LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

18 June 2013

सुसज्ज व्हा यशस्वी व्हा! - GET READY TO GET SUCCESS

नमस्कार मित्रांनो
आपणा सर्वांस कळविण्यात खूप आनंद होतोय कि, बॉर्न टू विन आपणा सर्वासाठी दुसर्‍यांदा सुसज्ज व्हा यशस्वी व्हा हि कार्यशाळा घेऊन येत आहे. गेल्या वर्षी २८ नोवेंबर ला झालेली हि कार्यशाळा आपल्या सर्वांना खूप आवडली आणि म्हणूनच लोकाग्रहास्तव आपण हि  दुसर्‍यांदा  घेऊन येत आहोत. आणि या वेळेस हि तब्बल ६ तासांची असणार आहे.
या वेळेस आणखी काही नवीन गोष्टी यात आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.


बॉर्न टू विन प्रस्तुत सहा तासांची जबरदस्त प्रेरणादायी कार्यशाळा
यशस्वी माणसांमध्ये असे नेमके कोणते गुणधर्म असतात जे त्यांनी मिळवलेल्या यशासाठी कारणीभुत असतात? जाणुन घ्या आणि उत्तुंग यश मिळवण्यासाठी स्वत:ला घडवा... सुसज्ज व्हा, यशस्वी व्हा!


मित्रांनो, आपल्यापैकी बर्‍याच व्यक्तींना यशस्वी माणसांबद्दल प्रश्न पडतात...
  • यशस्वी माणसांमध्ये असे नेमके काय असते, ज्यामुळे ते यश संपादन करतात?
  • सर्व यशस्वी माणसांमध्ये कोणत्या गोष्टी समान असतात?
  • इतरांवर सकारात्मक प्रभाव पाडण्याची क्षमता त्यांच्यात येते कूठून?
  • इतरांपेक्षा काय वेगळेपण त्यांच्यात असते?
  • आपली स्वप्नं साकार करण्याच्या दिशेने सातत्याने कॄती करण्यास त्यांना कूठून प्रेरणा मिळते?
  • आपल्या क्षमतांचा पुरेपुर वापर ते कोणत्या गुणांमुळे करतात?


हि कार्यशाळा कोणासाठी?
  • उद्योजक किंवा प्रोफेशनल्स
  • स्वयंरोजगारकर्ते किंवा नोकरदार
  • गृहीणी किंवा विद्यार्थी
  • लिडर किंवा मॅनेजर
दिनांक: बुधवार, ३ जुलै २०१३

वेळ: दुपारी ३ वाजता

स्थळ: स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प)  

गुंतवणुक रु.: १२००/-, १०००/-, ८००/-, ६००/-

प्रवेशिका मिळविण्यासाठी संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ९६१९४६५६८९, ७६६६४२६६५४

02 June 2013

सांगता सोहळा फ्युचर पाठशाला जोश २०१३

नमस्कार!
मित्रांनो संपूर्ण बॉर्न टू विन च्या टीमला आपणांस  कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि, या वर्षीचा फ्युचर पाठशाला जोश २०१३ भारतातील सर्वात मोठ्या सभागृहात, म्हणजेच षण्मुखानंद, सायन येथे २६ मे २०१३ ला सकाळी १० ते २ च्या दरम्यान दणक्यात पार पडला. या वर्षी आपण दुसऱ्यांदा फ्युचर पाठशाला जोश हा कार्यक्रम षण्मुखानंद येथे साजरा केला. गेल्या वर्षी म्हणजेच २७ मे  २०१२ ला पहिल्यांदा इथेच आपला स्वप्नपूर्ती सोहळा पार पडला होता. या वर्षी मुंबई व मुंबई बाहेर २० वेग- वेगळ्या ठिकाणी फ्युचर पाठशाला चे वर्ग पार पडले व ५४० पेक्षा जास्त फ्युचर स्टार्स घडविले. फ्युचर पाठशालाच्या उत्साही प्रशिक्षकांनी, रिव्हुवर्सनी व सह-प्रशिक्षकांनी आपली कामगिरी चोखपणे बजावत फ्युचर पाठशालाच्या विविध केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले. हे सगळे फ्युचर स्टार्स उत्साहाने व आत्मविश्वासाने पेटून उठले होते. आणि त्यांनी त्यांचा हाच आत्मविश्वास व जोश तिथे सादर केला.


कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण म्हणजे; बॉर्न टू विनचे संचालक श्री अतुल राजोळी यांचे सुपर हिट व गेले एक वर्ष सातत्याने बेस्ट सेलर च्या यादीत असणारे पुस्तक 'माझा मोटिव्हेटर मित्र' याच्या तिसऱ्या आवृत्तीच  प्रकाशन व पहिल्याच आवृत्तीपासून याच पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीची जोरदार मागणी होती, म्हणूनच लोकाग्रहास्तव याच्याच इंग्रजीच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकशन केले. मराठी वाचक वर्गाचे मन जिंकणारे हे पुस्तक आता इतर भाषिकांची मने जिंकण्यास सज्ज झाले आहे. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते माननीय श्री मधुकरजी तळवलकर सर (Executive Chairman, Talwalkars Better Value Fitness Ltd.). ज्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. उपस्थितांना सरानकडून  खूपच छान मार्गदर्शन मिळाले. सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील आपल्या सर्व फ्युचर स्टार्सनी उत्साहवर्धक व अर्थपूर्ण परफॉर्मन्सेस सादर केले. कार्यक्रमास जवळ-जवळ तीन हजार मंडळी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे मिडीया पार्टनर होते झी २४ तास. 
कार्यक्रमास फ्युचर पाठशाला चे आजी-माजी विद्यार्थी तसेच त्यांचे पालकहि उपस्थित होते. तसेच लक्ष्यवेध, लक्ष्यवेध Advance, NLP, Graphology च्या प्रशिक्षणार्थ्यांनी देखील हजेरी लावली व सगळ्या फ्युचर स्टार्सच्या उत्साहात ते हि भारावून गेले.

कार्यक्रमास आलेला प्रत्येक व्यक्ती स्वतः बरोबर एक उर्जा व उत्साह तसेच जगण्याची एक नवी दिशा घेऊन गेला. 
या कार्यक्रमाची काही क्षण चित्रे









खास तुमच्यासाठी झी २४ तास ने घेतलेला फ्युचर पाठशाला जोश २०१३ चा आढावा. 

05 May 2013

फ्युचर पाठशाला जोश २०१३

नमस्कार!
मित्रांनो, दर वर्षी प्रमाणे उन्हाळी सुट्टीमध्ये बॉर्न टू विन तर्फे राबविण्यात येणारा 'फ्युचर पाठशाला' हा विद्यार्थी विकास प्रशिक्षणक्रम अगदी दणदणीतरित्या पार पाडत आहे. यंदा एप्रिल व मे २०१३ दरम्यान मुंबई व मुंबईबाहेर २० पेक्षा जास्त ठिकाणी फ्युचर पाठशाला कार्यशाळा राबवण्यात येत आहेत.


फ्युचर पाठशाला कार्यशाळेचा समारोप समारंभ व आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम म्हणजे 'फ्युचर पाठशाला जोश २०१३', दिनांक २६ मे २०१३ या दिवशी, षण्मुखानंद सभागृह, सायन येथे आयोजित करण्यात आला आहे. ह्या अदभुत कार्यक्रमामध्ये फ्युचर पाठशालाचे ५०० पेक्षा अधिक फ्युचर स्टार्स जगण्याची दिशा देणारे निरनिराळे परफॉर्मन्स आत्मविश्वासाने सादर करतील. फ्युचर पाठशालाचा जोश अनुभवण्याची सुवर्ण संधी आपल्याला या कार्यक्रमामध्ये मिळणार आहे.



यंदाचा जोश २०१३ कार्यक्रम भव्यदिव्य तर असणारच आहे परंतु त्याच बरोबर बॉर्न टू विनचे संचालक अतुल राजोळी यांच्या 'माझा मोटिव्हेटर मित्र' या सुप्रसिध्द पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित होणार असुन, वाचकांच्या विशेष आग्रहाखातर ह्याच पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती 'My Motivator Mitra' ह्याच कार्यक्रमामध्ये प्रकाशित होणार आहे.


फ्युचर पाठशाला जोश २०१३ चे वारे सध्या सगळीकडे वाहत आहेत. झी २४ तास वाहिनी या कार्यक्रमाचे मिडीया पार्टनर असणार आहे! बॉर्न टू विनचे सर्व आजी-माजी प्रशिक्षणार्थी या कार्यक्रमाची आधीपासुनच वाट पाहत आहेत, गेल्या पाच वर्षाचे फ्युचर पाठशालाचे विद्यार्थी आमचे फ्युचर स्टार्स या कार्यक्रमाची आस लावून बसले आहेत. मित्रांनो, आता फक्त काही दिवस उरले आहेत. आपल्या बॉर्न टू विनच्या संपुर्ण परिवारासाठी हा कार्यक्रम एक विशेष अनुभव असणार आहे.



मित्रांनो, बॉर्न टू विनच्या या आगळ्या-वेगळ्या सोहळ्याला उपस्थित असाल अशी नम्र विनंती!

- टिम बॉर्न टू विन

फ्युचर पाठशाला जोश २०१३

दिनांक: रविवार, २६ मे २०१३

वेळ: सकाळी ठिक १०:०० वाजता

स्थळः षण्मुखानंद सभागृह, सायन (पु.)

प्रवेश विनामुल्य

संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९


फ्युचर पाठशाला जोश २०१२ ची काही क्षणचित्रे:






27 April 2013

पंधरावा लक्ष्यसिद्धी सोहळा: 'उद्योगक्रमणा सहा दशकांची'

नमस्कार!
मित्रांनो बॉर्न टू विनच्या परिवारासाठी २०१३ वर्ष दणक्यात सुरु झालं. १९ जानेवारीला बॉर्न टू विनने यशस्वी ५ वर्षे पूर्ण केली. सहाव्या 'द सक्सेस ब्लू प्रिंट'  या कार्यक्रमाने या वर्षाची सुरुवात झाली. तसेच १४ वा लक्ष्यसिद्धी सोहळा पहिल्यांदाच यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, माटुंगा इथे साजरा झाला. आणि या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण होत 'ध्येयनिश्चीती ते ध्येयपूर्ती' या आपल्या त्रैमासिकाच प्रकाशन!!
एप्रिल २०१३ ला सगळ्यांचा लाडका विषय म्हणजेच फ्युचर पाठशाला…. याच्यादेखील ५ बॅचेस पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फुर्त प्रतिसादाने वसई, सँडहर्स्ट रोड, पुणे आणि अलिबाग येथे यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. व आता बोरीवली, डोंबिवली, माटुंगा इथे बॅचेस सुरु आहेत. तसेच लवकरच विले पार्ले, कांदिवली, अंधेरी, कर्जत, वरळी, बेलापूर, कल्याण, विक्रोळी, वाई (सातारा), ठाणे येथे सुरु होणार आहेत.
लक्ष्यवेधच्या पंधराव्या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्यांची कामगिरी जबरदस्त झाली आहे. बॅच खुपच छान पार पडली आणि आता सगळ्या आजी-माजी प्रशिक्षाणार्थ्यांना ओढ लागली आहे  ती पंधराव्या लक्ष्यसिद्धी सोहळ्याची. मित्रांनो आगामी  लक्ष्यसिद्धी सोहळा पार पडणार आहे, ३० एप्रिल २०१३ रोजी, यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, माटुंगा (प.) येथे संध्याकाळी ६:०० वाजता.
आपल्याला नेहमीच उत्सुकता असते की लक्ष्यसिद्धी सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण? मित्रांनो नेहमी प्रमाणेच लक्ष्यसिद्धी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असणार आहेत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक! लक्ष्यसिद्धी सोहळ्याच्या या प्रवासातलं अजून एक सोनेरी पान म्हणजे या वेळी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत विकोचे अध्यक्ष श्री. गजानन पेंढारकर सर. 'उद्योगक्रमणा सहा दशकांची' या त्यांच्या भाषणातून सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनी शून्यातून इतकं विशाल साम्राज्य कसं प्रस्थापित केलं याचा सविस्तर  उलगडा ते करणार आहेत. 
श्री. गजानन पेंढारकर सर व विको लेबॉरेटरीज विषयी थोडेसे:

श्री. गजानन पेंढारकर हे विकोचे अध्यक्ष आहेत. यांचा जन्म १२ सप्टेंबर १९३४ रोजी झाला. अहमदाबाद मध्ये ते फार्मसीची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले.
१९५७ साली ते वडिलांच्या व्यवसायात सामील झाले आणि लवकरच त्यांनी निरनिराळ्या प्रकारच्या २० दुर्मिळ जडीबुटी, वनस्पती आणि इतर औषधे वापरून संपूर्ण स्वदेशी आयुर्वेदिक टूथपेस्ट तयार करण्यात यश मिळविले. सरांनी आयुर्वेदाला परदेशी बाजारपेठेत मान्यता प्राप्त करुन देण्यासाठी अतिशय परिश्रम केले आणि कमालीचे यश मिळविले.
परळ येथे १२०० चौरस फुटाच्या जागेत "विको" ची उत्पादने होत असत. नंतर ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे ८० हजार चौरस फुट जागा घेऊन तेथे अत्याधुनिक कारखाना उभारण्यात आला. १९८० साली "विको" ची वार्षिक उलाढाल फक्त ३ कोटींची होती. आज २०११ साली ती ३५० कोटीवर गेली आहे. श्री. गजाननराव पेंढारकर यांच्या दूरदृष्टीचे, परिश्रमाचे हे फलित असून येत्या ५ वर्षात वार्षिक उलाढाल १००० कोटी रुपयांवर नेण्याचा त्यांचा निश्चय आहे. भारतीय उत्पादने आणि आयुर्वेद परदेशात लोकप्रिय करण्याच्या त्यांच्या निर्धारामुळेच सध्या ४० देशात त्यांची उत्पादने खपत आहेत. १९५५ पासून "विको" ची उत्पादने आईसलँड येथेही निर्यात होऊ लागली. आणि प्रथमच भारतीय माल तेथे पोहोचला. विकोला "International Trade Trophy Phonecia" हा मानाचा आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक करंडक १९८० साली "माल्टा" चे माननीय राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते मिळाला. ९२-९३, ९३-९४ व ९८-९९ साली देखील विकोला निर्यात प्रोत्साहनातील पारितोषिके मिळाली. विकोला आतापर्यंत उत्तम जाहिरात, निर्यात, दर्जा, आंतरराष्ट्रीय व्यापार, याबाबत देशी विदेशी अनेक पारितोषिके मिळालेली आहेत. "२००२" हे वर्ष म्हणजे, विकोचे सुवर्ण महोत्सवी वर्ष. त्यावर्षी विको उद्योगसमुहाला ५० वर्षे पूर्ण झालीत.
अशा ह्या स्फुर्तीदायक कार्यक्रमात आवर्जुन उपस्थित रहावे... 
पंधरावा लक्ष्यसिध्दी सोहळा
विषय: 'उद्योगक्रमणा सहा दशकांची'
दिनांक: ३० एप्रिल २०१३
वेळः संध्याकाळी ६ वाजता
स्थळः यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, माटुंगा (प.)
प्रवेश विनामुल्य
संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९



10 April 2013

अतुल राजोळी यांची लाईव्ह मुलाखत झी २४ तास वर


नमस्कार मित्रांनो
आपणा सर्वांना कळविण्यात खूप आनंद होतोय कि दिनांक २ एप्रिल रोजी बॉर्न टू विन चे संचालक श्री अतुल राजोळी यांची लाईव्ह मुलाखत झी २४ तास या वाहिनीवरील हितगुज या कार्यक्रमात दुसऱ्यांदा आयोजित करण्यात आली होती. गेल्या वर्षी १ मे २०१२ रोजी देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुलाखतीचा विषय होता 'फ्युचर पाठशाला'. या मुलाखतीमध्ये अतुल राजोळी यांनी त्यांच्या खास शैलीत विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणांवर तसेच सर्वांगीण विकासावर आधारित प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच फ्युचर पाठशाला हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात कश्याप्रकारे अमुलाग्र बदल घडवीत आहे याबद्दल त्यांनी माहिती दिली. स्वतःचा सर्वांगीण विकास करणे हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे याबद्दल देखील ते बोलले. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी देखील या लाईव्ह मुलाखतीला महाराष्ट्रभरातून श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आपणास हि मुलाखत पाहण्याची संधी मिळाली नसेल, अथवा आपणास हि मुलाखत पुन्हा पहायची असेल तर ती संधी इथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
फक्त क्लिक करा व पहा. आणि आपले अभिप्राय नक्की पोस्ट करा.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites