LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

26 July 2013

अध्ययनाची दशसूत्री

अध्ययनाची दशसूत्री
सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
स्टीव्हन रुडॉल्फ लिखित १० लॉज् ऑफ लर्निंगया पुस्तकाचा अनुवाद अलीकडेच अमेय प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आला. या पुस्तकातील लेखकाच्या मनोगताचा संपादित अंश.
प्रत्येक पालकाला आपल्या मुलाचे चांगले व्हावे, असेच वाटत असते. त्याची मुले आनंदी, स्वस्थ व गुणी असावीत अशीच इच्छा असते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी सर्वच क्षेत्रात यशस्वी व्हावे असे वाटत असते; पण मुलांना लहानाचे मोठे करताना बरेचदा अवघड परिस्थितीला तोंड द्यावे लागते. वेगवेगळे मार्ग शोधताना कधी कधी निराशा वाटायला लागते. मुलाला अभ्यासासाठी कसे प्रेरित करावे किंवा दोन भावंडांची भांडणे कशी सोडवावीत, हे समजेनासे होते.
बरेचदा पालक स्वत:च्या लहानपणीच्या गोष्टी, अनुभव आठवायचे प्रयत्न करतात; पण त्याचबरोबर बदलत्या काळामुळे गोंधळून जातात. जर मी सतत कॉम्प्युटरवर चॅटिंग करत राहिलो असतो तर माझ्या आईवडिलांनी काय केले असते? माझ्या आईवडिलांच्या मुलांना वाढवायच्या पद्धती या कॉम्प्युटर, मोबाइल, टी.व्ही. व जंक फूडच्या जमान्यात योग्य ठरल्या असत्या का, हाही प्रश्न पडतोच. अशा वेळेस बऱ्याचदा पालक मदतीसाठी स्वत:च इंटरनेटकडे वळतात. बरेचदा त्यांना उत्तरे मिळतात; पण ती अर्धवट, गुंतागुंतीची, संदिग्ध व व्यक्तिनिरपेक्ष असतात आणि जेव्हा बाजारात खरेदीला गेल्यावर मुले रस्त्यातच एखादी वस्तू हवी, म्हणून हट्ट करतात, भोकांड पसरून रडायला, ओरडायला लागतात तेव्हा इतर कोणाचे सल्ले घेण्याइतका त्यांच्याकडे वेळ असतो कुठे?
त्यामुळेच हल्ली पालकांना खरी जरुरी असते, ती साध्या सोप्या नियमांच्या संचाची, जे प्रत्येक कठीण प्रसंगी त्यांना मार्गदर्शक ठरतील. ते नियम आठवायला सोपे आणि अंतर्मनातून येणारेसुद्धा हवेत; पण त्याचबरोबर या नियमांची व्याप्ती एवढी पाहिजे की एखाद्या सात वर्षांच्या उत्साही मुलापासून गोंधळलेल्या १५ वर्षांच्या मुलांपर्यंत सर्वाना लागू पडतील.
मुले, पालक, शिक्षकांमध्ये वावरण्याचा आणि शिक्षण क्षेत्रात दोन दशकांपेक्षा जास्त कामाचा अनुभव घेतल्यावर व प्राचीन वेदांपासून ते आधुनिक न्युरो सायन्सपर्यंत सर्व पुस्तके व लेखांचा अभ्यास केल्यावर मी असे दहा नियम/ तत्त्वे तयार केली, ज्याला मी शिकण्याचे दहा नियमम्हणतो. पुरातन काळापासून चालत आलेली तत्त्वे, नियम या सर्वातूनच काही गोष्टी निवडून, ज्या काळाच्या चाचणीवर खऱ्या ठरल्या आहेत, ज्या समजायला सोप्या आहेत, पटकन आचरणात आणण्याजोग्या आहेत. मला खात्री आहे की एकदा हे समजून घेतले की, प्रत्येक वेळेस कठीण प्रसंगात तुम्ही सहजपणे ते वापरू शकाल.
शिक्षणाचे दहा नियम
१. मुलांना स्वत:विषयी काळजी घ्यायला शिकवा.
२. मुलांना स्वत:वर पूर्ण विश्वास ठेवायला शिकवा.
३. मुलांना जिज्ञासू शोधक बनवा.
४. मुलांना आयुष्यात ध्येय, उद्देश ठरवायला शिकवा.
५. मुलांना योजना बनवायला शिकवा.
६. मुलांना खेळाचे नियम शिकवा.
७. मुलांना प्रत्यक्ष कृती करायला, सराव करायला शिकवा.
८. मुलांना खेळायला शिकवा.
९. मुलांना व्यवहारज्ञान शिकवा.
१०. मुलांना नेहमी विजेत्यासारखे वागायला शिकवा.
जर आपण या नियमांकडे बारकाईने पाहिले तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की, या सर्व नियमांमध्ये एक परस्परसंबंध आहे. एकातूनच दुसरा नियम निर्माण होत जातो. त्यात एक तर्कशुद्ध क्रम आहे. उदा. सर्वप्रथम मुलांना स्वत:ची काळजी करायला/ घ्यायला शिकवा, मग त्यांना स्वत:वर विश्वास ठेवायला शिकवा, मग जिज्ञासू बनवा व आयुष्यात ध्येय ठरवायला शिकवा वगैरे. पण त्यात एक नॉन लिनियर रिलेशनशिप आहे, जसे खेळात असताना स्वत:ची काळजी घ्यायला शिका किंवा ज्ञान मिळवाल, तेव्हा स्वत:वर विश्वास ठेवायला शिका वगैरे. वरचा तक्ता या सर्व दहा नियमांमधील संबंध दाखवतो.
तुम्हीच तुमच्या मुलाचे पहिले गुरू
पालक म्हणून तुम्हीच तुमच्या मुलाचे पहिले गुरू, प्रशिक्षक आहात.
आणि एक प्रशिक्षक म्हणून तुम्ही :
तुमच्या खेळाडूंना नीट ओळखाल तेव्हाच तुम्ही त्यांच्यातल्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देऊ शकाल.
* जबाबदारी व सहनशीलता शिकवा.
* नि:पक्षपाती बना.
* परिस्थितीवर अवलंबून योग्य तसे कणखर किंवा मृदू बना.
* त्यांच्या यश किंवा अपयश दोन्हीची अंशत: तरी जबाबदारी घ्या.

दहा नियमांचे पालन
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, हे दहा नियम ही एक जीवनशैली आहे. एका वेळी सगळे नियम उपयोगात आणण्याऐवजी जे आत्ताच्या समस्येशी संबंधित आहेत, तेच उपयोगात आणावेत व हळूहळू बाकीच्या नियमांकडे वळावे.
एकदा माझ्या मित्राने मला सांगितले की, त्याच्या पाच वर्षांच्या मुलाच्या वर्तन समस्येसाठी त्याने पालकांसाठीचे एक पुस्तक विकत घेतले व वरचेवर त्यातील काही गोष्टींबद्दल स्वत:च्या बायकोशी तो चर्चा करायचा, पण त्याच्या हे लक्षात आले नाही की त्याचा मुलगा हे सर्व लक्ष देऊन ऐकतो आहे. एक दिवस मुलाने येऊन कॉम्प्युटर बंद करून टाकला. जेव्हा त्याने असे का केले असे विचारले तेव्हा मुलाने उत्तर दिले की, मी आता तुम्हाला माझ्याशी कसे वागायचे ते शिकवणार आहे. तेव्हा ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, मुलांना सर्व समजत असते. त्यामुळे त्यांच्याशी या नियमांची चर्चा जरूर करावी.
हल्ली टी.व्ही., इंटरनेटमुळे मुले खूप हुशार झाली आहेत. त्यांना सगळ्या गोष्टी बरोबर कळतात. जेव्हा पालक स्वत:च गोंधळलेल्या मन:स्थितीत असतात, पण मुलांना मात्र कोणत्याही गोष्टी तर्कशुद्ध कारणाशिवाय शिकवायचा प्रयत्न करतात तेव्हा मुलांना आवडत नाही. त्यामुळेच जीवनशैलीला अनुसरून केलेला सारासार व सुसंगत विचार व अनुभव यातूनच सुजाण पालक निर्माण होईल यात शंकाच नाही.
शेवटी, जेव्हा तुम्ही हे नियम उपयोगात आणाल, तेव्हा ते अमलात आणायचे नवनवीन उपाय तुमच्या मुलाच्या आवडीनिवडी, गुणदोष लक्षात घेऊन योजलेत तर त्याचा जास्त फायदा होईल आणि जर तुमच्या कल्पनेतून तुम्ही अशी एखादी पद्धत शोधलीत की ती खूपच प्रभावी आहे तर जरूर ती खालील वेबसाइटवर कळवा, सर्वानाच त्याचा फायदा होऊ शकेल.

Source:

13 July 2013

चुकांमधून शिकणे महत्त्वाचे

चुकांमधून शिकणे महत्त्वाचे
प्रशांत दांडेकर, सोमवार, २७ ऑगस्ट २०१२, लोकसत्ता
अल्बर्ट आइनस्टाइन यांचे प्रसिद्ध वचन आहे- जो माणूस आयुष्यात मी एकदाही चुकलो नाही असे म्हणतो तेव्हा अवश्य समजा की, त्याने आयुष्यात काहीही नवीन करण्याचा धोका पत्करलेला नाही.हे वाक्यच अधोरेखित करते की, मनुष्यप्राणी हा चुका करणारच. तेव्हा चुकांबद्दलचा दृष्टिकोन सुदृढ ठेवल्यास आपणही करिअरमध्ये यशस्वी व लोकप्रिय होऊ शकतो. आज आपण पाहणार आहोत चुकांचे व्यवस्थापन.


*   सर्वप्रथम म्हणजे चुकणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे, हे लक्षात असू द्या. चुकीबद्दल न्यूनगंड बाळगू नका. चुकेल या भीतीने नवीन काहीतरी करायला घाबरू नका.
*   आपण करीत असलेल्या चुकांची नोंद ठेवा. त्यातून योग्य तो धडा शिका. चुकीतून न शिकणे हीच फक्त मोठी चूक असते, बाकी सर्व चुका म्हणजे आपले प्रामाणिक प्रयत्न असतात एखादी नवीन गोष्ट आत्मसात करण्यासाठीचे.
*   आपण चुकला असाल तर खोटे बोलू नका, चूक लपवू नका. कारण सत्य कधी ना कधी बाहेर येतेच. दुसरे म्हणजे, चूक लपविली गेली तर त्यातून होणारे विचारमंथन, चूक होण्याची कारणे समजणे, चुका निस्तरायचे उपाय यातले काहीही साध्य होत नाही.
*   आपल्या हातून चूक घडल्यास त्वरित तसे कबूल करावे. याचे फायदे म्हणजे, त्यावरील उपायही तातडीने योजले जातात. ती चूक, चूकच राहते व त्याचे अक्राळविक्राळ प्रॉब्लेममध्ये रूपांतर होण्याचे टळते.
*   आपल्या चुकीचे खापर इतरांवर फोडण्याची घोडचूक करू नका. त्यामुळे इतरांशी आपले संबंध कायमचे दुरावतात.
*   चूक केली असेल तर त्याचे परिणामही भोगावयास तयार राहा. चूक मान्य करण्यासठी लागणारे खुले व विशाल मन ही यशस्वी माणसाची ओळख असते.
*   चूक आपल्याकडून झाली असल्यामुळे योग्य व्यक्तीकडे त्याबद्दल माफी मागण्यात कमीपणा समजू नये. जॉन मॅक्सवेलचे विवेचन खूप अर्थपूर्ण आहे. त्याच्यानुसार माणसाचे मन चूक कबूल करण्याएवढे विशाल असावे, मेंदू चुकांमधून शिकण्याएवढा तल्लख असावा तर निश्चय चुका सुधारण्याचा असावा.
*   पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने इतरांच्या चुकांमधून शिकावे. तीच चूक आपण करू नये.

आपल्या चुकांवर लोक फक्त हसतील, टिंगलटवाळी करतील असे न समजता इतरजण आपल्याला चूक दुरुस्त करण्यास मदत देतील, यावरही विश्वास ठेवावा.
*  चूक घडल्यावरही ताठ मानेने उभे राहा. परत उभारी घ्या. आत्मविश्वासाला तडा जाऊ देऊ नका. नेहमी लक्षात ठेवा, मनुष्य हा यशापेक्षा चुकांमधून जास्त शिकतो.
*   कधीकधी चूकही एवढी क्षणार्धात होते की काय, कसे घडले हे कळतच नाही. तेव्हा शक्य असल्यास मुद्दामहून अशी चूक परत करावी, पण तेव्हा आपली निरीक्षणशक्ती पणाला लावून चुकीचे खरे कारण शोधावे. 
*   कधी कधी चूक झाल्यावर, आपली गाठ अत्यंत आक्रमक व्यक्तीशी पडते. ती व्यक्ती शिवराळ भाषेत किंवा शारीरिक इजा पोहोचवून आपल्यास अपमानित करू शकते. अशावेळी एखाद्या मध्यस्थामार्फत दिलगिरी व्यक्त करून शक्यतो त्या अवघड परिस्थितीमधून बाहेर पडावे.
*    कधी कधी चुकांमधूनच नवीन शोध लागतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोलंबसने भारताऐवजी अमेरिकेचा लावलेला शोध. तेव्हा तात्पर्य काय, तर परफेक्टशनिस्ट होण्याचा अट्टहास टाळा. भरपूर चुका करा आणि भरपूर शिका. इतरांच्या चुकांना माफ करा व त्या चुकांपासून अर्थबोध घ्या. प्रयोगशील मानवाची निशाणी असलेली चूक, तिला आपला गुरू माना.

18 June 2013

सुसज्ज व्हा यशस्वी व्हा! - GET READY TO GET SUCCESS

नमस्कार मित्रांनो
आपणा सर्वांस कळविण्यात खूप आनंद होतोय कि, बॉर्न टू विन आपणा सर्वासाठी दुसर्‍यांदा सुसज्ज व्हा यशस्वी व्हा हि कार्यशाळा घेऊन येत आहे. गेल्या वर्षी २८ नोवेंबर ला झालेली हि कार्यशाळा आपल्या सर्वांना खूप आवडली आणि म्हणूनच लोकाग्रहास्तव आपण हि  दुसर्‍यांदा  घेऊन येत आहोत. आणि या वेळेस हि तब्बल ६ तासांची असणार आहे.
या वेळेस आणखी काही नवीन गोष्टी यात आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.


बॉर्न टू विन प्रस्तुत सहा तासांची जबरदस्त प्रेरणादायी कार्यशाळा
यशस्वी माणसांमध्ये असे नेमके कोणते गुणधर्म असतात जे त्यांनी मिळवलेल्या यशासाठी कारणीभुत असतात? जाणुन घ्या आणि उत्तुंग यश मिळवण्यासाठी स्वत:ला घडवा... सुसज्ज व्हा, यशस्वी व्हा!


मित्रांनो, आपल्यापैकी बर्‍याच व्यक्तींना यशस्वी माणसांबद्दल प्रश्न पडतात...
  • यशस्वी माणसांमध्ये असे नेमके काय असते, ज्यामुळे ते यश संपादन करतात?
  • सर्व यशस्वी माणसांमध्ये कोणत्या गोष्टी समान असतात?
  • इतरांवर सकारात्मक प्रभाव पाडण्याची क्षमता त्यांच्यात येते कूठून?
  • इतरांपेक्षा काय वेगळेपण त्यांच्यात असते?
  • आपली स्वप्नं साकार करण्याच्या दिशेने सातत्याने कॄती करण्यास त्यांना कूठून प्रेरणा मिळते?
  • आपल्या क्षमतांचा पुरेपुर वापर ते कोणत्या गुणांमुळे करतात?


हि कार्यशाळा कोणासाठी?
  • उद्योजक किंवा प्रोफेशनल्स
  • स्वयंरोजगारकर्ते किंवा नोकरदार
  • गृहीणी किंवा विद्यार्थी
  • लिडर किंवा मॅनेजर
दिनांक: बुधवार, ३ जुलै २०१३

वेळ: दुपारी ३ वाजता

स्थळ: स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प)  

गुंतवणुक रु.: १२००/-, १०००/-, ८००/-, ६००/-

प्रवेशिका मिळविण्यासाठी संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ९६१९४६५६८९, ७६६६४२६६५४

02 June 2013

सांगता सोहळा फ्युचर पाठशाला जोश २०१३

नमस्कार!
मित्रांनो संपूर्ण बॉर्न टू विन च्या टीमला आपणांस  कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि, या वर्षीचा फ्युचर पाठशाला जोश २०१३ भारतातील सर्वात मोठ्या सभागृहात, म्हणजेच षण्मुखानंद, सायन येथे २६ मे २०१३ ला सकाळी १० ते २ च्या दरम्यान दणक्यात पार पडला. या वर्षी आपण दुसऱ्यांदा फ्युचर पाठशाला जोश हा कार्यक्रम षण्मुखानंद येथे साजरा केला. गेल्या वर्षी म्हणजेच २७ मे  २०१२ ला पहिल्यांदा इथेच आपला स्वप्नपूर्ती सोहळा पार पडला होता. या वर्षी मुंबई व मुंबई बाहेर २० वेग- वेगळ्या ठिकाणी फ्युचर पाठशाला चे वर्ग पार पडले व ५४० पेक्षा जास्त फ्युचर स्टार्स घडविले. फ्युचर पाठशालाच्या उत्साही प्रशिक्षकांनी, रिव्हुवर्सनी व सह-प्रशिक्षकांनी आपली कामगिरी चोखपणे बजावत फ्युचर पाठशालाच्या विविध केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले. हे सगळे फ्युचर स्टार्स उत्साहाने व आत्मविश्वासाने पेटून उठले होते. आणि त्यांनी त्यांचा हाच आत्मविश्वास व जोश तिथे सादर केला.


कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण म्हणजे; बॉर्न टू विनचे संचालक श्री अतुल राजोळी यांचे सुपर हिट व गेले एक वर्ष सातत्याने बेस्ट सेलर च्या यादीत असणारे पुस्तक 'माझा मोटिव्हेटर मित्र' याच्या तिसऱ्या आवृत्तीच  प्रकाशन व पहिल्याच आवृत्तीपासून याच पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीची जोरदार मागणी होती, म्हणूनच लोकाग्रहास्तव याच्याच इंग्रजीच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकशन केले. मराठी वाचक वर्गाचे मन जिंकणारे हे पुस्तक आता इतर भाषिकांची मने जिंकण्यास सज्ज झाले आहे. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते माननीय श्री मधुकरजी तळवलकर सर (Executive Chairman, Talwalkars Better Value Fitness Ltd.). ज्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. उपस्थितांना सरानकडून  खूपच छान मार्गदर्शन मिळाले. सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील आपल्या सर्व फ्युचर स्टार्सनी उत्साहवर्धक व अर्थपूर्ण परफॉर्मन्सेस सादर केले. कार्यक्रमास जवळ-जवळ तीन हजार मंडळी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे मिडीया पार्टनर होते झी २४ तास. 
कार्यक्रमास फ्युचर पाठशाला चे आजी-माजी विद्यार्थी तसेच त्यांचे पालकहि उपस्थित होते. तसेच लक्ष्यवेध, लक्ष्यवेध Advance, NLP, Graphology च्या प्रशिक्षणार्थ्यांनी देखील हजेरी लावली व सगळ्या फ्युचर स्टार्सच्या उत्साहात ते हि भारावून गेले.

कार्यक्रमास आलेला प्रत्येक व्यक्ती स्वतः बरोबर एक उर्जा व उत्साह तसेच जगण्याची एक नवी दिशा घेऊन गेला. 
या कार्यक्रमाची काही क्षण चित्रे









खास तुमच्यासाठी झी २४ तास ने घेतलेला फ्युचर पाठशाला जोश २०१३ चा आढावा. 

05 May 2013

फ्युचर पाठशाला जोश २०१३

नमस्कार!
मित्रांनो, दर वर्षी प्रमाणे उन्हाळी सुट्टीमध्ये बॉर्न टू विन तर्फे राबविण्यात येणारा 'फ्युचर पाठशाला' हा विद्यार्थी विकास प्रशिक्षणक्रम अगदी दणदणीतरित्या पार पाडत आहे. यंदा एप्रिल व मे २०१३ दरम्यान मुंबई व मुंबईबाहेर २० पेक्षा जास्त ठिकाणी फ्युचर पाठशाला कार्यशाळा राबवण्यात येत आहेत.


फ्युचर पाठशाला कार्यशाळेचा समारोप समारंभ व आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम म्हणजे 'फ्युचर पाठशाला जोश २०१३', दिनांक २६ मे २०१३ या दिवशी, षण्मुखानंद सभागृह, सायन येथे आयोजित करण्यात आला आहे. ह्या अदभुत कार्यक्रमामध्ये फ्युचर पाठशालाचे ५०० पेक्षा अधिक फ्युचर स्टार्स जगण्याची दिशा देणारे निरनिराळे परफॉर्मन्स आत्मविश्वासाने सादर करतील. फ्युचर पाठशालाचा जोश अनुभवण्याची सुवर्ण संधी आपल्याला या कार्यक्रमामध्ये मिळणार आहे.



यंदाचा जोश २०१३ कार्यक्रम भव्यदिव्य तर असणारच आहे परंतु त्याच बरोबर बॉर्न टू विनचे संचालक अतुल राजोळी यांच्या 'माझा मोटिव्हेटर मित्र' या सुप्रसिध्द पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित होणार असुन, वाचकांच्या विशेष आग्रहाखातर ह्याच पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती 'My Motivator Mitra' ह्याच कार्यक्रमामध्ये प्रकाशित होणार आहे.


फ्युचर पाठशाला जोश २०१३ चे वारे सध्या सगळीकडे वाहत आहेत. झी २४ तास वाहिनी या कार्यक्रमाचे मिडीया पार्टनर असणार आहे! बॉर्न टू विनचे सर्व आजी-माजी प्रशिक्षणार्थी या कार्यक्रमाची आधीपासुनच वाट पाहत आहेत, गेल्या पाच वर्षाचे फ्युचर पाठशालाचे विद्यार्थी आमचे फ्युचर स्टार्स या कार्यक्रमाची आस लावून बसले आहेत. मित्रांनो, आता फक्त काही दिवस उरले आहेत. आपल्या बॉर्न टू विनच्या संपुर्ण परिवारासाठी हा कार्यक्रम एक विशेष अनुभव असणार आहे.



मित्रांनो, बॉर्न टू विनच्या या आगळ्या-वेगळ्या सोहळ्याला उपस्थित असाल अशी नम्र विनंती!

- टिम बॉर्न टू विन

फ्युचर पाठशाला जोश २०१३

दिनांक: रविवार, २६ मे २०१३

वेळ: सकाळी ठिक १०:०० वाजता

स्थळः षण्मुखानंद सभागृह, सायन (पु.)

प्रवेश विनामुल्य

संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९


फ्युचर पाठशाला जोश २०१२ ची काही क्षणचित्रे:






Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites