लक्ष्यवेधः ध्येयनिश्चिती ते ध्येयपूर्ती ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

23 November 2009

लक्ष्यवेधः ध्येयनिश्चिती ते ध्येयपूर्ती

लक्ष्यवेधः ध्येयनिश्चिती ते ध्येयपूर्ती



आज जगात संधींचा तुटवडा नाही. आजच्याइतकं संधींनी भरलेलं जग पुर्वी कधीच नव्हतं एखाद्या व्यक्तीकडे कार्यक्षमता असेल व यशस्वी होण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर ती व्यक्ती भविष्यात नक्कीच यश मिळवू शकेल. जगातील अर्थव्यवस्थेमध्ये व व्यक्तीच्या वैयक्तीक आयुष्यात चढ्-उतार हे होतच असतात, परंतु आपण ज्या युगात प्रवेश करत आहोत ते पुर्वीच्या युगांपेक्षा कितीतरी पटीने जास्तं सुख समृधींनी भरलेले आहे. तज्ञांचं असं म्हणणं आहे की पुढील काही वर्षांमध्ये भारतातील श्रीमंत माणसांचे प्रमाण झपाट्याने वाढणार आहे. यामध्ये प्रमुख समावेश असेल तो आजच्या सर्वसामान्य माणसांचा. आज ज्या व्यक्ती सर्वसामान्य माणसांच्या वर्गामध्ये गणली जातात, या वर्गामधील निश्चयी माणसे स्वतःचे भाग्य या संधींनी भरलेल्या युगामध्ये नक्की बदलु शकतात. सर्वसामान्य माणसांना जर या संधीचा स्वतःसाठी फायदा करुन घ्यायचा असेल तर त्यासाठी विशिष्ट तत्वे, कौशल्ये व प्रवृत्ती त्यांनी आत्मसात करणे आवश्यक आहे. गरज आहे ती फक्त एका स्पष्ट व आव्हानात्मक लक्ष्याची. हो लक्ष्य!



याच संधीचा विचार करुन बॉर्न टू विन ही संस्था घेउन येत आहे, लक्ष्यवेध, अकरा आठवड्यांचा एक असा प्रवास जो तुम्हाला तुमचे लक्ष्य ठरविण्यासच नव्हे, तर ते साध्य देखिल करण्यास प्रभावशाली मार्गदर्शन करेल. ज्या मध्ये लक्ष्य साध्य करण्यास उपयोगी असणार्‍या तत्वांचे, कौशल्यांचे व प्रवृत्तीचे परिणामकारक प्रशिक्षण दिले जाते. लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाचे दर आठवड्याला दोन तासाचे एक सत्रं, अशी एकूण ११ सत्रे घेण्यात येतात. प्रत्येक सत्रात शिकवलेली तत्वे व कौशल्ये आत्मसात करण्यासाठी प्रशिक्षणार्थींना कृतीमय गृहपाठ दिला जातो, ज्यामध्ये अत्याधुनिक तंत्रांचा समावेश असतो. गृहपाठ पुर्ण करण्यासाठी फॉलो-अप दिला जातो. लक्ष्यवेध या कार्यक्रमातील विषय पुढील प्रमाणे आहेत, ध्येयनिश्चिती, ध्येयसिध्दीचा सिध्दांत, गो-गेटर प्रवृत्ती, टाईम मॅनेजमेंट, कॉल फॉर चेंज, मानवी स्नेहसंबंध, गो-गीवर प्रवृत्ती इ. लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रम हा दोन भागांमध्ये विभागलेला असुन, प्रशिक्षणक्रमातील पुर्वार्धात प्रशिक्षणार्थी त्याचं लक्ष्य ठरवतो व ते साध्य करण्यासाठी आराखडा तयार करतो, व प्रशिक्षणक्रमातील उत्तरार्धात प्रशिक्षणार्थी त्याच्या दुरगामी लक्ष्याशी निगडीत एक आव्हानात्म्क लक्ष्य एका महीन्यात साध्य करण्यास पेटून उठतो. लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाच्या ११ आठवड्याच्या प्रवासात प्रशिक्षणार्थी लक्ष्यसिध्दीच्या सहा महत्वाच्या पायर्‍या पार करतो.


लक्ष्यसिध्दीच्या सहा महत्वाच्या पायर्‍या:



लक्ष्यवेध कार्यक्रमाचे प्रशिक्षक श्री. अतुल राजोळी आहेत. अतुल स्वतः कंप्युटर इंजिनीयर असुन, प्रशिक्षण क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत आहेत. ते सर्टीफाइड एन. एल. पी. प्रॅक्टीशनर व हिप्नो-थेरेपीस्ट आहेत. तसेच ते प्रशिक्षीत माइंड व मेमरी प्रशिक्षक सुध्दा आहेत. त्यांची बेधडक व मनोरंजक संभाषण शैली त्यांच्या कार्यक्रमाची खास वैशिष्टे.

लक्ष्यवेधच्या सेमिनारला मुंबईत उदंड प्रतिसाद मिळत आहे. लक्ष्यवेध कार्यक्रम आपणास कसा फायदेशीर ठरु शकेल हे जाणुन घेण्यासाठी लक्ष्यवेधच्या फ्रि सेमिनारला जरुर उपस्थित रहा. पुढील सेमिनार कधी आहे हे जाणुन घेण्यासाठी संपर्क साधा: 22939377/78, 9869120130, 9821898171.
वेब साईटः http://www.born2win.in/





लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाच्या प्रशिक्षणार्थ्यांचे मनोगतः
















No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites