प्रभावी नेतृत्व - अतुल राजोळी ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

15 July 2015

प्रभावी नेतृत्व - अतुल राजोळी

नमस्कार उद्योजक मित्रांनो! एक आदर्श व उत्कृष्ट व्यवसायाची निर्मिती करण्यासाठी आपल्याला एक प्रभावी लिडर बनणे गरजेचे आहे. व्यवसायिक संघटनेला यशस्वी होण्यासाठी योग्य दिशा दाखवणारा, व त्या दिशेने निर्भिडपणे वाटचाल करणार्‍या लिडरची अत्यंत गरज असते. कोणत्याही यशस्वी व्यवसायाचा जर आपण अभ्यास केलात तर असे लक्षात येईल की व्यवसाय यशस्वी करण्यामागे त्या व्यवसायाच्या संचालकाने लिडरची भूमिका प्रभावीपणे पार पाडली. इंन्फोसिस या कंपनीने आय.टी. क्षेत्रातील जगात आपले स्थान निर्माण करणार्‍या भारतीय कंपनीचे संस्थापक व संचालक श्री. नारायण मुर्ती यांनी उत्कृष्ट नेतृत्वाव्दारे कंपनीची प्रगती केली. जनरल इलेक्ट्रीक या कंपनीचे माजी सी.ई.ओ. जॅक वेल्च यांनी General Electric ला आपल्या जबरदस्त लिडरशिपने दिशा दाखवली. आपल्या व्यवसायाची दुरगामी ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याव्दारे व्यवसायाला एक उत्कृष्ट नेतृत्व प्राप्त होणे आवश्यक आहे.

मित्रांनो माझं असं ठाम मत आहे, की उद्योजक आपल्या व्यवसायाअंतर्गत सर्व कामे डेलिगेट करु शकतो परंतु नेतृत्वाचं कार्य उद्योजक डेलिगेट करु शकत नाही. आपण 'लगान' हा आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झालेला चित्रपट पाहिला असेलच या चित्रपटामध्ये, स्वातंत्रपुर्वीच्या काळामध्ये एका लहान गावातील सर्वसाधारण गावकरी इंग्रज अधिकार्‍यांबरोबर क्रिकेटचा सामना जिंकतात व संपुर्ण प्रांताचा कर माफ करुन घेतात. माझ्यामते प्रत्येक उद्योजकाला या चित्रपटातून नेतृत्वाचे धडे गिरवले पाहिजेत. मला आवडलेली एक लिडरशिपची व्याख्या, 'लिडरशिप' म्हणजे साधारण माणसांकडून असाधारण कामगिरी करवून घेण्याची क्षमता असणे. 'लगान' चित्रपटात जी माणसं इंग्रजांविरुध्द क्रिकेट खेळतात ती आधी कधीच क्रिकेट खेळलेली नसतात परंतु चित्रपटाचा नायक व त्यांच्या संघाचा कर्णधार भुवन त्यांच्याकडून ही असाधारण कामगिरी करवून घेण्याचा प्रताप करतो. लघुउद्योजकांनी आपल्या व्यवसायाअंतर्गत कर्मचार्‍यांकडून असाधारण कामगिरी करवून घेण्यासाठी स्वतःमध्ये नेतृत्व गुण आत्मसात केले पाहिजेत.

या लेखाद्वारे मी आपल्याला स्वतःमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे. मी आपल्याला प्रभावी लिडरच्या ७ सवयींबद्दल सांगणार आहे. आपण जर या ७ सवयी स्वत:ला लावल्यात तर मी ठामपणे सांगु शकतो की आपण एक प्रभावी लिडर व्हाल व आपल्या टिमची कामगिरी उंचावेल.

प्रभावी लिडरच्या ७ सवयी :
१) कामाला कारणाची जोड देणे : प्रत्येक व्यक्तीला अर्थपुर्ण जीवन जगायची इच्छा असते. जेव्हा व्यक्तीला रोज सकाळी उठण्याचे कारण मिळते तो प्रेरीत होऊन काम करतो. जगण्याला उद्देश प्राप्त होणे गरजेचे आहे. प्रभावी लिडर आपल्या व्यवसायाचा 'पायाभूत उद्देश' आपल्या कर्मचार्‍यांच्या मनात बनवतो मग कर्मचारी कामाकडे  कष्टाच्या स्वरुपात पाहत नाहीत. त्यांना त्यामधून आनंद प्राप्त होतो. कोणत्याही व्यक्तीला आपण काहीतरी असाधारण कार्य करत आहोत याची जाणीव त्याच्यातील सर्वोत्कृष्ट कामगिरी बाहेर काढण्यासाठी निश्चितच कारणीभुत ठरते. आपल्या कर्मचार्‍यांना त्यांच्या कामगिरीमागील मोठे कारण दाखवा. जेवढा 'का'? मोठा, तेवढी काम करण्यासाठी जास्त प्रेरणा त्यांना मिळते. मोठी प्रेरणा आपण महत्त्वाचं योगदान करत आहोत या भावनेने मिळते.
२) उत्कृष्ट स्नेहसंबंध जोपासणे : प्रभावी लिडर आपल्या टिमबरोबर उत्कृष्ट स्नेहसंबंध प्रस्थापित करतो. आपल्या टिम बरोबर उत्कृष्ट स्नेहसंबंध प्रस्थापित करण्यासाठी तो विशेष प्रयत्न करतो. आपल्या टिमबरोबर उत्कृष्ट स्नेहसंबंध प्रस्थापित केल्यामुळे तो आपल्या टिमचा विश्वास जिंकतो. त्यांच्या भावना, अपेक्षा व अडचणी समजून घेतो. प्रभावी लिडर आपल्या टिमला जेव्हा गरज पडेल तेव्हा आधार देतो. आपल्या टिमला दिलेला शब्द पाळण्यासाठी तो वचनबध्द असतो. आपल्या संघटनेअंतर्गत विश्वास निर्माण करण्यासाठी पारदर्शकता ठेवतो. संघटनेअंतर्गत कर्मचार्‍यांना खात्री असते की आपल्या लिडरला आपल्याबद्दल प्रचंड काळजी आहे. त्यामुळे ते त्याच्याशी व संघटनेशी एकनिष्ठ होतात. 
३) उत्कृष्ट संघबांधणी करणे : प्रभावी लिडर हा एक उत्कृष्ट प्रशिक्षक देखिल असतो. आपल्या कर्मचार्‍यांना तो उच्च कामगिरीसाठी मार्गदर्शन करतो. आपल्या कर्मचार्‍यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल त्याचं तो कौतुक करतो. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना विशेष पुरस्कार किंवा बक्षिस देतो. कर्मचार्‍यांच्या प्रत्येक छोट्या व चांगल्या कामगिरीसाठी तो शाबासकी देतो. कोणत्याही व्यक्तीला त्या ठिकाणी त्याने केलेल्या कामाची कदर होते अश्याच ठिकाणी काम करायला आवडते.
४) सतत सुधारणा करणे : आपल्या व्यवसायाअंतर्गत चांगले व नवीन बदल घडवून आणण्यासाठी प्रभावी लिडर नेहमी पुढाकार घेतो. जगात होणार्‍या वेगवान बदलाला यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी प्रभावी लिडर आपल्या संघटने अंतर्गत कर्मचार्‍यांची कार्यक्षमता विकसित करण्यावर भर देतो. काम करणाच्या पध्दतीमध्ये बदल घडवून आणतो.
५) वेळेचे नियोजन करणे : प्रभावी लिडर त्याच्या वेळेचे नियोजन काटेकोरपणे करतो. व्यवसायासाठी महत्त्वाच्या गोष्टींना तो प्राधान्य देतो. प्लानिंगवर भर देतो. विचार मंथन करतो. त्यामुळे तो संतुलित जीवन जगतो. व्यवसायाची प्रगती त्याच्या नियंत्रणात होते.
६) स्वतःचे नेतृत्व करणे : प्रभावी लिडर नेहमी स्वतःला योग्य दिशा देण्यासाठी अपडेटेड ठेवतो. स्वतःसाठी वेळ देतो. स्वतःला प्रफुल्लीत ठेवण्यासाठी जाणिवपुर्वकरित्या कृती करतो. स्वतःचे ज्ञान व कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न करतो. ज्यामुळे संघटनेला योग्य दिशा देण्यासाठी तो मानसिक, भावनिक व बौधिकी सक्षम राहतो. 
७) नवीन कल्पना व नवनिर्मितीला प्रोत्साहन देणे :  प्रभावी लिडरला माहीती असतं की प्रगती करण्याचा राजमार्ग असतो की नवनवीन प्रयोग करत राहणे, चुकांमधुम शिकणे व नवनिर्मितीला चालना देणे. प्रभावी लिडर जोखिम घेण्यास घाबरत नाही. आपल्या कर्मचार्‍यांनासुद्धा नवीन काहीतरी करण्याचे स्वातंत्र देतो. कार्यस्थळामध्ये कल्पकतेला प्रोत्साहन देतो.





मित्रांनो प्रभावी लिडरच्या ७ सवयी मी आपल्याला फार थोडक्यात सांगितल्या आहेत. माझ्या उद्योजकीय नेतृत्व विकास कार्यशाळांमध्ये हाच विषय मी सखोलपणे शिकवतो.
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in


'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा. http://goo.gl/uNdKBy

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites