आठवा लक्ष्यसिध्दी सोहळा: 'एक अविश्वसनिय गोष्ट... विश्वासाची!' ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

23 August 2011

आठवा लक्ष्यसिध्दी सोहळा: 'एक अविश्वसनिय गोष्ट... विश्वासाची!'

नमस्कार!
मित्रांनो टिम बॉर्न टू विन तर्फे सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दीक शुभेच्छा. आपणास सांगण्यास अत्यंत आनंद होतोय कि बॉर्न टू विन तर्फे राबविण्यात येणार्‍या सर्व प्रशिक्षणक्रमांना दणद्णीत प्रतिसाद मिळत आहे. बॉर्न टू विन च्या Graphology या नवीन उपक्रमाला खुप छान प्रतिसाद मिळाला व त्याच प्रमाणे NLP ची तिसरी बॅच देखिल मोठ्या दिमाखात पार पडली. NLP व Graphology सारख्या आधुनिक व कमी प्रचलित असलेल्या विषयांना मिळत असलेली दाद पाहून, एवढे आपण नक्कीच म्हटले पाहीजे कि आज मुंबईमध्ये अश्या प्रकारच्या उपक्रमांची प्रचंड गरज आहे.

सध्या लक्ष्यवेधची आठवी बॅच आपल्या अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. लक्ष्यवेधच्या आठव्या बॅचच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना व लक्ष्यवेधींना आता वेध लागले आहे ते म्हणजे आठव्या लक्ष्यसिध्दी सोहळ्याचे...!

हो मित्रांनो, नेहमी प्रमाणे आपण यंदाचा लक्ष्यसिध्दी सोहळा मोठया दणक्यात पार पाडणार आहोत. लक्ष्यसिध्दी सोहळा म्हणजे लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाचा पदवीदान समारंभ व लक्ष्यवेधच्या आजी-माजी प्रशिक्षणार्थ्यांचा स्नेहमेळावा. प्रत्येक लक्ष्यवेधच्या स्नेहमेळाव्याचे प्रमुख आकर्षण असते, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व त्यांचे मार्गदर्शन. आता पर्यंत श्री. नितीन पोतदार, श्री. वाय. एम. देवस्थळी, श्री. मधुकर तळवलकर व डॉ. उदय निरगुडकर यांसारखे दिग्गज लक्ष्यसिध्दी सोहळ्यामध्ये आपणास प्रमुख पाहूणे म्हणुन लाभले आहेत. यंदाच्या म्हणजेच आठव्या लक्ष्यसिध्दी सोहळ्यामध्ये प्रमुख पाहूणे व मार्गदर्शक असणार आहेत, दास ऑफ शोअर इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमीटेडचे, व्यवस्थापकिय संचालक, श्री. अशो़क खाडे.

मित्रांनो श्री. अशो़क खाडे हे भारतातील उद्योग क्षेत्रातील एक असाधारण व्यक्ति आहेत. त्यांच्या बद्दल सांगायचे म्हणजे.. त्यांनी अक्षरशः शुन्यातुन कोटयावधींचे विश्व उभारले. श्री. खाडे यांचे बालपण सांगली जिल्ह्यातील पेड या गावात गेले. घरात वीज नाही, पुरेस अन्न नाही. असं असुन देखिल अशोकजी फार हुशार होते. अशोकजींना पाच भावंडे होती. घरात शिजवायचे काय हा प्रश्न रोजच आ वासुन उभा असायचा. उपाशी पोटी रहाणे काय असतं ते त्यांनी चांगले अनुभवले होते. त्यांच्या लहानपणीचे अनुभव अंगावर शहारे आणणारे आहेत. इतक्या बिकट परिस्थितीमध्ये त्यांचे बालपण गेले असले तरी उद्योजकतेचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले. आज ते एक यशस्वी उद्योजक म्हणुन देश विदेशात गाजत आहेत. श्री. अशो़क खाडे यांचा अत्यंत गरिबी पासुन ते मुंबईतील 'दास ऑफ शोअर इंजिनीअरिंग' या नावाजलेल्या फॅब्रिकेशन कंपनीचे नेतृत्त्व करण्यापर्यंतचा प्रवास अतिशय खडतर व प्रेरणादायी आहे. त्यांच्या ह्या प्रवासाची स्फुर्तीदायक कहाणी ते स्वतः आपल्याला आठव्या लक्ष्यसिध्दी सोहळ्यामध्ये उपस्थित प्रेक्षकांना सांगणार आहेत. त्यांच्या भाषणाचा विषय आहे 'एक अविश्वसनिय गोष्ट... विश्वासाची!'


इतक्या जबरद्स्त व्यक्तिमत्त्वाला भेटण्याची व ऐकण्याची संधी अजिबात गमवु नका. दिनांक २६ ऑगस्ट २०११ रोजी संध्याकाळी ठिक ६:३० वाजता, कर्नाटक संघ हॉल, माटूंगा (प.) येथे आपला आठवा लक्ष्यसिध्दी सोहळा पार पडणार आहे. कार्यक्रमाबद्दल आणखी माहीती हवी असल्यास बॉर्न टू विनच्या कार्यालयात आपण संपर्क साधू शकता: ०२२-२२९३९३७५/७६/७७/७८



आठवा लक्ष्यसिध्दी सोहळा

विषय: 'एक अविश्वसनिय गोष्ट... विश्वासाची!':
दिनांक: २६ ऑगस्ट २०११
स्थळ: कर्नाटक संघ हॉल, माटूंगा (प.)
वेळ: संध्याकाळी ठिक ६:३० वाजता
प्रवेश विनामुल्य


No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites