LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

16 February 2011

प्रगतीचा एक्स्प्रेस वे - लोकसत्ता

नमस्कार मित्रांनो!

दिनांक १२ फेब्रुवरी २०११ च्या संध्याकाळी सुप्रसिध्द कॉर्पोरेट लॉयर श्री. नितीन पोतदार लिखीत 'प्रगतीचा एक्सप्रेस वे' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होटेल ताज मध्ये अगदी दिमाखदार पध्दतीने पार पडला. या कार्यक्रमाला मी स्वतः देखिल उपस्थित होतो. मराठी उद्योग व साहीत्य जगतात पहील्यांदाच एखादे मराठी पुस्तक, हॉटेल ताज मध्ये भव्यदिव्य कार्यक्रमामध्ये प्रकाशित झाले. या ऐतिहासिक क्षणाचा अनुभव घेण्याची संधी मिळाल्याबद्द्ल मी स्वतःला भाग्यशाली समजतो व मला आमंत्रित केल्याबद्दल नितीन पोतदार सरांचे मनापासुन आभार मानतो. उद्योग जगतातील दिग्गज व्यक्तिंच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाबाबत लोकसत्तामध्ये जो लेख आला तो ईथे आपणास वाचण्यासाठी उपलब्ध करुन देत आहे.

धन्यवाद!

आपला विश्वासु
अतुल राजोळी



मराठी उद्योजकांनी विशेषत तरुणांनी पारंपरिक मानसिकतेतून बाहेर पडून आपली आर्थिक प्रगती केली पाहिजे. जुन्या मानसिकतेचा पगडा अजूनही अनेक मराठी लोकांवर आहे. ही कोती मनोवृत्ती बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण त्याला हवा तेवढा वेग नाही. अशावेळी कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांनी लिहिलेले प्रगतीचा एक्स्प्रेस वे हे पुस्तक म्हणजे तरुण मराठी उद्योजकांना अगदी योग्य वेळी रिचार्ज करणारे पुस्तक आहे, असे प्रतिपादन नियोजन मंडळाचे सदस्य व अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले. जीवनरंग प्रकाशनने तयार केलेल्या प्रगतीचा एक्स्प्रेस वे या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. जाधव, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर आणि लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोचे सीएफओ वाय.एम. देवस्थळी यांच्या हस्ते ताजमहाल हॉटेलमध्ये काल झाले. यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ. जाधव म्हणाले की गरिबीचे उदात्तीकरण मराठीत सर्वाधिक आहे. आपल्या काही म्हणीही गरिबीचेच समर्थन करतात. गरिबांनी गरीब राहावे म्हणून श्रीमंतांनी पसरवलेली ही अफवा आहे. खरे तर दारिद्ऱ्यापेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे मनोदारिद्रय़. ते अगोदर दूर व्हायला हवे. म्हणून बदलत्या मराठी मानसिकतेची चर्चा करणे अतिशय महत्त्वाची बाब आहे. मधु मंगेश कर्णिक यांनी आपल्या मनोगतात सांगितले की उद्योगात दूरदृष्टी आणि वेगळे काही करण्याची प्रेरणा आवश्यक असते. उद्योजकात ऊर्जा आणि नवनिर्मितीची ऊर्मी असावे लागते. त्यात त्याच्या प्रज्ञा आणि प्रतिभेचा कस लागत असतो. महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळात महाव्यवस्थापक म्हणून काम करताना मला उद्योगक्षेत्रात जे अनुभव आले होते, त्याचा पुनप्रत्यय मला नितीन पोतदारांचे हे पुस्तक वाचताना आला. मराठी मनातील उद्योगाविषयीचा न्यूनगंड दूर होण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त आहे. या पुस्तकामुळे उद्योगाचा एक्प्रेस वे अधिक एक्स्प्रेस होईल. उद्योगाच्या अखंडीकरणासाठी आणि सातत्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांची चर्चा श्री. वाय. एम. देवस्थळी यांनी केली. ते म्हणाले की लांब पल्ल्यापर्यंत पोहोचणारी दृष्टी उद्योजकाकडे हवी. सर्वोत्तमाचा ध्यास धरून त्याच्या पूर्ततेचा प्रयत्न करणे आणि सर्वसमावेशक व पारदर्शकता याच्या जोडीला आपल्या सहकाऱ्याचे कौतुक करण्याचे आणि आत्मपरिक्षण करण्याचे कसबही त्याच्यात असायला हवे.



या गोष्टी जर उद्योगात असतील तर कुटुंबाने चालविलेला उद्योग आणि व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून केलेला उद्योग यात फरक करता येणार नाही. या दोन उद्योगात फरक करणे मला मान्य नाही. मराठी माणूस उद्योगात कसा स्थीरावला आहे, याचे विवेचन कुमार केतकर यांनी सहकारक्षेत्राचा हवाला देऊन केले. ते म्हणाले, महाराष्ट्रात उद्योजकता नाही, असे नाही. तो एक न्यूनगंड आहे. आपल्याकडे अशिक्षित आणि अल्पशिक्षितांनीही शतकापूर्वी यशस्वी उद्योग केले आहेत आणि करीतही आहेत. पण आता नोकरीमुळे त्यांच्या अंगभूत गुणांवर बुरशी चढली आहे. ती बुरशी काढून टाकून त्याच्याखाली दडलेले सत्य जाणले पाहिजे.

पुस्तकाच्या प्रयोजनाबाबतची भूमिका स्पष्ट करताना नितीन पोतदार म्हणाले की गेल्या २३ वर्षांत मी जागतिक स्तरावरचे अनेक उद्योगक्षेत्रातील घडामोडी जवळून पाहिल्या आहेत. त्यात जातीचा, भाषेचा प्रश्न कुठेच डोकावत नाही. एकतर उद्योजक असतो किंवा उद्योजक नसतो. मराठी माणूस यशस्वी उद्योजक होऊ शकत नाही, असे सर्वेक्षण कोणी आणि केव्हा केले? चाकरमानीचा लेबल आपण स्वत:वर का लादून घेतो? येणारे शतक हे ज्ञानाधिष्ठीत असणार आहे. तेव्हा दोन दशकांसाठी तरी आपण आपले चुकीचे समज बाजूला ठेवूया आणि आताच्या महत्त्वाकांक्षी युवकांवर चाकरमानीचा शिक्का मारू नका. त्यांना फुलू द्या. कारण मराठी माणसाचा विश्वासाहार्यता हा ब्रण्ड आहे. हा ब्रॅण्ड पुढे नेण्याची गरज आहे. मला माझ्या क्षेत्रात आलेले अनुभव मी समाजापुढे ठेवले आहेत. आपणाला आलेले अनुभवही आपण तरुणांसमोर ठेवून मराठी उद्योजकांची एक पिढी निर्माण करायला हातभार लावू या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जीवनरंग प्रकाशनचे संजय गोविलकर यांनी त्यांच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले की मराठी पुस्तक प्रकाशनाचा हा कार्यक्रम जाणून ताजमहाल हॉटेलमध्ये घेण्यात आला. २६/११ च्या काळरात्रीनंतर आपण याच ठिकाणी पुन्हा भारतीय म्हणून एक झालो. त्याचा संदर्भ आणि उद्योगक्षेत्राची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या टाटांच्या वास्तूत हा कार्यक्रम आयोजित केला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. यावेळी द.म.सुकथनकर, एस.बी.आय.इन्सुरन्सचे अध्यक्ष अशोक प्रधान, टाटा रिटेल इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष दीपक देशपांडे, नंदकिशोर देसाई, कॅमलिनचे सुभाष दांडेकर, श्रीराम दांडेकर, सचिन जकातदार, सुनील रोहोकले, अनेय खरे, उपेंद्र कुलकर्णी, निखील नाईक, नितीन वेद्य, उदय निरगुडकर आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर व उद्योगपतीं यावेळी उपस्थिती होते. प्रगतीचा एक्स्प्रेस वे हे पुस्तक http://www.bookganga.com/ या वेबसाईटवरही उपलब्ध आहे.

सौजन्यः लोकसत्ता - 

05 February 2011

प्रश्न विचारा!

प्रश्न विचारा!
बॉर्न २ विन संस्थेच्या लक्ष्यवेध सोहळ्यात २ डिसेंबर १० ला लार्सन अन्ड टूर्बोचे सीएफओ व डायरेक्टर वाय. एम. देवस्थळी हे प्रमुख पाहुणे होते. बॉर्न २ विनचे प्रमुख अतुल राजोळी यांनी देवस्थळींची मुलाखत घेतली. अनेक बिझनेस चॅनेलवर देवस्थळी आपल्याला अनेकवेळा दिसतात व ते एल अन्ड टी, इन्फ्रास्ट्रक्चर, अर्थव्यवस्था अशा विषयांवर बोलत असतात. पण लक्ष्यवेध सोहळ्यास आलेला श्रोतृवर्ग तरुण व करिअरमध्ये पुढे जायच्या ध्येयाने पछाडलेला. त्यामुळे राजोळींनी मुलाखतीचा रोख ठेवला होता करिअर ग्रोथ. व देवस्थळींचे मोठेपण हे की त्यांनी सर्व प्रश्नांना सर्वांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत व मोकळेपणाने उत्तरे दिली. ही मुलाखत चांगलीच रंगली व प्रत्येकजण काही शिकून गेला, जाताना बरोबर काही मौल्यवान विचार घेऊनच गेला.

सिडनेहॅम कॉलेजमधून बी. कॉम. केल्यानंतर देवस्थळींनी सी. ए. व एल. एल. बी. दोन्ही एकदमच केले ते सहज व तशी प्रथाच असल्यासारखे होते म्हणून. एल. अन्ड टी. ही पायाभूत सुविधा क्षेत्रातील आज एक अजस्त्र कंपनी आहे. सध्या तिची वार्षिक उलाढाल ३७००० कोटींची आहे व नक्त नफा ४३७५ कोटींचा आहे. एक स्वच्छ, निष्कलंक व अत्यंत कार्यक्षम कंपनी अशी एल अन्ड टीची ख्याती आहे. डेन्मार्कमधील दोन तरूण इंजिनिअर व्यवसायासाठी भारतात आले व १९३८ मध्ये त्यांनी ही कंपनी स्थापन केली. १९५० मध्ये हीचे रुपांतर पब्लीक लिमिटेड कंपनीत झाले व त्यावेळेस तिची वार्षिक उलाढाल होती एक कोटी रुपये फक्त! म्हणजेच ६० वर्षात १ कोटीवरून ३७००० कोटी अशी कंपनीने झेप घेतलेली आहे. आता ही पूर्णपणे भारतीय कंपनी आहे. भारताच्या प्रगतीत तिचे अत्यंत महत्वाचे योगदान आहे. या कंपनीत ७४ साली अकाऊंटस सुपरवाझर म्हणून रुजू होताना पुढे ही कंपनी इतकी मोठी होईल असे वाटले होते का, या प्रश्नाच्या उत्तरात देवस्थळी म्हणाले, ह्या कंपनीत मूल्यांना महत्व आहे, वाटेल त्या प्रकारे व्यवसाय ती करणार नाही इतके माहिती होते. माणसे छान निवडतात याची कल्पना होती. इथे प्रगतीच्या संधी आहेत दिसत होते. कंपनीत अधिकारीपदावर रुजू झाल्यावर आजही ती व्यक्ती डायरेक्टर होऊ शकते. ही एक प्रोफेशनली मॅनेज्ड कंपनी आहे.


देवस्थळींना मुंबईत फॅक्टरीतील, मॅन्यूफॅक्चरींगमधील कामाचा अनुभव होता. काही वर्षांनी ते कोलकाता, दिल्ली इथे गेले व कामाचे स्वरूपही बदलले. मार्केटींग, सेल्स अशा विभागात त्यांनी काम केले. ही वर्षे खडतर होती का विचारल्यावर ते म्हणाले, खडतर नव्हे तर माझ्यासाठी ही मजेची वर्षे होती. तरुण वय होते, नवे शिकायचे होते, स्वत:चा सर्वांगीण विकास साधायचा होता. बाहेर काम केल्याने बिझनेसकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन मिळाला. तिथल्या कार्यसंस्कृतीशी परिचय झाला. दिल्लीत उदा: खूशमस्करेपणा चालतो! तरुणांना त्यांचे सांगणे होते, आज स्पेशलायझेनला खूप महत्व दिले जाते. नव्याने रुजू होणारे म्हणतात, मला ट्रेझरीमध्ये काम करायचे आहे. पण फक्त ट्रेझरी, फक्त एक खाते असा दृष्टीकोन नको. एकाच खात्याचा अनुभव असेल तर त्या खात्याच्या सर्वोच्च पदापर्यंत मजल मारता येईल, पण कंपनीच्या सर्वोच्च पदापर्यंत जाता येणे कठीण. स्वत:च्या कम्फर्ट झोनमध्ये राहू नका. नवे शिकत राहा, मी आजही शिकत असतो असे ते म्हणाले. बदल्यांच्या वेळचा काळ कुटुंबासाठी मात्र खडतर होता हे ते मान्य करतात.

९० नंतर खाजगीकरणाचा काळ सुरू झाला. पायाभूत सुविधा क्षेत्रात कंपनीला मोठी कामे मिळायला लागली, त्याचा व्यावसायिक जीवनावर काय परीणाम झाला याबाबत ते म्हणतात, ९० पासून आर्थिक उदारीकरण सुरू झाले, पण कंपन्यांना बांधा, वापरा, हस्तांतरीत करा प्रकल्प मिळणे ९८ सालापासून सुरू झाले. तसेच कंपनीला परदेशातील मोठे प्रकल्प मिळत होते. वित्त विभागाच्या कामात फार मोठा फरक झाला. अनेकविध मार्गाने भांडवल उभारणे आवश्यक झाले. परदेशातून एडीआर, जीडीआर मार्फत भांडवल उभारले. ह्या सगळ्याचा अभ्यास करावा लागला. बिझनेसच्या लोकांना विचारून माहिती करून घेतली. देवस्थळी म्हणतात, प्रश्न विचारा, जिज्ञासूवृत्ती हवी. अर्जूनाने प्रश्न विचारला म्हणून तर श्रीकृष्णाने गीता सांगितली. प्रश्न विचारण्याबाबत कोणताही संकोच नको असे ते आग्रहाने सांगतात. प्रश्न विचारल्यावर उत्तर देण्याऐवजी जर कोणी काय मुर्खासारखा प्रश्न विचारतोयस म्हणत असेल तर त्याचा दृष्टीकोन चुकीचा आहे. अशा लोकांच्या धास्तीने प्रश्न विचारणे बंद करू नका असे ते म्हणतात.

देवस्थळी आजही सकाळी ८ ते रात्री ८ काम करतात. ही पॅशन, ड्राईव्ह, उर्जा कुठून येते यावर ते म्हणतात, ह्या कंपनीने मला खूप दिले, पुढच्या पाच-दहा वर्षांचा विचार कंपनीत सुरू असतो. यश मिळवल्यानंतर ते टिकवून ठेवणे कठीण असते. ते टिकवायचे ह्या जबाबदारीने पॅशन येते. एल अन्ड टीचे हे वैशिष्ट आहे की इथे सामान्य माणसे असामान्य कर्तृत्व दाखवतात. सकारात्मक दृष्टीकोन, उद्दीष्ट माहीत हवे व मी ते साध्य करू शकतो हा दृढ विश्वास हवा, यशस्वी व्यक्तीच्या अशा ते तीन क्वालीटी सांगतात. अधिकार्‍याना त्यांचा सल्ला आहे, कर्मचार्‍याचे काही चांगले दिसले तर दहा वाक्ये बोला पण वाईट दिसले तर एकच वाक्य बोला. मनापासून कौतूक करा, तेही दहा लोकांसमोर, पण दोष त्या एकट्यालाच सांगा. अपयशाला तोंड देण्याबाबत ते म्हणतात, २००८ च्या जगभरच्या पडझडीमुळे एल अन्ड टीच्या ट्रेझरीला तोटा सहन करावा लागला. भावनिक असल्याने देवस्थळीना त्याचा त्रास झाला. पण कंपनी फार छान असल्याने त्रास सहन करू शकले. त्यातून ते शिकले बिझनेसमध्ये चढ-उतार होणारच. पुन्हा ती चुक होऊ नये याची काळजी घेणे.

रोल मॉडेल अर्थात आपली आदर्श व्यक्ती ह्या कल्पनेला आपण खूप महत्व देतो. देवस्थळी म्हणतात, एकच व्यक्ती रोल मॉडेल असू नये कारण ती व्यक्ती काही बाबतीत चांगली असेल तर काही बाबतीत नसेलही. तिला आंधळेपणाने फॉलो करू नका व अनेक व्यक्तींकडून जे जे चांगले गुण आहेत ते घ्या.

एल अन्ड टी वित्तक्षेत्रात धडाक्याने विस्तार करत आहे. म्युचुअल फंड ताब्यात घेऊन त्या व्यवसायात प्रवेश केला आहे. बॅंक सुरू करणार आहे अशी कुणकुण आहे. अशा अनेक नव्या व्यवसायाची सुरवात करून ते यशस्वी करण्याची फार मोठी जबाबदारी देवस्थळींवर आहे. ते आता केवळ एक प्रोफेशनल नाहीत तर बिझनेसमन म्हणून त्यांचे ट्रान्झिशन झालेले आहे. ह्या स्थित्यंतराबाबत ते म्हणतात, उद्योजक धोका पत्करतो, जोखीम घेण्याची ताकद हवी. त्याला धंद्याचा सर्वांगीण विचार करावा लागतो, फक्त आपल्या खात्यापुरते पाहून चालणार नाही. उद्योगासंबधी त्यांनी जे सांगितले ते सर्व उद्योजकांसाठी महत्वाचे आहे. ते म्हणतात, ऑर्गनायझेशन बिल्डींग म्हणजे संस्था ऊभारणे आवश्यक. त्यासाठी कर्मचारी, अधिकारी जमवावे लागतात. त्यांना टिकवून ठेवावे लागते. निर्णय घेताना केवळ तात्कालीक फायद्याचा विचार करून चालत नाही तर दीर्घ पल्याचा विचार करावा लागतो. यश मिळाले तरी ते टिकवून ठेवणे, त्यात सातत्य राखणे महत्वाचे असते. करिअर बाबत त्यांचा सल्ला आहे, दिशा ठरवा, शॉर्टकटने फायदा होत नाही. पटापट नोकर्‍या बदलवून ज्ञान मिळत नाही. कंपनीत मुल्यांना महत्व असावे, पण तुम्ही रुजू झालेल्या कंपनीत हे तत्व नसेल तर स्वत:साठी तुम्ही मूल्ये निर्माण करा. भारत देश महान करायचा असेल तर उद्योजक प्रामाणिक हवेत.

बिझनेस वाढवण्यासाठी काय करावे ह्याबाबत त्यांचे मार्गदर्शन आहे, कुठे जायचे ते माहीत हवे, इतरांनी केलेले डोळसपणे बघा. इनोव्हेशन, चेंज व इनट्रॉस्पेक्शन म्हणजे नवे मार्ग शोधणे, बदल करत राहाणे व आत्मपरिक्षण हवे.

मराठी संस्कार – अपब्रिगिंगबाबत ते म्हणतात, आपण मुलांना फार सुरक्षित वातावरणात वाढवतो, नको शब्दाचा जास्त वापर करतो, त्यांना धडाडी शिकवायला पाहिजे. केवळ घरातूनच नव्हे तर शाळा, कॉलेजातूनही नवे करण्यासाठी प्रोत्साहन हवे. संतुष्ट, समाधानी असणे वेगळे आणि काही अचीव्ह न करताचा संतुष्ट असणे वेगळे. निवृत्तीला पाच – दहा वर्षे बाकी असतानाही, आता मी जास्त काम करून काय करू, लवकरच निवृत्त होणार असा विचार करणे चुक आहे. आपल्या मेंदूचा पाच टक्के वापरही आपण करत नाही.

मुलाखतीचा समारोप करताना, पुढे काय ह्या प्रश्नावर ते म्हणाले, सध्या मायक्रोफायनान्स क्षेत्र वादाच्या भोवर्‍यात सापडलेले आहे. पण ह्या आव्हानाचे संधीत रुपांतर करुन दाखवायचे आहे. फायनान्शियल इनक्लूझनसाठी भरीव कामगिरी करायची आहे. मला सिनेमाची आवड आहे, निवृत्त झाल्यावर एक चांगला सिनेमा काढायचा आहे, हे त्यांचे उद्गार त्यांच्या एका वेगळ्या पैलूकडे निर्देश करणारे होते.

बॉर्न २ विनने मुलाखतीआधी देवस्थळींच्या वेळोवेळी विविध चॅनेलवर झालेल्या मुलाखती संकलीत करुन त्याचा व्हिडीओ दाखवला. ह्या संस्थेच्या कार्यक्रमातील तांत्रिक बाबी वाखाणण्याजोग्या होत्या.

अर्थ व उद्योगक्षेत्रातील अशा कर्तृत्ववान व्यक्ती समाजासमोर वारंवार यायला हव्यात.

उदय कुलकर्णी ९८६९६७२६९६

19 January 2011

२६ जानेवारी २०११ - तिसरा THE SUCCESS BLUEPRINT SEMINAR

नमस्कार मित्रांनो!


२०११ या वर्षाची सुरुवात अगदी दणदणीत झाली. मागिल ब्लॉग-पोस्ट मध्ये माहीती दिल्याप्रमाणे ९ जानेवारी २०११ रोजी आयोजित करण्यात आलेला THE BUSINESS BLUEPRINT SEMINAR दणक्यात पार पडला. वरळी येथिल Who Are We हॉल हाऊसफुल झाला होता व उपस्थितांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात संपुर्ण कार्यक्रम पार पडला. त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासुन आभार!

त्याच बरोबर एक ऐतिहासिक गोष्ट याच महीन्यामध्ये घडली. BORN2WIN ने ANLP Certified NLP (Neuro Linguistic Programming) Practitioner Training Program मराठी मध्ये सुरु करुन प्रशिक्षण क्षेत्रामध्ये एक क्रांतीकारक पाऊल उचलले. आपणास सांगायला अत्यंत आनंद होतोय कि या पहील्याच प्रशिक्षणक्रमामध्ये एकूण ३५ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले. प्रशिक्षणार्थ्यांचा उत्साह पाहून बॉर्न टू विन टिमला नक्किच प्रचंड प्रोत्साहन मिळाले.

मित्रांनो गेल्या वर्षी बॉर्न टू विन ने एक आगळावेगळा सेमिनार आयोजित केला. तो म्हणजे THE SUCCESS BLUEPRINT SEMINAR! दिनांक ६ ऑगस्ट २०१० व २७ ऑक्टोब्र २०१० रोजी प्रभादेवी येथिल रविंद्र नाट्यमंदीर येथे हा सेमिनार आयोजित करण्यात आला होता. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात हे दोन्ही सेमिनार पार पडले. बॉर्न टू विनच्या ऑफिसमध्ये दररोज बर्‍याच लोकांचे पुढच्या सेमिनार बद्दल विचारपुस करण्याकरिता फोन येतच असतात. लोकांचा उत्साह व मागणी पाहून बॉर्न टू विन THE SUCCESS BLUEPRINT SEMINAR पुन्हा एकदा घेऊन येत आहे.

हो मित्रांनो! THE SUCCESS BLUEPRINT - एक Action Packed, Powerful, Highly Eneregetic Motivational Seminar... जो आपणास आयुष्यात आरोग्य, ऐश्वर्य, यश आणि आनंद मिळविण्यास नक्किच मदत करेल.

खाली या कार्यक्रमाचा VIDEO जरुर पहा...!


To Know More Click on Following Link: http://www.born2win.in/Testimonial/print.pdf



धन्यवाद!
-टिम बॉर्न टू विन

27 December 2010

WELCOME 2011

मित्रांनो, २०१० चा शेवटचा महीन्याचा शेवटचा आठवडा आता उजाडला! बॉर्न टू विनच्या टिमसाठी हे वर्ष इतके गतिक होते कि हे वर्ष कधी सुरू झाले व आता संपत आले हे कळलेच नाही! २०१० हे वर्ष एकंदरीच बॉर्न टू विन साठी अतिशय Eventful असे होते. बर्‍याच चांगल्या घडामोडी या वर्षभरात बॉर्न टू विन मध्ये घडल्या. २०१० मध्ये बॉर्न टू विन च्या विविध उपक्रमांचा फायदा जवळ जवळ १५ ते २० ह्जार लोकांना झाला. २०१० मध्ये बॉर्न टू विन ने बरेच Milestones साध्य केले. त्यातील काही महत्वाच्या Milestones ची माहीती आपल्या बरोबर Share करावीशी वाटली..
  • २०१० मध्ये बॉर्न टू विन नवीन व मोठ्या ऑफीसमध्ये पदार्पण झाले.
  • २०१० मध्येच बॉर्न टू विन चे निरनिराळे Audio Visual CDs लाँच झाल्या.
  • २०१० मध्ये बॉर्न टू विनने निरनिराळे सेमिनार राबवले व प्रत्येक सेमिनारला लोकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

- SPIN SELLING SEMINAR - १९ फेब्रुवारी २०१०

  
- THE SUCCESS BLUEPRINT SEMINAR - ६ ऑगस्ट २०१० व २७ ऑक्टोबर २०१०


- THE FINANCIAL BLUEPRINT SEMINAR - २४ नोव्हेंबर २०१० व २३ डिसेंबर २०१०
  • २०१० मध्ये बॉर्न टू विन बरोबर नवीन व उत्तम दर्जाचे प्रशिक्षक जोडले गेले: http://www.born2win.in/trainer.aspx
  • २०१० मध्ये काही दिग्गज व्यक्तींनी बॉर्न टु विनच्या कार्यक्रमामध्ये येऊन मार्गदर्शन केले.
- १० जानेवारी लक्ष्यसिध्दी सोहळा - प्रमुख पाहूणे - श्री.संजय गोविलकर (पोलिस इंन्स्पेक्टर, राष्ट्रपती शौर्य पदक विजेते तसेच 'स्टॉपवॉच' व 'मित्राची गुंतवणुक' या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक)

 - ४ एप्रिल २०१० - प्रमुख वक्ते - श्री. नितीन पोतदार (सुप्रसिध्द कॉर्पोरेट लॉयर)
- १० सप्टेंबर - प्रमुख पाहूणे व मुलाखत :- श्री. रविंद्र प्रभुदेसाई (एम.डी., पितांबरी प्रॉडक्टस प्रा.लि.)
 - २ डिसेंबर २०१० - प्रमुख पाहूणे व मुलाखत - श्री. वाय.एम.देवस्थळी (CFO, Whole-Time Director, L&T Limited)
 बॉर्न टू विन २०११ मध्ये म्हणजेच आपल्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या तीन वर्षातील बॉर्न टू विनचा प्रवास व प्रगती आपण सर्वांनीच पाहीलेली आहे. व आपल्या सदीच्छांमुळेच आम्ही आजपर्यंत जी काही थोडीफार प्रगती केली आहे ती करू शकलो आहोत व २०११ मध्ये देखील आपले स्नेह व सहकार्य आम्हास लाभेल अशी आशा आम्ही बाळगतो.

मित्रांनो, गेल्या तीन वर्षांमध्ये बॉर्न टू विनच्या लक्ष्यवेध या प्रशिक्षणक्रमामध्ये महाराष्ट्रीय उद्योजकांचा सहभाग जास्त प्रमाणात होता व लक्ष्यवेधला महाराष्ट्रीय उद्योजकांमध्ये आपली विश्वसनियता निर्माण करण्यात नक्कीच यश मिळाले आहे. महाराष्ट्रीय उद्योजकांच्या अडचणी, त्यांचे प्रश्न, त्यांच्या समजुती व त्यांना सततचे हवे असणारे मार्गदर्शन या गोष्टींना लक्षात घेता,  बॉर्न टू विन २०११ ची सुरवात एका अश्या कार्यक्रमाने करणार आहे, जो  महाराष्ट्रीय उद्योजकांसाठी अतिशय प्रेरणादायी व मार्गदर्शक असेल. या कार्यक्रमाचे नाव आहे THE BUSINESS BLUEPRINT SEMINAR या कार्यक्रमाच्या मदतीने उद्योजकाला आपला उद्योग, यशस्वी व्यवसायात रुपांतर करण्याबाबतचे मार्गदर्शन लाभेल.

या प्रभावशाली कार्यक्रमामध्ये आपणास खालिल गोष्टींचे स्पष्टीकरण होईल:-
  • का बहूतांश व्यवसाय यशस्वी होत नाहीत व त्या बाबतीत काय केले पाहीजे?
  • यशस्वी उद्योजक काय असे जाणतो जे अयशस्वी उद्योजकाला माहीत नसते?
  • सर्वसामान्य उद्योजक असामान्य यश कसे मिळवू शकतो?
  • प्रत्येक यशस्वी उद्योजकाकडे कोणते स्वातंत्र्य असणे गरजेचे आहे?
  • व्यावसायिक दृष्टीकोन म्हणजे काय?
  • सर्वसाधारण उद्योजकाची सर्वात मोठी गैरसमजुत कोणती असते?
  • उत्कृष्ट व्यवसाय उभारण्यासाठी व्यवसायाला कोणत्या टप्प्यांमधुन जावे लागते?
  • व्यवसायाच्या आत काम करण्यापेक्षा व्यवसाय उभारणी करण्यासाठी कश्या प्रकारे काम करावे?
  • व्यवसाय विकास प्रक्रियेचा वापर करुन, व्यवसायाचे आदर्श व्यवसायात रुपांतर कसे करावे?
  • परिणामकारक उद्योजकीय वृत्ती योजना म्हणजे काय?
  • बॉर्न टू विन चा २०११ मधील महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट बद्दल देखिल आपणास या कार्यक्रमामध्ये माहीती मिळेल.
THE BUSINESS BLUEPRINT SEMINAR

वक्ते: अतुल राजोळी
दिनांक: ९ जानेवारी २०११
वेळः सायंकाळी ६ ते ९
स्थळः हॉल ऑफ कल्चर, नेहरु सेंटर, वरळी
गुंतवणुकः रुपये ५००/- फक्त (लक्ष्यवेध प्रशिक्षणार्थ्यांसाठी विनामुल्य)
संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९


सुरु होणारे नवीन वर्ष २०११ आणि त्यातला प्रत्येक दिवस आपणा सर्वांना अमाप समृध्दी व भरभराटीचा जावो!
नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!

- टिम बॉर्न टू विन

13 December 2010

देवस्थळी स॑रांचे मौल्यवान मर्गदर्शन - Thank You So Much Sir!

 देवस्थळी स॑रांचे मौल्यवान मर्गदर्शन - Thank You So Much Sir!

 २ डिसेंबर रोजी लक्ष्यसिध्दी सोहळा माटूंगा येथील कर्नाटक संघ हॉल मध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते लार्सन अ‍ॅंड टुर्बोचे सी. एफ. ओ. व संचालक श्री. वाय. एम. देवस्थळी सर व त्यांची प्रकट मुलाखत. अतिशय उच्च पदावर कार्यरत असलेले देवस्थळी सर तेवढेच Down to Earth आहेत हे प्रकर्षाने जाणवले. सरांनी उपस्थित प्रेक्षकांबरोबर मनमोकळे पणाने संवाद साधला. उपस्थित प्रेक्षकांसाठी ही एक प्रकारची सुवर्णसंधीच होती, आजपर्यंत ज्या व्यक्तीला CNBC, NDTV, ETV NOW अश्या TV Channels वर पाहीले होते व वर्तमानत्रातुन वाचले होते अश्या व्यक्तीच्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात डोकावण्याची व त्यांच्या यशाचे रहस्य जाणुन घेण्याची एक उत्तम संधी सगळ्यांना लाभली होती.

सरांनी बरच काही सांगितलं व त्यातुन बरच काही शिकण्यासारखं आहे. त्यांच्या मुलाखती दरम्यान मला जाणवलेले काही महत्वाचे मुद्दे मी खाली मांडत आहे.

१. एखाद्या संस्थेला जर विकसित करायचे असेल तर त्या संस्थेचे कार्य काही मुल्यांवर (Values) अवलंबुन असणे गरजेचे आहे. हि मुल्ये (Values) संस्थेच्या प्रत्येक सदस्यामध्ये मुरली गेली पाहीजेत. मुल्ये जपण्यासाठी जाणिवपुर्वकरित्या व सातत्याने प्रयत्न केले पाहीजेत.

२. आपण स्वतःला एक महत्वाची सवय लावून घेतली पाहीजे, ती म्हणजे प्रश्न विचारण्याची सवय! आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसेल तर प्रामाणिकपणे कबुल करणे कि आपल्याला माहीत नाही आहे व ते माहीती करुन घेण्यासाठी ज्या व्यक्तीला माहीती आहे त्या व्यक्तीला प्रश्न विचारणे. यात लाज वाटण्यासारखे काहीच नाही. परंतु बहुतांश माणसे प्रश्न विचारण्यास धजावत नाहीत कारण त्यांना असे वाटते कि आपण जर प्रश्न विचारला तर इतरांना असे वाटेल कि, आपण मुर्ख आहोत. जर आपणास कोणी, "काय मुर्खासारखे प्रश्न विचारतोस?" असे जरी म्हंटले तरी त्याचा अर्थ असा होतो कि, ज्याला आपण प्रश्न विचारला आहे, त्याला त्याच्या ज्ञानाबाबत गर्व आहे. आपण मात्र जो पर्यंत उत्तर मिळत नाही तो पर्यंत आपण प्रश्न विचारणे थांबवायचे नाही.

३. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल काही चांगलं बोलायचं असेल तर आपण त्याबद्दल दहा वाक्यं बोलली पाहीजेत आणि जर वाईट बोलायचं असेल तर एक वाक्य बोलुन थांबलं पाहिजे.
बोरीवली पश्चिम येथिल गोडवा या मराठमोळ्या फुड सेंटरचे राजेश व गितांजली शिंदे त्यांच्या उल्लेखनिय कामगिरी बद्द्ल पुरस्कार स्विकारताना


४. यशस्वी होण्यासाठी माणसाकडे बरेच गुणधर्म असणे गरजेचे आहे, परंतु त्यातल्या त्या तीन सर्वात महत्वाचे गुणधर्म...

- सकारात्मक विचारः नेहमी चांगला विचार करणे. नकारात्मक विचार व भावना आपल्याला कृती करण्यापासुन दुर ठेवतात. आपण सदैव प्रयत्न केला पाहीजे कि आपण चांगला व सकारात्मक विचार करत आहोत.

- ध्येय: आपल्याकडे एक ध्येय असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याला अनुसरुन नेहमी काही ना काही कृती करत राहीले पाहीजे. निरनिराळ्या प्रकारचे प्रयत्न करत राहीले पाहीजे. प्रत्येक प्रयत्नाला यश मिळेलचं असं नाही! परंतु सातत्याने (Consistency) व कल्पना शक्तिचा (Innovation) वापर करुन आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रवास कायम ठेवला पाहीजे.

- 'आय कॅन' म्हणजेच मी हे करु शकतो: आपल्याकडे कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी आत्मविश्वास असणे अत्यंत गरजेचे आहे. जगात अशक्य असे काहीच नाही. आत्मविश्वासाशिवाय यशस्वी होणे मात्र अशक्य आहे!

५. आपण आपल्या आयुष्यभरामध्ये जर काही कमवतो तर ती म्हणजे माणसं. माणसं जोडायला आपण शिकलं पाहीजे. उत्तुंग यश मिळविणे हे काही एकट्या दुकट्याचे काम नाही. त्यासाठी भरपुर माणसांची साथ आपल्याला मिळणे आवश्यक आहे.

६. कोणत्याही उद्योजकाकडे रिस्क टेकिंग अ‍ॅबिलीटी (Risk Taking Ability) असणे अत्यंत गरजेचे आहे. जर उद्योजकाने रिस्क घेणे थांबविले तर, त्याची प्रगती होणे कठीण होउन बसते.

७. उद्योजकाच्या औद्योगिक विकासासाठी त्याने त्याच्या संस्थेमध्ये यंत्रणा (System) निर्माण करण्यावर भर दिला पाहीजे व ऑर्गनाझेशनल डेव्हलपमेंट (Organizational Development) करण्यावर भर दिला पाहीजे. व्यवसायाचे भव्य स्वप्न (Vision) पाहीले पाहीजे.

८. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ज्यांना आपला प्रवास यशस्वी करायाचा आहे त्यांनी सुध्दा आधी ठरवले पाहीजे कि आपल्याला कोणत्या पातळी पर्यंत पोहोचायचे आहे. वाट्टेल तेवढे कष्ट करुन तिकडे पोहोचण्याचा अतोनात प्रयत्न केला पाहीजे. मग यश हमखास मिळेलच.


मित्रांनो, माझ्यासाठी श्री. देवस्थळी सरांची मुलाखत घेणे, अतिशय Challenging होते. माझ्यामते माझ्या प्रयत्नांना थोड्याफार प्रमाणात का होईना, नक्कीच यश मिळाले. त्याचे संपूर्ण श्रेय बॉर्न टू विन ची टिम व आमच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना जाते!

आपणा सर्वांचे मनापासुन आभार.

धन्यवाद!

आपला विश्वासु
अतुल राजोळी
बॉर्न टू विन

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites