LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

11 July 2012

तंत्रज्ञान आणि सृजनशीलता

अनघा दिघे - सोमवार, २३ जानेवारी  २०१२ (LOKSATTA)
व्यापारामधील सृजनशीलता राखण्यासाठी जगभरात सोनी उद्योगसमूह विख्यात आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांमध्ये स्वतंत्र ठसा उमटवलेल्या या बहुराष्ट्रीय उद्योगसमूहाचे - सोनी कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक आणि विख्यात उद्योजक अकियो मोरिता असं म्हणायचे की, चुकांमुळे कचरत जाऊ नका, परंतु तीच तीच चूक तुम्ही परत करत नाही ना, याची मात्र खबरदारी घ्या. कुठलीही समस्या ही तंत्रज्ञानाच्या आधारे सोडवता येते, यावर त्यांचा दृढ विश्वास होता. सोनीचे कर्ताकरविता म्हणून ते सुपरिचित होते आणि राहतीलही. हल्लीच्या जमान्यातील टेक्नॉलॉजिकल जायंटच्या - सोनीच्या यशस्वी वाटचालीमागे अकियो मोरिता यांचा भव्य उद्योजकीय दृष्टिकोन होता आणि आहे. जगरहाटीनं स्वीकारलेल्या नेहमीच्याच मार्केटिंग संकल्पना त्यांनी बदलल्या. ब्रँडची ओळख आणि ब्रँड आयडेंटिटी तसंच ब्रँड - विश्वसनीयता या गोष्टी रुजवून मोरिता यांनी या गोष्टी व्यापाराचे बलस्थान असल्याचे दाखवून दिले. ‘अत्यंत विकसित आणि उत्तम दर्जाचे तंत्रज्ञान देणारा उद्योग या अढळ पदावर जपानी तंत्रज्ञानाला तसेच सोनी उद्योगाला नेण्यामध्ये मोरिता यांचे भरीव योगदान आहे.

व्यापारामध्ये सृजनशीलता आणणे म्हणजेच अशा कल्पना कार्यान्वित करणे की, ज्यामुळे कंपनीला थक लाभ होऊन ती ठोस पावले टाकत पुढे जाईल. ही किमया अकियो मोरिता यांनी साधली होती. पठडीतले विचार सोडून किंवा चाकोरी मोडून विचार करणारा उद्योजक ही अकियो मोरिता यांची नेमकी ओळख आहे. २६ जानेवारी या अकियो मोरिता यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या विचारांचे केलेले हे सिंहावलोकन.. त्यांचे अभिजात आणि प्रेरणादायी विचार हे आजही सयुक्तिक ठरतात हीच त्यांच्या महानतेची खूणगाठ आहे.
व्यापारातील सृजनशीलता
विज्ञान हा तंत्रज्ञानाचा पर्याय असू शकत नाही, तसेच अभिनव नवनिर्मितीचे तंत्रज्ञान हा पर्याय ठरत नाही. दुसर्‍या शब्दांत मांडायचे तर, केवळ टेक्नोलॉजी आहे, म्हणून नवनिर्मिती बाजूला ठेवून देता येत नाही. नवनिर्माण क्षमता ही व्यवसाय - उद्योगांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. लंडन येथील रॉयल सोसायटीमध्ये १९९२ सालामध्ये दिलेल्या मोरिता यांच्या भाषणाचे शीर्षकच मुळी अशा आशयाचे होते- (S [Science] does not equal T [Technology] and T does not equal I [Innovation].) मोरिता यांच्या दृष्टिकोनातून, र्‍याखुर्‍या सृजनशीलतेची कास धरायची तर केवळइनोव्हेटिव्ह तंत्रज्ञान जवळ बाळगणे पुरेसे नाही.’ खराखुरा अभिनव नवनिर्माण हा तीन सूत्रांनी प्रत्यक्षात आणला जातो, असे मोरिता यांना ठामपणे वाटत असे. या सूत्रांचा उल्लेखथ्री क्रिएटिव्हिटीज असा ते करीत असत. मोरिता यांनी दिलेल्या याथ्री क्रिएटिव्हिटीज पुढीलप्रमाणे आहेत-
. तंत्रज्ञानातील नवनिर्माण (Creativity in Technology)
उत्पादन आयोजनातील नवनिर्माण (Creativity in Product Planning)
. विक्री तसेच प्रचारातील सृजनशीलता (Creativity in Marketing)
अभिनव नवनिर्मिती ही आधीपासूनच उपस्थित असणार्‍या घटकांचे मिश्रण असते. सर्वसामान्य मतप्रवाहाच्या विरुद्ध जाऊन अकियो मोरिता असे ठामपणे मांडतात की, अंतस्फूर्त प्रज्ञेने तंत्रज्ञानाचा सृजनशीलतेने वापर करूनच - उद्योजकांना यश प्राप्त होते. कितीही उत्कृष्ट असले तरी एकटे, एकाकी तंत्रज्ञान हे विकले जात नाही.
बरेचजण हे ओळखत नाहीत, मात्र उत्पादन आयोजनातील सृजनशीलतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘प्रॉडक्ट प्लानिंग मधील सृजनशीलता एवढी महत्त्वाची आहे की, उपयुक्त, आकर्षक आणि युझर - फ्रेन्डली उत्पादन जर तुम्ही निर्माण करू शकला नाहीत तर.. सर्व आयाम जमेस धरूनही ते तंत्रज्ञान तुमच्या दिमतीला उभे राहू शकत नाही. आणि अशा र्‍हेने किती नावीन्यपूर्ण तसेच अलौकिकरीत्या तुम्ही उत्पादन काढू शकता, याचा विचार आवश्यक आहे,’ असे मोरिता सांगतात.
नवनिर्माण हा उद्योगाकडे पाहण्याचासिक्थ सेन्स असतो. मोरिता यांचे असे निरीक्षण आहे की, व्हिडीयो टेप तंत्रज्ञान हे बाजारपेठेत सर्वप्रथम १९६५ सालामध्ये आले. परंतु होम व्हिडीओ मार्केट निर्माण होण्यासाठी १९७५ साल उजाडावे लागले. यालाच मी इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट प्लानिंग असं म्हणेन. व्हिडीओची टेप रीळमधून बाहेर काढून सुटसुटीत बेटामॅक्स कॅसेटमध्ये घालून घरगुती वापरासाठी सादर केली गेली. असं नवीन देण्यासोबतच त्याच्या प्रचार आणि मार्केटिंगमधील नवता ही देखील डावलता येणार नाही. तुमच्यापाशी महान तंत्रज्ञान आहे आणि उत्कृष्ट उत्पादनही आहे, परंतु तेवढंच पुरेसं होत नाही. तुमच्या उत्पादनाचं स्वागत करण्यासाठी बाजारपेठेमध्ये त्याचा पुरेसा गवगवा झाला पाहिजे. ग्राहकाला त्यांची विस्तृत माहिती दिली गेली पाहिजे.’ सोनीच्या इतिहासातील एक नामी उदाहरण आपला मुद्दा पटवण्यासाठी मोरिता देतात. हावॉकमनचा किस्सा आहे. अनेक लोकांनी जगभर एक अभिनव चमत्कार असे वॉकमनचे कौतुक केले; पण त्यात तंत्रज्ञानाचे काय नावीन्य आहे? (वॉकमनचे सगळे पार्ट्स किंवा घटक-उपघटक हे तर आधीपासूनच उपलब्ध होते.)
सांगायचं असं, तर वॉकमनच्या निर्मितीमध्ये मलाचा दगड ठरावं असं कुठलंही ब्रेक-थ्रू तंत्रज्ञान नव्हतं. त्याचं यश हे उत्पादन आयोजनातील नवनिर्माण आणि विक्री तसेच प्रचारातील सर्जनशीलतेवर आधारलेलं होतं.’ असं मोरितांचं म्हणणं.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबरच उद्योगाचा गाभा ध्यानात येणं, ग्राहकाची नस पकडणं या दिशेनं प्रयास व्हावे लागतात. बिझनेस - आकलनामध्ये केलेल्या प्रगतीवर एक यशस्वी उद्योजक घडत असतो.

22 June 2012

एक स्वप्नपूर्ती सोहळा

नमस्कार! मित्रांनो आपणास कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की, २७ मे रोजीचा फ्युचर पाठशाला जोश २०१२ कार्यक्रम अतिशय जोशात पार पडला. एकूण अडीच हजार पेक्षा जास्त उपस्थितांच्या उस्फुर्त प्रतिसाद जवळ जवळ २०० विद्यार्थ्यांनी आपले धमाकेदार कार्यक्रम सादर केले. 
फ्युचर पाठशाला जोश २०१२ कार्यक्रमात बॉर्न टू विन चे संचालक अतुल राजोळी यांचे  पहिले  पुस्तक 'माझा मोटिव्हेटर मित्र' हे पुस्तक प्रकाशित झाले. ह्या पुस्तकाला देखील वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे व पुस्तक प्रकाशन झाल्या पासून १००० पेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत . पुस्तक प्रकाशनाचे झी २४ तास वाहिनी ने केलेले प्रक्षेपण आपण खाली पाहू शकता.


फ्युचर पाठशाला जोश २०१२ ची काही क्षणचित्रे:












मित्रांनो बॉर्न टू विनच्या फ्युचर पाठशाला २०१२ या धमाकेदार कार्यक्रमानंतर बॉर्न टू विन आपल्या समोर घेऊन येत आहे THE SUCCESS BLUEPRINT WORKSHOP. 
हो मित्रांनो, दिनांक  ४ जुलै २०१२ रोजी दादर, प्रभादेवी येथील  रवींद्र नाट्य मंदिर येथे दुपारी ३ ते रात्री ९:३० वाजे पर्यंत हा जबरदस्त, प्रेरणादायी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते असणार आहेत,  बॉर्न टू विन संचालक  तुल राजोळी.

या कार्यक्रमाचा प्रेरणादायी विडीयो पहा:


या कार्यशाळेची माहीती खालिल प्रमाणे आहे:

आपल्याला आयुष्यात जे हवे आहे ते मिळवा!

एक अद्वितीय कार्यशाळा

आरोग्य, ऐश्वर्य, यश आणि आनंद प्राप्तीसाठी... 


यशस्वी होण्यासाठी आवश्यक सूत्रे सहा तासांच्या कार्यशाळेमध्ये जाणून घ्या व आपल्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन आणा!

सहा तासांचा प्रेरणादायी कार्यक्रम जो आपल्याला कमीतकमी परिश्रमांमध्ये व कालावधीमध्ये जास्तीतजास्त्त यश मिळविण्यास मदत करेल.

या कार्यशाळेमध्ये अतुल राजोळी त्यांच्या खास शैलीत आपल्या आयुष्यात अमुलाग्र असे बदल घडवून आणण्यासाठी अतिशय प्रभावशाली अशी तंत्र व मंत्र शिकवतील. ज्यांच्या मदतीने आपण आपल्या आयुष्यात सर्व उद्दिष्टे साध्य करुन, उत्तुंग यशप्राप्ती करु शकाल व परिणाम स्वरुपी आपल्या आयुष्याचा दर्जा निश्र्चितच उंचावेल.

अतुल राजोळी यांनी खास या कार्यशाळेसाठी अतिशय चोखंदळपणे काही शक्तिशाली तत्वे निवडलेली आहेत जी आपल्याला आपल्या भावी जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन, परिणामकारक निर्णय क्षमता व प्रखर उर्जा निर्माण करेल. या तत्त्वांच्या मदतीने आपण आपल्या ध्येयांच्या दिशेने वेगवान प्रगती कराल.

ही सर्व पायाभूत तत्त्वे असून कोणत्याही वयाच्या व्यक्तिला आपले वैयक्तिक, व्यावसायिक अथवा शैक्षणिक ध्येय साध्य करण्यासाठी मार्गदर्शक ठरतील. तसेच, ही सर्व तत्त्वे नैसर्गिक आहेत व कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तिसाठी अतिमहत्त्वाची अशी आहेत.

वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, व्यावसायिक उद्दिष्टे किंवा शैक्षणिक प्रगती... तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी व तुम्हाला जे हवे ते साध्य करण्यासाठी हा कार्यक्रम नक्कीच मदत करेल.

या कार्यशाळेमध्ये आपण काय शिकाल?
-----------------------------------------------------------------------------------------
हमखास यशाचा फॉर्म्युला
-----------------------------------------------------------------------------------------
आपल्याला जे हवे आहे ते कसे मिळवावे?
-----------------------------------------------------------------------------------------
आपल्याकडील अगाध सामर्थ्य
-----------------------------------------------------------------------------------------
यश आकर्षित करण्याचे अदभुत रहस्य
-----------------------------------------------------------------------------------------
आपल्या कृतीवर ताबा ठेवणारी अविश्वसनिय ताकद
-----------------------------------------------------------------------------------------
यशाची गुरुकिल्ली
-----------------------------------------------------------------------------------------

दिनांक : बुधवार, ४ जुलै २०१२

वेळ : दुपारी ठिक ३:०० वाजता

स्थळ : रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर (प.)

गुंतवणुक : रुपये १२००/-, १०००/- , ८००/- व ५००/-


प्रवेशिका मिळविण्यासाठी संपर्क : ०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९

21 May 2012

फ्युचर पाठशाला जोश २०१२

नमस्कार!
मित्रांनो, आपल्या कळवण्यास बॉर्न टू विनची संपूर्ण टिम अत्यानंदीत होत आहे की आम्ही आमच्या टिमचं स्वप्नं येत्या २७ मे रोजी साकार करत आहोत. हो मित्रांनो, २७ मे २०१२ रोजी फ्युचर पाठशाला जोश २०१२ कार्यक्रम अतिशय धुमधडाक्यात आम्ही साजरा करणार आहोत. हा कार्यक्रम भारतातील सर्वात मोठं सभागृह ते म्हणजे षणमुखानंद सभागृह, सायन येथे पार पाडणार आहे व या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण असणार आहे फ्युचर पाठशालाच्या आमच्या फ्युचर स्टार्सचे उत्साहवर्धक व अर्थपुर्ण असे परफॉर्मन्सेस! आता पर्यंत पार पडलेल्या फ्युचर पाठशालाच्या प्रत्येक जोश कार्यक्रमामध्ये फ्युचर स्टार्सचे अद्वितीय परफॉर्मन्स इतके भन्नाट पध्दतीने सादर केले आहेत की उपस्थित प्रेक्षक अक्षरशः थक्क होतात. फ्युचर पाठशाला जोश २०१२ हा आतापर्यंतचा सर्वात जबरदस्त आणि धमाकेदार पध्दतीने साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला आपण कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहीलंच पाहीजे!

मित्रांनो, या वर्षी बॉर्न टू विन तर्फे फ्युचर पाठशाला कार्यक्रम मुंबईभरात निरनिराळ्या ठीकाणी राबवण्यात आले. फ्युचर पाठशालाच्या उत्साही प्रशिक्षकांनी, रिव्हुवर्सनी व सह-प्रशिक्षकांनी आपली कामगिरी चोखपणे बजावत फ्युचर पाठशालाच्या विविध केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक परिवर्तन घडवून आणले. या वर्षी जवळजवळ ३०० नवीन फ्युचर स्टार्स फ्युचर पाठशालाने घडवले. मुंबईभरात समाधानकारक पध्दतीने या वर्षी फ्युचर पाठशालाचे सर्व वर्ग पार पाडले. आमचे फ्युचर स्टार्स आत्मविश्वासाने पेटून उठले आहेत, त्यांना त्यांच्या सुप्त शक्तींची आता जाणिव झाली आहे, त्यांची ध्येय आता ठरली आहेत आणि भविष्यात उत्तुंग यश मिळवण्यासाठी आता ते सज्ज झाले आहेत. जर आपल्याला त्यांचा जोश प्रत्यक्षात पहायचा आणि अनुभवायचा असेल तर २७ मे २०१२ रोजी सकाळी १० वाजता षणमुखानंद सभागृहामध्ये नक्की या!
यंदाचा जोश २०१२ कार्यक्रम भव्यदिव्य तर असणारच आहे परंतु त्याच बरोबर आणखी एक विशेष गोष्ट या कार्यक्रमामध्ये होणार आहे, ती म्हणजे बॉर्न टू विनचे संचालक अतुल राजोळी यांचे पहिले पुस्तक 'माझा मोटिव्हेटर मित्र' चे प्रकाशन. हो मित्रांनो! आपण ज्या पुस्तकाची आतुरतेने वाट पाहत होतात, ते आता लवकरच आपल्या भेटीला येत आहे! नावा प्रमाणेच हे पुस्तक प्रेरणादायी असणार आहे व यशप्राप्तीचे ५० मैत्रीपूर्ण कानमंत्र देणार आहे. अशा या आगळ्यावेगळ्या पुस्तकाचे प्रकाशन प्रत्यक्षात पाहण्याची सुवर्ण संधी आपल्या समोर आहे!

फ्युचर पाठशाला जोश २०१२ चे वारे सध्या सगळी कडे वाहत आहेत. झी २४ तास वाहिनी या कार्यक्रमाचे मिडीया पार्टनर असणार आहे! बॉर्न टू विनचे सर्व आजी-माजी प्रशिक्षणार्थी या कार्यक्रमाची आधीपासुनच वाट पाहत आहेत, गेल्या चार वर्षाचे फ्युचर पाठशालाचे विद्यार्थी आमचे फ्युचर स्टार्स या कार्यक्रमाची आस लावून बसले आहेत. मित्रांनो, आता फक्त काही दिवस उरले आहेत.






मित्रांनो, बॉर्न टू विनच्या या स्वप्नपूर्ती सोहळ्याला असाल अशी नम्र विनंती!

- टिम बॉर्न टू विन



09 May 2012

अकरावा लक्ष्यसिध्दी सोहळा: 'ब्रँड गुरु'

नमस्कार!
आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की या उन्हाळी सुट्टी दरम्यान "फ्युचर पाठशाला" जो एक विद्यार्थी विकास प्रशिक्षणक्रम आहे, तो एकूण १४ शाखांद्वारे राबविण्यात येत आहे. माटुंगा, मुलुंड, दादर, अंधेरी (पुर्व), अंधेरी (पश्चिम), जोगेश्वरी, वसई, विक्रोळी, डोंबिवली, पनवेल, कल्याण, मालाड, कांदिवली आणि पुणे इथे हा प्रशिक्षणक्रम १४ ते २४ वयोगटातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे.
त्याच प्रमाणे "लक्ष्यवेध अ‍ॅडवान्स" ह्या एका वर्षाच्या उद्योजकता विकास कार्यक्रमाची तिसरी बॅच देखील नुकतीच सुरू झाली आहे.
लक्ष्यवेधची अकरावी बॅच अतिशय उस्फूर्तपणे पार पडली! ३ जुन पासून लक्ष्यवेधची बारावी बॅच देखील सूरु होत आहे.

आणि आता सगळे आजी-माजी प्रशिक्षणार्थी वाट पाहत आहेत ते ११व्या लक्ष्यसिद्धी सोहळ्याची! मित्रांनो आगामी लक्ष्यसिद्धी सोहळा पार पडणार आहे १० मे २०१२ रोजी, सांयकाळी ६.३० वाजता वीर सावरकर सभाग्रुह, शिवाजी पार्क, दादर येथे.
नेहमीप्रमाणे या वेळेसही लक्ष्यसिद्धी सोह्ळ्याचे प्रमुख आकर्षण असणार आहेत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक! ११व्या लक्षसिद्धी सोह्ळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत प्रख्यात अ‍ॅड व ब्रँड गुरु श्री. गोपी  कुकडे !
"ब्रँड गुरु" या त्यांच्या लाइव्ह मुलाखतीद्वारे आपल्याला त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे आणि त्यांची मुलाखत घेणार आहेत बॉर्न टू विन संस्थेचे संस्थापक व सचांलक श्री. अतुल राजोळी. या मुलाखती द्वारे आपल्याला अ‍ॅडवर्टायझींग व ब्रँन्डींग-संदर्भात त्यांचाकडून सखोल मार्गदर्शन तर मिळेलच शिवाय अ‍ॅडवर्टायझींग क्षेञातल्या त्यांच्या प्रवासाबद्द्ल देखिल ते सांगणार आहेत.
मला माहितच आहे की ही संधी तुम्ही कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही! तर मग भेटूया १० मे रोजी ६.३० वाजता, वीर सावरकर सभाग्रुह येथे.....

Indian Advertising Industry चे दिग्गज व्यक्तिमत्व  श्री. गोपी  कुकडे  सर यांच्याबद्दलः

Creative Talent मुळे त्यांना खुप वेळा Communication Art Guide आणि Advertising Club Award  यांच्यासारखे वेगवेगळे पूरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला गेला आहे. त्याच बरोबर त्यांना Sir J. J. Institute of
Applied Art या नामांकीत College मधून गोल्ड मेडल मिळालं आहे. तसेच Onida TV च्या "Neighbour's Envy & Owner's Pride" या आणि अशा अनेक कॅच-लाइन्स चे जनक त्यांना मानले जाते आणि विविध नामांकित अशा Advertising Agencies बरोबर Associate होउन त्यांनी १९८२ मध्ये त्यांच्या करियरची सुरुवात केली, तसेच  Advertising Institute मध्ये सोळा वर्षांचा त्यांचा दांडगा अनुभव आहे.

अकरावा लक्ष्यसिध्दी सोहळा:
विषय: ब्रँड गुरु
दिनांक: १० मे २०१२
स्थळः वीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क जवळ, दादर(प.)
प्रवेश विनामुल्य
संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९
 

10 April 2012

पुस्तका बाहेरील जग दाखवणारी शाळा


जन्माला आलेलं प्रत्येक मुल हे लिओनार्दो दा विंची अथवा आईनस्टाईन यांच्या इतकेच प्रभावशाली असते. आपणास कदाचीत अविश्वसनिय वाटेल परंतु ही गोष्ट संशोधनाअंती सिद्ध झाली आहे. आपली चुकिची शिक्षणपद्धती, चाकोरीबद्ध विचारशैली त्याच्या वाढीच्या प्राथमिक वर्षात त्याचे केवळ खच्चीकरण करीत असते.





"सारी उम्र हम, मरमरके जी लिये;
एक पल तो अब हमें जीने दो.. जीने दो!
Give me some sunshine, give me some rain!
Give me another chance wanna grow up once again!"

गाजलेल्या 'थ्री इडीयटस्' चित्रपटातील हे गाणं पाहताना आजच्या युवा पिढीच्या दयनीय अवस्थेला अनूभवून जीव कासाविस होतो. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांवर असलेले प्रचंड दडपण, पालकांच्या अपेक्षा, जीवघेणी स्पर्धा, गोंधळात टाकणारी अ‍ॅडमिशन पध्दत, शैक्षणिक संस्थांचे व्यावसायिकीकरण व भविष्याबाबतची अनिश्चितता असे आजचे विदारक चित्र युवा पिढीसमोर खुप मोठे प्रश्नचिंन्ह निर्माण करते. कोवळ्या वयामध्ये ह्या सर्व बाबींना तोंड देण्यासाठी आजची युवा पिढी खरोखरच मानसिक व बौधिकरित्या तेवढी सक्षम आहे का? बहूतेक नाही. गेल्या काही वर्षातील विद्यार्थ्यांमधील आत्महत्येचे प्रमाण लक्षात घेता हे आपण मान्य केलेच पाहीजे. खास करुन दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे व परीक्षेचे एवढे जबरदस्त दडपण निर्माण होते कि ह्या मुलांचे संपुर्ण भविष्य त्यांनी परिक्षेत मिळविलेल्या मार्कांवरच अवलंबुन असते हे गृहीतच धरण्यात येते. ज्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी भविष्यामध्ये आपले करियर करणार आहे त्याचा निर्णय हा सर्वस्वी त्याने परीक्षेत मिळविलेल्या मार्कांवरच अवलंबून असतो. विद्यार्थ्याची कोणत्या क्षेत्रात आवड आहे? विद्यार्थ्याकडे कोणत्या विषयात योग्यता व कौशल्ये आहेत? त्याची भविष्याबद्दलची संकल्पना काय आहे? विद्यार्थ्याला काय बनायला आवडेल? ह्या प्रश्नांचा बहूतांशपणे विचार केला जात नाही. आपल्या मुलाने किंवा मुलीने डॉक्टर अथवा इंजिनीयर झालं पाहीजे असा बहूतांश पालकांचा आग्रह असतो. हे कितपत योग्य आहे? खरेतर विद्यार्थ्याला सुध्दा त्याचा स्वतःचा कल कोणत्या क्षेत्रात आहे हे कोवळ्या वयात सांगणे कठीणच असते, त्याचे कारण म्हणजे माहीतीचा व कौशल्य प्रदान शिक्षणाचा अभाव. रट्टा मारुन कोणत्या क्षेत्रात आपल्याला रस आहे हे कसे कळणार?
हे सगळं आपण पाहत आहोत, अनुभवत आहोत, आणि दुर्दैव हे कि आपण सगळे कळत-नकळत या चुकिच्या यंत्रणेचे भाग झालेलो आहोत. आज आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आक्रमक व आमुलाग्र अश्या बदलांची गरज आहे. आपल्याला आपल्या भावी पिढीला मानसिक व बौधिकरित्या सबळ बनवायचे असेल तर पुस्तकी ज्ञानाला व मार्कांना महत्त्व न देता त्यांची कौशल्ये व प्रवृत्ती या दोन महत्त्वाच्या अंगांवर काम करणे गरजेचे आहे. परंतु दुर्दैवाने ७५% पेक्षा जास्त शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना कौशल्य प्रदान शिक्षण जाणिवपुर्वकरित्या पुरवत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची आवड-निवड कळणे कठीण असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात करियर निवडण्याबाबतचा गोंधळ नेहमीच जाणवतो.
आजच्या युवा पिढीची ही गरज लक्षात घेता बॉर्न टू विन ने चार वर्षापुर्वीच फ्युचर पाठशाला ही कार्यशाळा राबवायला सुरुवात केली. उन्हाळी सुट्टीदरम्यान विद्यार्थ्यांना फ्युचर पाठशालाच्या कार्यशाळेद्वारे त्यांचे ध्येय ठरविण्यास मदत करणे, त्यांच्यातील सुप्त शक्तिचा ठाव घेण्यास मदत करणे, त्यांच्यात प्रवृत्तीमय बदल घडवून आणणे व आवश्यक तत्वांचे व कौशल्यांचे परिणामकारक प्रशिक्षण देणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख हेतु. फ्युचर पाठशाला प्रशिक्षणक्रमाद्वारे आत्तापर्यंत मुंबईभरातुन १५०० पेक्षा जास्त विद्यार्थी प्रशिक्षित झाले असुन ह्या उन्हाळी सुट्टीमध्ये देखिल ही कार्यशाळा  मुंबईमध्ये दादर, माटुंगा, अंधेरी, जोगेश्वरीमालाड, कांदिवली, मुलुंड, डोंबिवली, कल्याण, विक्रोळी, पनवेल, उल्हास नगर व पुण्यामध्येसुध्दा राबवण्यात येणार आहे. 
अधिक माहीतीकरिता संपर्कः 9619465689, 7666426654, 022-22939375/6/7/8,
वेबसाईटः http://www.born2win.in/
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites