २०१० रोजी याच उपक्रमातील पहीला कार्यक्रम SPIN SELLING SEMINAR अतिशय दणदणीतरित्या पार पडला. मागिल पोस्टमध्ये नमुद केल्या प्रमाणे रविंद्रनाट्य मंदिरच्या मिनी थिएटरमध्ये हा कार्यक्रम झाला आणि कार्यक्रम हाऊसफुल्ल झाला. (बर्‍याच जणांना हॉल बाहेरुनच नाईलाजाने परत पाठवावे लागले. त्याला दुसरा काहीच मार्ग नव्हता. तरी क्षमस्व.) २०० मराठी प्रोफेशनल माणसांनी SPIN SELLING SEMINAR हा बॉर्न टू विनच्या प्रोफेशनल कौशल्य सेमिनार उपक्रमातील पहीलाच कार्यक्रम अटेंड केला व भरभरुन दाद दिली. आमच्यावर विश्वास दाखविल्याबद्दल व उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याबद्दल आम्ही सर्व उपस्थितांचे मनापासुन आभारी आहोत. भविष्यात देखिल बॉर्न टू विनच्या प्रोफेशनल कौशल्य सेमिनार उपक्रमातील इतर कार्यक्रमांना आपण असाच उदंड प्रतिसाद द्याल याबद्दल काहीच शंका नाही. Thank You Very Much.





याच कार्यक्रमाचे निमित्त साधून 'स्वतः मधील उद्योजकाला जागे करा' या व्हिडीओ डीव्हीडीचे उदघाटन करण्यात आले.


या व्हिडीओ डीव्हीडीची माहीती खालिल प्रमाणे आहे.



या डीव्हीडीत आपल्याला खालिल प्रश्नांची उत्तरे मिळतीलः



  • का बहूतांश व्यवसाय यशस्वी होत नाहीत व त्या बाबतीत काय केले पाहीजे?
  • यशस्वी उद्योजक काय असे जाणतो जे अयशस्वी उद्योजकाला माहीत नसते?
  • सर्वसामान्य उद्योजक असामान्य यश कसे मिळवू शकतो?
  • प्रत्येक यशस्वी उद्योजकाकडे कोणते स्वातंत्र्य असणे गरजेचे आहे?
  • व्यावसयिक दृष्टीकोन म्हणजे काय?
  • सर्वसाधारण उद्योजकाची सर्वात मोठी गैरसमजुत कोणती असते?
  • उत्कृष्ट व्यवसाय उभारण्यासाठी व्यवसायाला कोणत्या टप्प्यांमधुन जावे लागते?
वक्ते: अतुल राजोळी

डीव्हीडीची किंमत: रुपये ३००/- फक्त!
डीव्हीडी घरपोच मिळविण्यासाठी संपर्क साधा: सुनिल तावडे ९८२१८९८१७१

14 February 2010

विक्री कौशल्यः प्रभवी तंत्र व मंत्र

कोणत्याही कंपनीचे सर्वात महत्त्वाचे डिपार्टमेंट जे कंपनीला नफा मिळवून देते व कंपनीचे प्रॉडक्ट अथवा सर्विस जास्तीत जास्त ग्राहकांना उपभोगण्यास मदत करते ते म्हणजे सेल्स डिपार्टमेंट होय. तसेच कोणत्याही कंपनीच्या उच्च पदावर कार्यरत असलेल्या लोकांच्या कारकिर्दीचा बारकाईने अभ्यास केल्यास आपल्याला असे जाणवेल की त्यातील बहूतांशी लोकांना सेल्सचा अनुभव असतो. हे सांगण्याचे कारण, आपणास विक्री कौशल्य (सेलींग स्कीलस्) चे महत्त्व पटवून देणे एवढेच. या लेखाद्वारे आपणासमोर विक्री कौशल्यांशी संबंधीत काही प्रभावी तंत्र व मंत्र थोडक्यात मांडत आहे.

आपण कोणतेही प्रॉडक्ट अथवा सर्विस विकत का घेतो?
आपणास नेहमी आपल्या जीवनाचा दर्जा वाढवण्यास आवडते. आपणास एक सुखी जीवन जगायचे असते. आपल्याला जीवनात त्रास होउ नये याची आपण काळजी घेत असतो. म्हणजेच थोडक्यात आपल्याला सुख हवं असतं आणि दु:ख नको असतं. आपण करत असलेली कोणतीही कृती एकतर सुख मिळविण्यासाठी करतो किंवा दु:ख टाळ्ण्यासाठी करतो. हे मानसशास्त्राद्वारे सिद्ध देखिल झालं आहे. नेमक्या याच नियमाला अनुसरुन आपण कोणतेही प्रॉडक्ट अथवा सर्विस विकत घेतो व उपभोगतो. आपण काहीही विकत घेतो ते त्याद्वारे मिळणार्‍या सुखासाठी किंवा त्याद्वारे कुठला तरी प्रॉब्लेम (त्रास) टाळ्ण्यासाठी. उदाहरणार्थः आपण गाडी विकत घेतो ते आपला प्रवास सुखकर होण्यासाठी व बस, ट्रेनमध्ये फिरतानाचा त्रास व गर्दी टाळ्ण्यासाठी. कोणत्याही सेल्स प्रोफेशनलसाठी हा मुलभुत व अतिमहत्वाचा नियम माहीत असणं गरजेच आहे.

सुख, दु:ख आणि सेलींग
प्रत्येक सेल्स प्रोफेशनलला हे समजणे गरजेचे आहे की आपले प्रॉडक्ट अथवा सर्विस लोकांचे कोणते दु:ख किंवा त्रास दुर करते व लोकांना कोणते सुख किंवा आनंद देते. हा भाग वाटतो तेवढा सोपा नाही. यासाठी विचार मंथनाची गरज आहे कारण लोकांची सुखं किंवा दु:खं हि प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आपल्या प्रॉडक्ट अथवा सर्विसवर अवलंबुन असतात. ते शोधुन काढणे हे खरे कौशल्य आहे. नवख्या सेल्स प्रोफेशनलला हे जरा कठीण जाउ शकते. परंतु आपल्या प्रोडक्ट अथवा सर्विसचे सविस्तर ज्ञान (प्रॉडक्ट नॉलेज) मिळवल्यानंतरच ते शक्य आहे.
जेव्हा विक्रेता ग्राहकाला भेटतो तेव्हा आपल्या प्रॉडक्ट अथवा सर्विस बद्दल माहीती सांगण्या आधी विक्रेत्याने आपल्या ग्राहकाचा त्रास समजुन घेणं गरजेचे आहे. बहुतेक, असं हि असु शकतं कि ग्राहकाला फक्त त्याला होत असलेल्या त्रासाची लक्षणेच माहीत असतील, नेमका प्रॉब्लेम काय आहे त्याला सुद्धा माहीत नसेल. तेव्हा विक्रेत्याने ग्राहकाचे म्हणणे व्यवस्थित ऐकून घेतो मगच इलाजाबाबत आपणास सांगतो.
ग्राहकाचा प्रॉब्लेम नेमका काय आहे, हे समजुन घेतल्यानंतर व आपल्या प्रॉडक्ट अथवा सर्विसची माहीती सांगण्या आगोदर, विक्रेत्याने ग्राहकाला प्रॉब्लेमच्या तीव्रतेची जाणिव करुन दिली पहीजे. जर हा प्रॉब्लेम दुरुस्त झाला नाही तर त्याचे काय पडसाद उमटतील याची कल्पना ग्राहकाला करुन दिली पाहीजे.
ग्राहकाला आपल्या प्रॉब्लेमच्या तीव्रतेची जणिव झाली कि मग हा प्रॉब्लेम दुर करण्यासाठी तो पुढाकार घ्यायला तयार आहे का? आणि त्यासाठी लागणारी किंमत मोजायला तो तयार आहे का? याची खात्री झाल्यानंतर विक्रेत्याने आपल्या प्रॉडक्ट अथवा सर्विस बद्दल माहीती देण्याची योग्य वेळ आलेली असते. या वेळी जेव्हा विक्रेता आपल्या प्रॉडक्ट अथवा सर्विसबद्दल माहीती विशिष्ट पद्धतीने सांगतो व ग्राहकाचा प्रॉब्लेम दुर होउन त्याचा कश्याप्रकारे फायदा होइल याची कल्पना देतो तेव्हा सेल होणे खुप सोपे होउन जाते.

विक्रेत्याने आपल्या प्रॉडक्ट अथवा सर्विस बद्दल माहीती देण्या आगोदर खालील ५ प्रश्नांची माहीती मिळवणे गरजेचे आहे:
१. ग्राहकाचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? (बहूतेक त्याला सुद्धा माहीत नसेल!)
२. मी, माझा प्रॉडक्ट अथवा सर्विस ग्राहकाचा प्रॉब्लेम परिणामकारकपणे दुर करु शकतो का?
३. ग्राहक आपला प्रॉब्लेम दुर करण्यासाठी प्रेरित झाला आहे का?
४. ग्राहकाकडे प्रॉब्लेम दुर करण्यासाठी आर्थिक पाठबळ आहे का?
५. प्रॉब्लेम दुर करण्यासाठी अंतिम निर्णय घेणारी व्यक्ती नेमकी कोण आहे?
वरिल ५ प्रश्नांची उत्तरे मिळविल्यानंतर विक्रेत्याला आपल्या प्रॉडक्ट अथवा सर्विस बद्दल माहीती सांगणे परिणामकारक ठरते. यामुळे ग्राहक विक्रेत्याचे म्हणणे लक्षपुर्वक ऐकुन घेतो व विक्रेत्याबद्दल त्याच्या मनात आदर निर्माण होतो. परंतु सर्व साधारण सेल्स प्रोफेशनल ग्राहकाला भेटल्यावर लगेच आपल्या प्रॉडक्ट अथवा सर्विसची माहीती देण्यासाठी उत्सुक असतो. त्याला अजिबात कल्पना नसते कि आपल्या ग्राहकाला प्रॉब्लेम काय आहेत? तो ते सोडवण्यासाठी खरोखरच तयार आहे का? प्रॉब्लेम संबंधी तोच निर्णय घेणार आहे कि आणखी कोण? व अंततः निराशा त्याच्या पदरात पडते.

(click to enlarge the image)
  (click to enlarge the image)
वरिल विक्री तंत्राला SPIN SELLING असे म्हणतात. या लेखा मार्फत अतिशय थोडक्यात व मोजक्या शब्दात हे तंत्र मांडण्याचा हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आम्ही आमच्या बॉर्न टू विन या संस्थेमार्फत 'SPIN SELLING प्रभावी विक्रीचे तंत्र' कार्यक्रमाद्वारे निरनिराळ्या क्षेत्रातील सेल्स प्रोफेशनल लोकांना त्यांच्या प्रॉडक्ट आणि सर्विसच्या विक्रीमध्ये वाढ होण्यासाठी मदत करतो. यामध्ये विमा कंपन्या व नेटवर्क मार्केटींग कंपन्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. पुढील कार्यक्रम आहे १९ फेब्रुवारी २०१० रोजी, रविंद्र नाट्यमंदीरच्या मिनी ऑडीटोरीयमध्ये, सकाळी १० वाजता. आपणास या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा असल्यास जरुर संपर्क साधा. संपर्कः श्री. सुनिल तावडे: ९८२१ ८९८१७१.

(click to enlarge the image)
(click to enlarge the image)

धन्यवाद!
                                                                                                                                                                
 - अतुल राजोळी

01 January 2010

07 December 2009

Thank You Very Much Nitin Potdar Sir


नमस्कार!


मित्रांनो, शनिवारी २८ तारखेला Born2WIN चा लक्ष्यवेध सेमिनार प्रभादेवीच्या टेक्सटाईल कमिटी हॉल मध्ये झाला. बुधवारी व गुरुवारी सेमिनारची जाहिरात महाराष्ट्र टाईम्समध्ये आम्ही दिली होती. गुरुवारी सकाळीच नितीन पोतदार सरांचा (www.nitinpotdar.blogspot.com) SMS आला- 'Good photograph in today's mata' Keep it up. Nitin Potdar.

Ofcourse लगेच मी SMS ला Thank You Very much sir असा reply केला.

SMS पाहून खुप बरं वाटलं. Born2WIN ची संपुर्ण टिम सेमिनारच्या तयारीला लागली होती. शुक्रवारी माझा खास मित्र विनोद मेस्त्रीचं लग्न होतं. मी नं जाण्याचा सवालचं येतं नाही. मी आणि अमेय दोघेही जोडीने लग्नाला गेलो. संध्याकाळी मी घरी आलो ते तापाने फणफणतच. अमेय ऑफिसला गेला. मी घरी थांबून इतर कामे करत होतो. अमेयचा 'काळजी घे' असा sms येवून गेला. तापाकडे दुर्लक्ष करत मी काम करत होतो. रात्रीपर्यंत हालत आणखीनच खराब झाली. अनुभवाप्रमाणे मला माहित होतं की स्टेजवर मी एकदा गेलो की I am all Right. असं आधी बर्‍याच वेळा झालं आहे. रात्री लवकर झोपलो.

सकाळी उठलो ते प्रचंड टेंशनमध्ये. घसा दुखत होता. बोलायला त्रास होत होता. गुळण्या केल्या. बरं वाटलं. पण अंगात ताप होता. सेमिनारच्या तयारीला लागलो. कामात असलो की आपल्याला बरं वाटत नाही आहे याची जाणिव होत नाही. साडेबारा वाजता नितीन पोतदार सरांचा फोन आला ...

" अतुल, आज कार्यक्रम कीती वाजता आहे?"
 
"सर, सहा वाजता आहे.."
 
" ओके, प्रभादेवीलाच आहे ना.. मी संध्याकाळी घरीचं आहे and I am planing to come to your program"
 
"Oh, Great Sir, Thank you so much"
 
"ऐक, मी येणार आहे, कारण मला बघायचे आहे की तुझा कार्यक्रम काय असतो. कशी माणसं येतात आणि त्यांचा response कसा असतो. सो.. मी फक्त Observe करेन, You don't announce that I have come. Ok.."
 
" ओके सर नो प्रोब्लेम, तुमच्यासाठी Front Row मध्ये Reserve करुन ठेवेन. थॅंक यु सर.."
 
" ओके अतुल सी यू इन द इवीनींग..."
 
बापरे! मी गार झालो. माझ्या आदर्श व्यक्तींपैकी एक नितीन पोतदार सर स्वतः माझा कार्यक्रम अटेंड करणार होते. इट वॉज गोईंग टू बी बिग नाइट फॉर मी! अंगात ताप होता पण मला काहीच चान्स घ्यायचा नव्हता. डॉक्टरकडे गेलो.
 
"तुला ताप आहे..., तुझा कर्यक्रम कधी आहे?" डॉक्टरनी विचारलं.
 
" आज संध्याकाळी. उद्या सकाळी आणि परवा पुर्ण दिवसभर."
 
"काय...? ओके. इंजेक्शन कुठे घेणार हातावर की कमरेवर?"
 
" कुठेही चालेल, मला विकनेस वाटला नाही पाहिजे..."
 
इंजेक्शन व गोळ्या घेउन मी घरी आलो. जेवलो, गोळ्या खाल्या व थोडा आराम केला. तो पर्यंत हॉलवर जायची वेळ झाली. तयार होउन निघालो. हॉलवर पोहोचल्यावर रेडी झालो. पाच वाजले असतील... सहाला कर्यक्रम चालु होणार होता. लोकं हॉलच्या बाहेर येउन उभी होती. साडेपाचला लोकांना आम्ही आतमध्ये घ्यायला सुरुवात केली. मी बॅकस्टेजला होतो. बॅकस्टेजला जस्ट बसलो असताना अमेय, नितीन पोतदार सरांनाघेउन आला.
 
"अतुल ऑल द बेस्ट... हॉल छान आहे. I am here to just enjoy don't worry about me. I am sitting in front row.."
 
"Ok thank you sir.." आणि सर सभगृहात जाउन बसले.
 

आज एक वेगळचं दडपण होतं. मी थोडा conscious झालो होतो. पण मी ठरवलं, I need to give my Best.. ठीक सहाला कार्यक्रम चालु झाला. सर समोरच बसले होते. कार्यक्रम चांगल्या 'फ्लो' मध्ये चालला होता. जवळपास आठ वाजता स्टेजवर माझ्याकडे चिठ्ठी आली. ' Sir will come on stage for lucky draw'. मी थोडा कंफ्युज झालो.. 'सर म्हणाले होते की ते स्टेजवर येणार नाहीत... बहूतेक अमेयशी काहीती बोलणं झालं असेल...'
 

कार्यक्रमातील माझं प्रेझेंटेशन संपलं फिडबॅक फॉर्म लोकांकडून घेण्यात आले व जमा केलेल्या फीडबॅक फॉर्म मधून दोन भाग्यशाली विजेते काढण्यात येणार होते व त्यासठी मी सरांना स्टेजवर आमंत्रित केले. सर स्टेज वर आले. अर्थातच सर स्टेजवर असताना त्यांनी दोन शब्द बोलणं असा माझ्यासहीत हॉलमधील सर्वांचाच हट्ट होता. सरांनी माइक घेतला व त्यांचे पहीले शब्द होते...
 

"अतुल आणि अतुलचे अतुलनीय प्रेझेंटेशन..!" हे शब्द ऐकून माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. इतकच नव्हे त्यांनी बॉर्न टू विनच्या संपुर्ण टिम वर स्तुती सुमने उधळली.

सर भरभरून बोलत होते. मा़झा माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता, सरांनी 'मराठी समाजाला उगाचच नावं ठेवली जातात' यावर सुध्दा स्पष्ट भाष्य केले. उपस्थित जनसमुदाय मराठी असल्यामुळे त्यांच्याकडुन सुध्दा त्यांच्या शॉर्ट अँड स्विट भाषणाला जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद मिळाला. सरांनी विजेत्यांची नावे घोषित केली, त्यांना 'स्टॉपवॉच' व 'ऑपरेशन ब्लॅक टोर्नेडो' ही पुस्तके देण्यात आली.
 
आपण ज्या व्यक्तीला आदर्श व्यक्ती मानतो त्या व्यक्तीने मोठ्या जनसमुदायासमोर आपली स्तुती करणे हे कोणासाठीही आनंददायी असणारच आणि त्याच बरोबर मला असे मनापासुन वाटले की भविष्यात बॉर्न टू विनच्या टिमने आपल्या कामगीरीचा दर्जा आणखी ऊंचावला पाहीजे. आपण आता जास्त जबाबदार झालो असल्याची भावना निर्माण झाली.

Thank You Very Much Nitin Potdar Sir. (www.nitinpotdar.blogspot.com)

- अतुल राजोळी
Born2WIN


















Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites